आवराआवरी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

माझे माझे म्हणती जरी
संगे कुणी ना येती तरी
देवाजीच्या जाती घरी
सोडूनी सारे माघारी ... १

परगावी जाता ती खरी
कितीतरी आवराआवरी
परलोकी जाता ती परि
सवड न राही क्षणभरी ... २

संसाराच्या वाटेवरी
असती किती ती दरीखोरी
मृगजळाच्या पाठी परि
लागूनी नाही बेजारी... ३

मायाजाळी माशापरि
गुंतू नको या संसारी
विचार थोडा करुनी तरी
परमेशाचे स्मरण करी ... ४

Hits: 137
X

Right Click

No right click