२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ९
स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई
राष्ट्र सेवादलाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, 'काहोजण म्हणतात की, राष्ट्र सेवादल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करण्यासाठी सुरू केले आहे. हे खोटे आहे. राष्ट्र सेवादलाची भूमिका नकारात्मक नाही. तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात येण्याची प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रसेवादल सुरू केले संघ स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देण्याऐवजी 'सैन्यात जा म्हणून ब्रिटिश साप्राज्याशी सहकार्य करण्याची भूमिका घेतो, म्हणून राष्ट्र सेवादलाचा संघाला विरोध आहे. "स्वराज्य हा माझा जन्यसिष्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच", असे लो. टिळकांनी आपल्याला सांगितले. म. गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊनच आपली स्वराज्याची आकांक्षा पुरी होऊ शकेल. राष्ट्र सेवादलातील सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. भगतसिंग, राजगुरू हे हुतात्मे झाले. बाबू गेनू या साध्या कामगाराने स्वदेशीसाठी बलिदान केले. हाच संस्कार राष्ट्र सेवादलाला करायचा आहे.'' एस्. एम्. यांचे हे बौद्धिक ऐकणारा मी एक श्रोता होतो. स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी उडी घेतली पाहिजे, हे त्यांचे आवाहन ऐकताना माझ्या मनात देशभक्तीची ज्योत पूर्वीपेक्षाही प्रखर झाली. मन पेटून उठले. बैठकीनंतर आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत पडण्याचा निर्धार केला.
चर्चिल या सामाज्यवादी ब्रिटिश पंतप्रधानांना भारताला राजकोय हक्क देण्याची कल्पनाही सहन होत नव्हती. त्यांनी जाहीर घोषणा केली, "मी ब्रिटनचा पंतप्रधान झालो आहे ते साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी नाही." चर्चिल यांनी रूझवेल्ट यांच्या दबावामुळे क्रिप्स शिष्टमंडळ पाठविले, परंतु छुप्या रितीने त्या योजनेला त्यांनी सुरुंग लावला. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीची बीजे होतीच. शिवाय संस्थानिकांना भारताचे भविष्य ठरविण्यासाठी जादा अधिकार दिले होते. अखेर काँग्रेसचे अध्यक्ष मौ. आझाद यांनीही क्रिप्स योजना फेटाळून लावली. वाटाघाटी फिसकटल्या, एस्. एम्. आणि त्यांचे सहकारी या कालखंडात 'हरिजन'मधील गांधीजींचे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचोत असत. २६ एप्रिलच्या 'हरिजन'च्या अंकात गांधीजींनी ब्रिटिशांना, भारत सोडून चालते व्हावे - 'चले जाव ', 'क्विट इंडिया' असा आदेश दिला. एस्. एम्. ने आत्मकथेत लिहिले आहे, 'हरिजन'मधील या अग्रलेखापासून देशातील वातावरण उत्तरोत्तर विजेने भारल्यागत झाले.
भूमिगत चळवळीची तयारी
मे महिन्यात पुण्याला एस्. एम्. जोशी यांनी राष्ट्र सेवादलाच्या महाराष्ट्रातील दीडशे निवडक तरुण कार्यकर्त्यांचा कॅम्प घेतला होता. कॅम्पच्या समारोपाला युसूफ मेहेरअली आले होते आणि त्यांनी तरुणांना स्वातंत्र्य लढ्यांत सामील होण्याचे आवाहन केले. त्याच दिवशी मेहेरअल्ली, एस्. एम्. आणि शिरुभाऊ यांची एक खासगी बैठक झाली आणि तेथे ठरल्याप्रमाणे १९४२ च्या जून महिन्यात एस्. एम्. आणि शिरुभाऊ यांनी महाराष्ट्रातील निवडक समाजवादी कार्यकर्त्यांचे एक गुप्त शिबिर पुण्यात रास्ता पेठेत 'गुजरात मेटल वर्क्स'च्या जागेत घेतले. ब्रिटिशांची सत्ता केन्द्रे नष्ट करावयाची, सैन्याच्या हालचालीस प्रतिबंध व्हावा म्हणून पूल उडविणे, तार तोडणे आदी गोष्टी करावयाच्या, मात्र शक्यतो जोवितहानी करावयाची नाही आणि व्यक्तिगत मालमत्तेवर घाला घालायचा नाहो, असा कार्यक्रम या गुप्त बैठकीत ठरविण्यात आला.
