अमृतफळे
अमृतफळे
झाडे, वेली, झरे, आभाळ अशा निसर्गातील अनेक गोष्टीतून आपल्याला नवे ज्ञान मिळते. आणि त्यातूनच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. चांगल्या गोष्टीचे फळ नेहमी चांगलेच असते.
वृक्षवेलींची सळसळ गोड
मनाला माझ्या लावितेे ओढ . . .
झुळझुळ झऱ्याचे खळाळे पाणी
शिकवी मजला मंजुळ गाणी
अवखळ वाऱ्याची भिरभिर भारी
मजला म्हणते दु:ख विसरी . . .
उंच आभाळीची कृष्ण निळाई
सुखाचे चांदणे पसराया शिकवी . .
थोडे हसून निसर्ग म्हणे
विसर सारे दुष्ट पुराणे . . .
सुख कोठेना बाजारी मिळे
अंतरी तुझ्या तू फुलव मळे . . .
मळयात येतील अमृतफळे
अमृतफळांचे सुख निराळे . . .
परदु:खे ज्याचे हृदय जळे
फळांची गोडी त्याला
Hits: 167