२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ८

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

यापूर्वी थोडेच दिवस आधी १७ जानेवारी १९४१ला भारतालाच नव्हे तर ब्रिटिश सामज्यवाद्यांनाही धक्क! देणारी एक घटना घडली. महायुद्ध सुरू झाल्याबरोबर सुभाषचंद्र बोस यांना सरकारने त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. घराभोवती पोलिसांचा सक्त पहारा असताना सुभाषबाबू तेथून निसटून पेशावर मार्गे देशाबाहेर गेले. सर्व देश सुभाषबाबूंच्या साहसामुळे थरारून गेला. सुभाषबाबृंच्या या सीमोल्लंघनामुळे जनतेत नवै चैतन्य निर्माण झाले. देवळी तुरुंगात स्थानबद्ध असताना जयप्रकाश नागयण यांनी भूमिगत चळवळीचे स्वरूप काय असावे याचा तपशील देणारे एक पत्र आपल्या समाजवादी मित्रांना गुप्तपणे पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पत्रक पोलिसांनी, जयप्रकाश नारायण यांच्या पत्त्नी प्रभावतीदेवी यांच्याकडून हस्तगत केले. कप्निसमध्ये असलेल्या या तरुण पुढाऱ्याचा गांधीजींनी निषेध करावा म्हणून सरकारनेच ते पत्रक प्रसिद्ध केले. त्या पत्रकाचा निषेध करण्यास गांधीजींनी स्पष्ट नकार दिला. 'हरिजन'मध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना गांधीजींनी लिहिले, 'मला अहिंसकच चळवळ करावयाची आहे, परंतु लोकांच्या रास्त आकांक्षाही पुऱ्या न करता ब्रिटिश सरकार दडपशाहो करीत असेल तर काहीजण हिंसक चळवळीस अनुकूल होणारच. जयप्रकाश नारायण यांची भूमिका ही सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्धवी तीव्र प्रतिक्रिया आहे.'

जागतिक राजकारणातही प्रचंड घहामोडी होत होत्या. सात डिसेंबरला जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करून अमेरिकेचा नाविक तळ उद्ध्वस्त केला. त्यानंतर अमेरिका लोकशाहीवादी राष्ट्रांच्या बाजूने युद्धात सामील झाली. यापूर्वी युरोपपुरतेच मर्यादित असलेले युद्ध आता खऱ्या अर्थाने जागतिक युद्ध झाले. ज्याप्रमाणे युरोपात हिटलरने एकापागून एक देश जिंकत रशियावर स्वारी केली त्याचप्रमाणे पूर्वेकडे जपान आता काही अशियाई राष्ट्रांवर, विशेषत: युरोपियन साम्राज्यांतर्गत राष्ट्रांवर, हल्ला करणार अशो शक्‍यता निर्माण झाली.

१९४र च्या फेब्रुवारीत भारताच्या ईशान्य आणि आग्नेय दिशांच्या रोखाने जपानचे सैन्य पुढे येऊ लागले. १५ फेब्रुवारीला सिंगापूर पडले. सात मार्चला जपानने रंगूनचा ताबा घेतला. पाच एप्रिलला जपानने कोलंबोवर आणि ६ एप्रिलला भारतातील विशाखापट्टण आणि काकिनाडा शहरावर बॉम्बफेक केली. ब्रिटिश सरकार भारतीय जनतेचे रक्षण करू शकणार नाही, ही भावना लोकांत वाढू लागली. या परिस्थितीत ब्रिटनने कडव्या साग्राज्यवादी भुमिकेस मुरड घालून भारताचा युद्धप्रयत्नात खराखुरा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी इंग्लंडवर दबाब आणला. सामोपचाराचे वातावरण निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पं. नेहरू, मौ. आझाद, सरदार पटेल आदी नेत्यांची आणि वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतलेल्या अन्य सत्याग्रहींची मुक्तता केली, त्यानंतर भारताच्या नेत्यांबरोबर बोलणी करण्याकरिता १९४२च्या मार्चमध्ये सर स्ट्रॅंफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठविण्यात आले. ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी अत्यंत नाखुशीने हे केले होते. कारण कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिश साम्राज्याचे सार्वभौमत्व कमी होता कामा नये, अशो त्यांची भूमिका होती.

एस्‌. एम्‌. जोशी आणि त्यांचे सहकारी यांना संघर्षाच्या मार्गानेच स्वराज्य मिळेल असे वाटत होते आणि तडजोड झाल्यास संघर्षाची धार कमी होईल अशी भीती वाटत होती. या वेळी गांधीजींनी अत्यंत जहाल भूमिका घेऊन 'स्वतंत्र हिंदुस्थानच स्वत:चे परकीय आक्रमणापासून संरक्षण करू शकेल', असे रोखठोकपणे सांगितले. ब्रिटन स्वतःला लोकशाहीवादी म्हणवीत असले तरी जोपर्यंत भारतावरील ब्रिटिश साम्राज्याचे जोखड दूर होत नाही, तोपर्यंत ब्रिटनला लोकशाहीवादी म्हणताच येणार नाही. अशो भूमिका गांधीजींनी 'हरिजन'मधून देशासमोर मांडली. गांधीजी त्यांच्या अयलेखांतून, मुलाखतींमधून आणि भाषणांतून राजकीय वातावरण तापवू लागले. भारताची स्वातंत्र्याची आकांक्षा तावडतोब पूर्ण झाली पाहिजे, असे गांधीजींनी 'हरिजन'च्या अग्रलेखात लिहिले तेव्हा देशभर चैतन्याची नवी लाट उसळली. क्रिप्स शिष्टमंडळाने, काँग्रेस अध्यक्ष मौ. आझाद आणि पं. नेहरू य़ांच्याबयोबर बोलणी करून युद्ध संपल्यानंतर ब्रिटन भारताला वसाहतीचे स्वराज्य देईल, अशी योजना त्यांच्यासमोर ठेवली. परंतु गांधीजींनी ही योजना ठोकरून लावली. क्रिप्स योजना म्हणजे 'बुडत्या बँकेवरचा पुढच्या तारखेचा धनादेश आहे', असे जेव्हा गांधीजींनी 'हरिजन'मध्ये लिहिले, त्यावेळी एस्‌. एम्‌. ना फार समाधान वाटले. स्वातंत्र्यसंग्राम आता समीप आला आहे, हे त्यांनी ओळखले.

Hits: 116
X

Right Click

No right click