२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - १०

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

भूमिगत अवस्थेत वेषांतर करणे आवश्यक होते. चार दिवसांच्या धावपळीत एस्‌. एम्‌.ना दाढी करणेही जमले नव्हते. दाढी वाढलेला आपला चेहरा बदललेला दिसतो, हे त्यांच्या लक्षात आले. गुण्यांची शेरवानी घालताच हे वेषांतर पुरेसे आहे असे ठरले. पायजमा, शेरवानी आणि जीना कॅप असा पोषाख करून एस्‌. एम्‌.ने एक काळा गॉगल डोळ्यावर ठेवला. ते बोहरी मुसलमानासारखे दिसू लागले. इमाम अल्ली हे टोपण नाव घेऊन या पोषाखात एस्‌. एम्. यांचे स्वातंत्र्य चळवळीचे भूमिगत कार्य सुरू झाले.

काँग्रेसचे 'मध्यवर्तो संचालन केन्द्र" (काँग्रेस सेंट्रल डायरेक्टोरेट) स्थापन करण्यात आले, त्यात सुरुवातीस अच्युतराव पटवर्धन, डॉ. रामममोहर लोहिया आणि अरुणा असफअल्ली हे तिघेचजण होते. पुढे नोव्हेंबर महिन्यात जयप्रकाश नारावण आणि त्यांचे सहकारी हे हजारीबाग तुरुंगातून भिंतोवरून उड्या मारून बाहेर पळून आले. ते काही दिवसांनी मुंबईत आले. नंतर स्वातंत्र्य लढ्याच्या केन्द्रीय संचालन केंद्रामध्ये जयप्रकाश नारायण यांचा समावेश झाला. अण्णासाहेब सहस्रबुध्दे, रंगराव दिवाकर आणि पुंडलिक कातगडे यांच्याकडे शस्त्रागाराचे काम सोपविण्यात आले. एस्‌. एम्‌. जोशी प्रथम महाराष्ट्रातील भूमिगत कार्याला सुव्यवस्थित स्वरूप देण्यासाठी जळगाव, सोलापुर इत्यादी काही ठिकाणी जाऊन आले. बुलेटिन्स लिहिण्याचे काम सुरुवातीस मधू लिमये आणि विनायकराव कुलकर्णी हे करीत. पुढे त्यांनाही मुंबईबाहेर पाठविण्यात आले. साने गुरुजीही गुप्तपणे कार्थकर्त्याच्या बैठकांना जात आणि परत आल्यावर गुप्त पत्रकांचा स्फूर्तिदायी मजकूर लिहीत. कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनासाठी "क्रांतीच्या मार्गावर" ही ओजस्वी पुस्तिका साने गुरुजोंनी 'मूषक महाला'तच लिहिली. नानासाहेब गोरे हे गुलबर्गा तुरुंगातून सुटल्यावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले आणि मुंबईला मृषक मह्यलात आले. त्यांनी साने गुरुजीच्या क्रान्तीच्या मार्गावर या पुस्तिकेला उचित आणि प्रभावी प्रस्तावना लिहिली. या पुस्तिकेच्या शेकडो प्रती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाठविण्यात आल्या. प्रत्येक प्रांतात भूमिगत कामाला हळूहळू वेग येऊ लागला. विदर्भ आणि मध्य प्रांतामध्ये मगनलाल बागडी, श्याम नारायण काश्मिरी, आचार्य दांडेकर यांचे काम चालले होते.

