पिशवी
पिशवी
आपली एखादी लहानशी गोष्ट हरवली तरी आपल्या मनाला त्याची चुटपुट लागून राहते. वस्तू हरवली तरी आठवणरूपाने ती आपल्या मनात सदैव राहते.
पैशाची पिशवी होती माझी सुरेख
कशी गेली हरवुनी नाही मज ठाऊक . . . १
जरि रंगाने ती काळीसावळी होती
परि लालगुलाबी फूल असे त्यावरती . . . २
ती संगती माझी सोडुनी उडुनी जाई
परि नजरेपुढुनी जाई न मम ती कधीही . . . ३
जरि दुसऱ्या तैशा पिशव्या असती गेही
मम ध्यानीस्वप्नी सदा तीच ती येई . . . ४
जरि पिशवी माझी दैवे उचलुनी नेली
तरि नेऊ न शकतो स्मृति मम मनी जपलेली . . . ५
प्रत्येक वस्तुचा विनाश अटळचि आहे
मनी शांति राखण्या पांडुरंग तो राहे . . . ६
Hits: 154