क्षमा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आवर घाली अपुल्या रागा
फुका न करी तू त्रागा रे
मनोविकारा देई न जागा
फुलतिल मग फुलबागा रे... १

रागावरिता राज्यचि करिता
मिळे मनाला शांती रे
रागाने त्या भले कुणाचे
झाले ना या जगतीरे... २

कौरव, रावण, कंसापरि हे
कितीक दानव असती रे
भीमभयंकर दुश्कृत्ये ते
अतिरागाने करिती रे... ३

अतिरेक्यांपरि इतरा छळण्या
धरी शस्त्र ना हाती रे
सकल जनांवरी कृपा करोनी
सांभाळी मनी सुमती रे... ४

क्षणभंगुर हे जीवन अपुले
रागाने ना संपवी रे
क्षमाच देईल स्वर्गसुखाते
मानी तिजलामाता रे... ५

Hits: 125
X

Right Click

No right click