गुजरातमध्ये छोटूभाई पुराणिक यांच्या नेतृत्वाखालो भूमिगत आंदोलन सुरू होते. या सर्व कामांचे एकसूत्रोकरण करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर सोपविण्यात आली. एस्‌. एम्‌. जोशी पूर्वी तुरुंगात उर्दू शिकले होते, ते उर्दू बोलू शकत असत. त्यामुळे त्यांना दिल्ली वायव्य सरहद्द प्रांत आणि सिंधमध्ये पाठविण्यात आले. इमाम अल्ली हे टोपण नाव, मुस्लिम पद्धतीचा पोषाख आणि फर्ड्या. उर्दूमध्ये बोलणे यामुळे एस्‌. एम्‌. उत्तर भारतात फिरत असताना पकडले गेले नाहीत. वायव्य सरहद्द प्रांतात त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अल्लाबक्ष हे एका वेळी सिंधचे मुख्यमंत्री होते. त्यांचा काँग्रेसकडे ओढा होता. ब्रिटिश सरकारने त्यांना बहतर्फ केले. अल्लाबक्ष यांची गाठ घेण्यासाठी एस्‌. एम्‌. कराचीला आले. त्यांना भेटण्यासाठी अरुणा असफअल्ली यांनी एस्‌. एम. यांच्याजवळ पत्र दिले होते. पेशावरहून एस्‌. एम्‌. कराचीला पोहोचले. त्याच दिवशी अल्लाबक्ष यांचा त्यांच्या राजकीय विरोधकांनी खून केला. एस्‌. एम्‌. उद्दिग्न होऊन मुंबईस परत आले.

प्रति- सरकार

महाराष्ट्रात महाडच्या मोर्चामध्ये वसंत दाते आणि कमलाकर दांडेकर हे कॉलेज विद्यार्थी पोलोस गोळीबारात ठार झाले. नेरळचे धडाडीचे कार्यकतें भाई कोतवाल यांनी ठाणे जिल्ह्यात सिद्धगडावर आदिवासींना संघटित करून काही गावांमध्ये प्रति-सरकार स्थापन केले. पुढे सरकारने सिद्धगडाला वेढा घातला आणि भाई कोतवाल ब्रिटिश अधिकाऱ्यांशी समोरासमोर लढताना गोळोचारात मारले गेले. अनेक ठिकाणी निर्भय कार्यकतें हुतात्मे झाले. सातारा, सांगली भागात क्रांतिसिंह नांना पाटील आणि त्यांचे सहकारी यांनो गनिमी काव्याने सरकारशी लढा देत प्रति-सरकार-पॅरलल्‌ गव्हर्न्मेंट स्थापन केले. बंगालमध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेशात बालिया येथेही असेच प्रयत्न झाले. परंतु ते काही काळच टिकले. सातारचे स्वातंत्र्यसैनिक मात्र सरकारपुढे नमले नाहीत. तेथील प्रतिसरकार १९४५ अखेरपर्यंत चालू राहिले. डॉ. लोहिया यांच्याभोवती मुंबईत गोळा झालेल्या विठ्ठल जव्हेरी, उष मेहता या कॉलेज विद्यार्थ्वांनी स्वतंत्र भारताचा रेडिओ सुरू केला. अच्युतरान पटवर्धन, अरुणाबाई, डॉ. लोहिया यांचो भाषणे, क्रांतीची स्फूर्तिदायक गाणी, देशभराच्या स्वातंत्र्य संग्रामातोल घटनांची माहिती आदी कार्यक्रम या रेडिओवरून नियमाने होत. पुण्यामध्ये कॅन्टोन्मेंटमध्ये कॅपिटॉल या सिनेमा थिएटरमध्ये बॉम्बचा स्फोट होऊन नऊ ब्रिटिश सोल्जर्स ठार झाले. पुण्यात या क्रांतिकारी तरुणांचे नेतृत्व शिरुभाऊ लिमये करीत होते. शिरुभाऊंना पकडण्यासाठी सरकारने खूप धडपड करूनही ते सापडले नव्हते. परंतु १८ एप्रिल १९४३ला मुंबई पोलिसांनी 'मृषक महाला'वर छापा घालून शिरुभाऊ लिमये, नानासाहेब गोरे, साने गुरुजी आणि माधव लिमये आदींना पकडले.

Hits: 120
X

Right Click

No right click