वनराई
जंगलात ती झाडे-झुडपे अगणित वस्तीस असती
हिरवी पिवळी गवतपातीही आनंदाने डुलती ... १
वनराई ती गर्द भोवती नसे एकही पणती
रविकिरणांच्या परि दर्शना आतुर तेथील माती .. . २
साग शिसव अन् पळस कळकही हाता धरूनी असती
तुती खैर गुलमोहोर करंजे सोबतीस ती येती... ३
आंबाचिंच नि वडपिंपळही बाभुळबकुळीसम ती
देवदारूकडुनिंबकदंब नि घाणेरी करवंदी... ४
शेर अडुळसा हरितकेतकी ताम्रपर्णी गोकर्णी
विविध तरूंना वेढून असती वेड्या वेली चवेणी ... ५
सिमेंटच्या जणू जंगलात ती शहरी मानववस्ती
धकाधकीच्या जीवनातूनी दर्शनास या मुकती ... ६
Hits: 136