बोलावुनि पहा
रामनाम अति गोड असे त्या गाऊनी पहा
हाक मारिता धावत येई बोलावुनि पहा ऽऽऽ... ॥ध्रु.॥
मन हे अपुले अज्ञानाची असे जणू ही गुहा
रामनामरूपी ज्ञानदीप हा अज्ञाना अपहा
उजळूनी टाकील निजतेजाने जीवन अपुले महा
हाक मारिता धावत येई बोलावूनी पहा ऽऽऽ... १
रामनामजप सदैव करिता विरती त्या विपदा
संकटातूनी तारूनी भक्ता दाखवितो सत्पथा
मनापासूनी स्मरता त्याते देईल सुमतीस हा
हाक मारिता धावत येई बोलावूनी पहा ऽऽऽ... २
रामचरणी जव मन हे जडता फिरे न माघारा
जीवनातली क्षणिक सुखे त्या येती न आधारा
संसाराच्या सागरातला दीपस्तंभचि हा
हाक मारिता धावत येई बोलावूनी पहा ऽऽऽ... ३
Hits: 77