मार्जारास
मार्जारास
ही मार्जारान्योक्ती आहे. दुसऱ्यांची नजर चुकवून चुकीच्या मार्गावरून चालणाऱ्या व्यक्तीस उद्देशून लिहिलेली अशी ही कविता आहे.
चोरूनी दुग्धा चाखणाऱ्या
मार्जारा, तू भुलू नको
आयुष्याच्या अंती सुध्दा
अवैध मार्गा धरू नको . . . १
दुग्धावरल्या दाट सायीच्या
मोहामधि तू पडू नको
जिभल्या चाटित तोंडा पुसुनी
चाल वाकडी धरू नको . . . २
समाधानी तू ऐस जगामधि
विवेकबुद्धि सोडू नको
देव पाहतो वरूनी वेड्या
ढोंगीपणाचा आव नको . . . ३
चोरी करता मार्जाराते
वाटे कुणी ना त्या पाही
आपण डोळे मिटले तरीही
दिसते सकलही सकलाही . . .
Hits: 183