गावाला जाताना

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

गावाला जाताना, होई फार घाई ।
पाणी पिण्यासही, सवड नाही - सवड नाही ... १

किती केली जरी, आवरासावरी ।
कामाची ती हारी, संपेचिना - संपेचिना ... २

हे काम करू का, ते काम करू |
मनाचा तो वारू, वेगे धावे - वेगे धावे ... ३

चार दिवसांच्या, प्रवासी जाताना |
मनाला यातना , होती किती - होती किती ... ४

घरदार सारे , सगे नि सोयरे ।
सोडताना सारे, सवड नाही - सवडनाही ... ५

सख्या मना बा रे, जोडी व्यवहारे ।
राही प्रेमभरे, जगामाजी - जगामाजी ... ६

Hits: 109
X

Right Click

No right click