७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

संपूर्ण क्रान्ती

जयप्रकाशजींना आमूलाग्र समाजपरिवर्तन हवे होते. राजकारणामुळे होणाऱ्या भ्रष्टाचाराला त्यांचा तीव्र विरोध होता. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील सामाजिक विषमतेला, जातींच्या उतरंडीला, अस्पृश्यतेला त्यांचा विरोध होता. जयप्रकाशजींना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ज्याप्रमाणे समाजवादी विचारांचे तरुण होते, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्यकर्ते होते. एस्‌. एम्‌. आंदोलनात येणाऱ्या तरुणांना विचारीत, "जयप्रकाशजी ज्या वेळी संपूर्ण क्रान्तीची भाषा बोलतात, त्या वेळी ते जातिव्यवस्थेचे निमूर्लन झाले पाहिजे, असे सांगतात. हे करण्याची तुमची तयारी आहे का?" अस्पृश्यतेचे निमूर्लन झाले पाहिजे, हे सर्व तरुणांना मान्य होते. परंतु "जानवी तोडा?, 'हुंडा घेऊ नका" आदी गोष्टी चळवळीत नकोत, असे संघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एस्‌. एम्‌. यांना सांगितले. ६ मार्चला दिल्ली येथे झालेल्या मोर्चामुळे जयप्रकाशजींचे आंदोलन बिहारपुरते मर्यादित न राहता देशव्यापी झाले. अनेक विचारवंत जयप्रकाशजींच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. अशा विचारवंतांमध्ये सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश बॅ. तारंकुडे हेही होते. जयप्रकाशजी आणि तारकुंडे यांची चर्चा झाल्यावर "सिटीझन्स फॉर डेमॉक्रसी" अशी संस्था काढून नागरी हक्काच्या संरक्षणाचे कार्य या संघटनेने करावे, असे ठरले. बॅ. तारकुंडे आणि एस्‌. एम्‌. हे शाळेपासून एकमेकांचे मित्र होते. एस्‌. एम्‌. बॅ. तारकूंडे यांना म्हणाले, "महाराष्ट्रात मी तुम्हाला सिटीझन्स फॉर डेमॉक्रसीच्या कामासाठी धडाडीचे कार्यकतें मिळवून देईन," एस्‌. एम्‌. यांनी महाराष्ट्रातील विचारवंतांना नागरी हक्काच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या या संघटनेत येण्याचे आवाहन केले आणि समाजवादी पक्षातली काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर ही संघटना वाढविण्याचे काम सोपविले.

मे १९७५ मध्ये पुण्याजवळ हडपसर येथे देशातील प्रमुख समाजवादी कार्यकत्यांचे एक शिबिर झाले. शिबिरात एस्‌. एम्‌. जोशी, नानासाहेब गोरे, मधू लिमये, कर्पुरी ठाकूर, हरभजनसिंग, मधु दंडवते आदी नेत्यांनी भाग घेतला. इंदिरा गांधींनी सर्व राजकोय विरोधकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असल्यामुळे अल्पावधीत संघर्ष सुरू होईल, असे सर्वांचे मत पडले. एस्‌. एम्‌. जोशी चर्चेत म्हणाले, 'मला केवळ राजकीय संघर्षात रस नाही. इंदिरा गांघींना विरोध केला पाहिजे. राजकीय लढा टाळता येणार नाही. टाळूही नये. परंतु तो करताना या देशातील गरिबांना आणि दलितांना न्याय मिळवून देणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे याचा विसर पडून चालणार नाही.'

१२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना सहा वर्षे निवडणुकीस उभे राहण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला. हा निर्णय अनपेक्षित होता. एस्‌. एम्‌ यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, 'इंदिश गांधींनी राजीनामा देणे त्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य होईल. त्यामुळे न्यायसंस्थेचा आब सत्तारूढ पक्ष राखतो, हेही दिसून येईल.' परंतु इंदिरा गांथोनी राजीनामा दिला नाही.

२५ जूनला दिल्लीत रामलीला मैदानावर इंदिरा गांधींचा राजीनामा मागण्यासाठी जयप्रकाशजींनी जाहीर सभा घेतली. या विराट सभेत भाषण करताना जयप्रकाश नाणयण यांनी लष्करातील शिपायांना उद्देशून सांगितले, 'लष्करी शिपार्यांना कायद्याच्या विरोधी असलेला हुकूम कोणी दिला तर तो त्यांनी नाकारावा.' या त्यांच्या भाषणाच्या आधारे, जवप्रकाशजी लष्करात बंडखोरी माजवू बघतात, असा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. मोरारजी देसाई, चंद्रशेखर, अटलबिहारी बाजपेयी, चौधरी चरणसिंग, मध लिमये, मधु दंडवते, आदी नेत्यांनाही अटक करण्यात आली. एस्‌. एम्‌. यांना मात्र अटक करण्यात आली नव्हती. नानासाहेब गोरे हे त्या वेळी अमेरिकेत गेले होते. ते राज्य सभेचे सदस्य होते. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना तार केली. 'जर अजूनही आपण मला आपला मित्र मानीत असाल, तर आणीबाणी जाहीर करण्याचे पाऊल मागे घ्या.' नानासाहेब लागलीच अमेरिकेतून भारतात परत आले. त्यांनाही अटक करण्यात आली नाही.