'चले जाव' आंदोलनास प्रारंभ
८ ऑगस्ट रोजी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन भरले. अधिवेशनास देशभरातून तरुण आले होते. अधिवेशनात म. गांधीजींचे भाषण एस्. एम्. जीवाचा कान करून ऐकत होते. स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे समर्पण करावे लागेल, या आशयाच्या गांधीजींच्या शब्दांनी सभेतील लक्षावधी श्रोत्यांप्रमाणेच एस्. एम्. यांचे मन थरारून गेले. एस्. एम्. ताराबाईना घेऊन अधिवेशनास आले होते आणि थत्ते नावाच्या स्नेह्याकडे उतरले होते. ८ ऑगस्टला 'चले जाव' ठराव पास झाल्यानंतर पुढाऱ्यांची धरपकड होणार, असा एस्. एम्. यांना अंदाज होताच. त्यांनी ताराबाईंना पुण्यास पाठवून दिले आणि स्वतः लागलीच भूमिगत व्हावयाचे ठरविले. ते ताडदेवला जनुभाऊ
गुणे यांच्या निवासस्थानी गेले. ही जागा आडबाजूला होती. तीन खोल्या आणि बाथरूम अश! त्या जागेत गुणे हे वैद्यकीचा अभ्यास करणारे विद्यार्थी राहात. वरच्या मजल्यावर शेंड्ये हे विद्यार्थी रहात. गुणे हे नगरच्या वैद्यराज गुण्यांचे चिरंजीव. ही जागा नगरच्या जनुभाऊ पटवर्थनांनी भूमिगत नेत्यांना राहण्यासाठी निश्चित केली होती.
एस्. एम. आणि जनुभाऊ तेथे आल्यावर गुणे आणि शेंड्ये हे जागा सोडून गेले आणि दोन मजल्यांची ती जागा भूमिगतांचे निवासस्थान बनली. त्या जागेत एकच अडचण होती, ती म्हणजे तेथे उंदीर फार होते. एस्. एम्.म्हणाले, 'आपण भूमिगत आणि आपले येथील सोबती बिळात राहणारे उंदीर.' त्यानंतर भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये हो जागा 'मूषक महाल' म्हणून ओळखली जाऊ लागली. ८ ऑगस्टला मध्यरात्रीनंतर म. गांधी, पं. नेहरू आदी पुढाऱ्यांची ब्रिटिश सरकारने धरपकड केली. मुंबईत लोकांना ही वार्ता सकाळी कळताच लोकांनी प्रचंड मोर्चे काढले, या मिरवणुकांतील लोक बेभान झाले होते. लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार यांना न भिता लोक आपला संताप व्यक्त करीत होते. देशभर सर्वत्र असे उठाव झाले. सरकारने जिल्हा पातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्याची धरपकड केली. पात्र पूर्वी ज्या नेल्यांनी भूमिगत व्हायचा निर्णय घेतला होता, ते पोलिसांना सापडले नाहीत. ते भूमिगत झाले. अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअल्ली, डॉ. राममनोहर लोहिया आदी नेते मुंबईत वेगवेगळ्या जागी लपून राहिले. चार दिवसांनी हे सर्व भूमिगत नेते एकत्र आले आणि पुढील चळवळ चालविण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जपून पुढील योजना ठरवू लागले. ११ ऑगस्टला साने गुरुजी गुप्तपणे मुंबईत आले आणि तेही एस्. एम. रहात असलेल्या 'मूषक महालात' दाखल झाले.
Hits: 119