८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ८
८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ८
२१) कॉँग्रेस मंत्रिमंडळाने व्हालंटरी शाळांची योजना शासन निर्णय - शिक्षण विभाग क्रमांक ६५१३ ने ता. २५-८-१९३९ ला जाहीर केली. सारांश, रयत शिक्षण संस्था ही व्हालंटरी शाळा सुरू करणार्या संस्थांना मार्गदर्शन करणारी पहिली पायाभूत संस्था होती. शासनाच्या वरील ठरावापूर्वी ता. १८-९-१९३८ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या योजनेप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पुढील सदस्यांची प्राथमिक शाळा समिती स्थापण्यात आली .
१ ) भाऊराव पी. पाटील - अध्यक्ष
२) प्राचार्य के. एस. दीक्षित - सभासद
३) श्री. एन. एन. दोशी - सभासद
४) श्री बी. एस. बारटक्के - सभासद
५ ) श्री. आय. एम. एस. मुल्ला - सभासद सचिव व श्री. एस. डी. महादार - आजीव सभासद
१-१०-१९२३९ पासून प्रशासन अधिकारी म्हणून काम करू लागले. कारण एका वर्षात १- ९-१९३८ ते १-१०-१९३९ अखेर ६० व्हालंटरी शाळा सातारा जिल्ह्याच्या डोंगरी व दुर्गम भागात व पूर्वेकडील दुष्काळी भागात सुरु करण्यात आल्या होत्या. भाऊराव स्वत: पायी किंवा घोड्यावरून या भागात जाऊन ग्रामस्थांच्या सभा घेऊन शाळा सुरू करीत व तेथे स्वयंसेवी शिक्षक पाठवीत किंवा सोबत नेत.
२२) व्हालंटरी शाळांची ही योजना पुढीलप्रमाणे होती :
१) रयतेच्या मुलांना व पाल्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देणे.
२) रयत शिक्षण संस्था संमती देणार्या खेड्यात शाळेसाठी शिक्षक पाठवील.
३) गावकर्यांनी चावडी, मंदिर किंवा एकाद्याच्या वाड्यातील एकदोन खोल्या शाळेसाठी द्याव्यात.
४) गावकर्यांनी शिक्षकास राहण्यास जागा देऊन त्याच्या मोफत जेवणाची सोय, वार लावून किंवा धान्य देऊन करावी.
५) २. शि. संस्था ठ ८८ ।" किंमतीचे शाळासाहित्य, पाट्या, पुस्तके इ. मोफत देईल.
६) शासनाकडून मिळणारा पगार किंवा अनुदानभत्त्यासह शिक्षकास मिळेल.
७) अशा शाळावर दोन वर्षे राम करणाऱ्या सातवी पास शिक्षकास संस्थेच्या ट्रेनिंग कॉलेजामध्ये मोफत प्रवेश मिळेल. व॒ या ट्रेनिंगच्या मुदतीत छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसमध्ये अल्पदरात जेवण मिळेल. त्यासाठी त्यांनी कॉलेजकडे थोडी थोडी रक्कम ठेव म्हणून ठेवावी.
८) ट्रेंड झाल्यावर ३०-१-५० या पगारश्रेणीत पगार व भत्ता शासनाकडून मिळवून दिला जाईल. या योजनेप्रमाणे १९ २८ साली विजयादशमीस येवतेश्वर डोंगरावरील अनावळे गावी पहिली शाळा सुरू झाली.
२३) सन १९४८-४९ व १९४९-५० साली २. शि. संस्थेमार्फत ५७८ व्हालंटरी शाळेत ८२३ शिक्षक, २५,१७९ विद्यार्थी, अकरा तालुक्यातून विखुरले होते. बहुसंख्य एकशिक्षकी शाळा इ. ४ थीपर्यंतच्या होत्या. सातवीच्या फक्त ११ शाळा होत्या. शिक्षकांत ८९ ब्राह्मण, ६४६ मराठा व तत्सम, ७२ हरिजन, १६ मुसलमान होते. (डॉ. रा. अ. कडियाळकृत कर्मवीर भाऊराव पाटील, इंग्रजी ग्रंथ, पृ. १०२-१०६) भाऊरावांच्या या शाळांचे प्राचीन पाठशाळा किंवा १८३८ मधील पुरंदर शाळांशी बरेच साम्य दिसते. बावीस वर्षात र. शि. संस्थेने १३७५ व्हालंटरी शिक्षक ट्रेंड केले. सन १९५४ नंतर नवीन धोरणानुसार शासनाने व्हालंटरी शाळा बंद करून तेथे स्कूल बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचे धोरण ठेवल्याने संस्थेने शाळा बोर्डाकडे देण्यास सुरवात केली.
२४) या व्हालंटरी शाळांच्यामुळे शासनास किती फायदा झाला हे पाहू या. या ५७८ शाळांसाठी शासनास १९३८-१९४८ या दहा वर्षांत शाळेच्या एका खोलीस रु. ४, ३२० प्रमाणे ६०५ खोल्या बांधाव्या लागल्या असत्या. ती रक्कम होते २६,१२३,६००/- या शाळातील शिक्षकांना शासकोय वेतनश्रेणीप्रमाणे एकूण रु. ६४,९६,९६०।- पगारापोटी द्यावे लागले असते. त्याऐवजी शासनाने व्हालंटरी शिक्षकांना र. शि. संस्थेमार्फत ठु. ३३,६१,०२१.६५ पैसे दिले; म्हणजे रु. ३२१,३५,९३८.३५ वाचवले. त्याचे प्रमाण ४८.२% पडते. याशिवाय रयतेने आपण होऊन मदत केलेली रक्कमही . शासनास खर्च करावी लागली असती. म्हणजे ती रु. ३,९७२१५.०३ आहे. एकूण रु. ६१, ४६,७८३.३८ शासनाचे वाचले व २५,१७९ मुले साक्षर झाली. शासनाचा हा व्हालंटरी शाळा बंद करण्याचा निर्णय म्हणजे आखुड शिंगी बहुदुधी गाय मारण्याचा प्रकार होता. यामुळे जनतेतील दातृत्वास ओहोटी तर लागलीच, पण स्वावलंबनाच्या तत्त्वासही हरताळ फासला गेला. डॉ. धनंजयराव गाडगीळ श्री. वि. द. घाटे यांच्या नेतृत्वाखाली सन १९५२ व १९५३ साली या शाळा बंद न करण्याबद्दल शिक्षणमंत्र्यांना विनंती केली. पण १९४८ पासून शासनाची र. शि. संस्थेवर वक्रदृष्टी असल्याने या शिष्टाईचा काही उपयोग झाला नाही. (पाहा : र. अ. कडियाळकृत कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र, पू. ११५-११७)
Hits: 140