'साधना'चे अग्निदिव्य

आणीबाणी सुरू झाल्यावर 'साधना' साप्ताहिकाचे काय करावयाचे, हा प्रश्‍न एस्‌. एम्‌. पुढे आला. कारण ते 'साधना ट्रस्ट'चे कार्यकारी विश्वस्त होते. सानेगुरुजींनी १५ ऑगस्ट १९४८ला 'साधना' साप्ताहिक सुरू केले, साने गुरुजींच्या निधनानंतर आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन यांनी 'साधने'ची जबाबदारी सांभाळली आणि १९५७ पासून यदुनाथ थत्ते यांनी सानेगुरुजींचा वारसा समर्थपणे चालविला होता. विश्वस्तांच्या सभेत एस्‌. एम्‌. म्हणाले, 'साने गुरुजी आज जसे वागले असते त्याप्रमाणे 'साधने'चे स्वरूप आपण ठेवले पाहिजे.' यावर यदुनाथ थत्ते म्हण्याले, 'मला एस्‌. एम्‌. यांचे म्हणणे संपूर्णतया मान्य आहे. मला असे वाटते की, आपण आणीबाणीचा तीव्र निषेध करणारा एकदम जहाल अंक काढावा आणि सरकारने छापा टाकून तो जप्त केला तर 'साधने'चे प्रकाशन बंद करावे.' अच्युतराव पटवर्धन यांनी मात्र, 'खालच्या पट्टीत विरोध सुरू करा आणि मग विरोध वाढवीत न्या, असा सल्ला दिला; आणि ते त्यांचे म्हणणे एस. एम्‌. यांन मान्य झाले. संपादक म्हणून यदुनाथ थत्ते यांचे नाव पूर्ववत्‌ ठेवायचे, अंकातील लेखन कोणत्याही नावाने छापायचे नाही आणि 'साधना'मधील सर्व लेखनाबद्दल यदुनाथ थत्ते हेच जनाबदार असल्याची भूमिका घ्यायची, असा निर्णय झाला. प्रथम मुखपृष्ठ तेवढे काळे छापले आणि 'साधना'च्या अंकात 'गजाआडून आलेली पत्रे' मिस्किल टवाळी करणाऱ्या कविता, विधान सभेचे आणि लोकसभेचे वृत्त, अशी सदरे सुरू केली. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या विरोधी अनामिकांच्या मुलाखतीही 'साधना'त प्रसिद्ध होऊ लागल्या.

पुण्याचे डे. पोलिस कमिशनर हे पोलिसांना घेऊन 'साधना'वर धाड घालण्यासाठी आले. एस्‌. एम्‌. यांनी तात्काळ फोन केला, 'साधना प्रेस म्हणजे केवळ साप्ताहिकांचे कार्यालय नाही. तेथे 'आन्तरभारती' कार्यालय आहे. 'साधना प्रकाशन'चेही ते कार्यालय आहे. आम्ही पुस्तके छापतो आणि विकतो. तो व्यापारी छापखाना आहे. एस्‌. एम्‌. च्या या फोनमुळे 'साधना प्रेस' बंद होण्याचे टळले. जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगात जी डायरी लिहिली होती तिचा अनुवाद कंपोज कण्याचे काम 'साधना' प्रेसमध्ये चालू असताना 'साधना'ची झडती घेण्यासाठी पोलिस आले. त्या वेळी 'साधना ट्रस्ट'चे विश्वस्त सचिव नाना डेंगळे यांनो झडती घेऊ दिलो. परंतु त्याचवेळी जयप्रकाशजींच्या 'स्वगत'चा मजकूर जुळविण्याचे काम 'साधना प्रेस'मध्ये चालू होते हे पोलिसांना समजलेच नाही. 'साधना'मध्ये गांधीजयंतीस गांधींच्या लेखनातील स्वातंत्र्याचे समर्थन करणारे, "निर्भय बना" हा संदेश देणारे, उतारे छापले होते. त्या वेळच्या संदर्भात तो सर्व मजकूर सरकारला आणीबाणीच्या विरोधातील वाटला. सरकारने साधना प्रेसला टाळे ठोकले. 'साधना'ने हायकोर्टात जाण्याचे ठरविले. 'साधना' कार्यालयास टाळे लावण्यास हायकोर्टाने स्टे दिला आणि पुढे लागतीच तो खटला सुरू झाला. त्या वेळी 'सिटीझन्स फॉर डेमॉक्रसी' या संस्थेत काम करणारे अँड. सौ. आर. दळवी, अँड. एम. ए. राणे या नामवंत कायदेपंडितांनी 'साधना' साप्तहिकाची बाजू समर्थपणे हायकोर्टात मांडली आणि न्यायमूर्ती तुळजापूरकर यांनी "साधना'च्या संपादकांच्या बाजूने निर्णय देताना 'साधना' साप्तहिकातील मजकूर देशहिताच्या विरोधी नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिला. हा "साधना'चा आणि ती भूमिका घेणाऱ्या एस. एम्‌. आणि यदुनाध थत्ते यांचा विजय होता. नागरी स्वातंत्र्याच्या लढ्यातील तो महत्त्वाचा विजय होता. पुढे सरकारने 'साधना' साप्ताहिकावर बंदी घातली. तेव्हा 'कर्तव्य' या नावाखाली 'साधने'चे कार्व चालू ठेवण्यात आले.

Hits: 149
X

Right Click

No right click