७. अक्रोडाची फळे - ४
७. अक्रोडाची फळे - ४
११) सन १९२७ साली म. गांधींचा महाराष्ट्रात रचनात्मक कार्यक्रमाच्या प्रचारार्थ दौरा होता. ते साताऱ्यास येतील तेव्हा त्यांच्या हस्ते सदर वसतिगृहाचे नामकरण व्हावे म्हणून भाऊराव पाटलांनी म. गांधींचे खाजगी सचिव महादेवभाई देसाई यांच्याशी पत्रव्यवहार करून २५ फेब्रुवारी १९२७ ही तारीख ठरवून घेतली. परंतु सातारच्या भाऊरावद्वेष्ट्या सनातनी लोकांनी महादेवभाई देसाईंना वेडीवाकडी पत्रे लिहून सदर वसतिगृहाची भेट रद्द करविली. भाऊराव कच्च्या दिलाचे थोडेच होते? त्यांनी व्यवहारी मार्ग काढला. कऱहाड-सातारा जुन्या रस्त्यावर आपलीवसतिगृहाची मुले म. गांधींजींच्या मोटारीस आडवी उभी केली.
म. गांधींची मोटार अडविल्यानंतर भाऊरावांनी सरळ प्रश्न केला, “बापूजी, माझ्या वसतिगृहाची भेट रद्द कां केली? काही नाराजीचे कारण?” या प्रश्नास उत्तर नव्हते. म. गांधी महादेवभाई देसाईंच्या तोंडाकडे पाहत राहिले. देसाई म. गांधीजींच्याकडे पाहत राहिले. शेवटी म. गांधींनी नामकरण समारंभास पूर्वी ठरल्याप्रमाणे येण्याचे कबूल केले. मुलांच्या व भाऊरावांच्या आनंदास पारावार राहिला नाही. सोमवार पेठेतील वसतिगृहाच्या इमारतीपुढे छोटा मंडप घातला होता. लोक दाटीवाटीने रस्त्यावरच उभे होते. त्यात काही सनातनी विरोधकही नाईलाजाने आले.
१२) इस्लामपूरहून कोल्हापूरच्या मिस् क्लार्क वसतिगृहात भाऊरावाने नेलेल्या ज्ञानदेव धुवयाथ घोलप या हरिजन विद्यार्थ्यानेच हिंदीमध्ये म. गांधींचे स्वागत केले. घोलप यावेळी मुंबई कायदे मंडळाचे सभासद होते. त्यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, ब्राह्मणेतर बहुजनसमाजास व हरिजनास धर्माच्या नावाखाली शिक्षणापासून व सुधारणेपासून वंचित ठेवण्यास शिक्षित पुढारलेला वर्गच कारणीभूत आहे.
ते पुढे म्हणाले, “आपल्यासारखा समाजाच्या रोगाचे निदान करून उपचार करणारा वैद्य निर्माण झाल्याने लोकांत स्वाभिमान, देशभक्ती व नवचैतन्य निर्माण झाळे आहे.” यानंतर वसतिगृहाचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल माहिती सांगून घोलप म्हणाले, “गेली अनेक वर्षे भाऊराव अस्पृश्य, मराठे व तत्सम मागासलेल्या समाजासाठी शिक्षण देण्याचे - स्वत:च्या पैशातून - काम करीत आहेत.” यानंतर वसतिगृहातील मुलांची जातवार संख्या सांगितली ती खालीलप्रमाणे होती: मराठा - १२, महार - ११, मांग - २, मुसलमान - २, धोबी - १, न्हावी - १, वडार - १, जैन - १, ब्राह्मण - १, लिंगायत - १, रामोशी- १.
भाऊरावांनी या वसतिगृहासाठी स्वत:च्या प्राप्तीतून रु.६,०००/- खर्च केठे व आतापर्यंत फक्त रु. १६३।- देणगी मिळाल्याचे सांगितले. संस्थेस 'रयत शिक्षण संस्था” म्हणण्याचे कारण सांगून या वसतिगृहास म. गांधींनी छत्रपती शाहू बोर्डि ग हाऊस हे नाव देण्यास विनंती केली. या वसतिगृहातून जनतेचे नेते तयार व्हावेत म्हणून गरीब व हुशार विद्यार्थ्यांस जिल्ह्यातून हुडकून आणून येथे त्यांच्यावर संस्कार करण्याचा थाऊरावांचा हेतू असल्याचे सांगितले.
१३) म. गांधींना या वसतिगृहाचा इतिहास ऐकून आनंद झाला. यातील भिंगारदेवे व शेख या मांग व मुसलमान मुलांनी इंग्रजी चौथ्या यत्तेत संस्कृतमध्ये पहिला व दुसरा नंबर मिळविल्याबद्दल म. गांधींनी आपल्या गळ्यातला हार या मुलांच्या गळ्यात घालून त्यांचे कौतुक केले व म्हणाले, “साबरमती आश्रमात स्पृश्य-अस्पृश्य यांना एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला नाही. ते भाऊरावांनी करून दाखविले आहे. मी त्यांचे कौतुक करतो.” यानंतर वसतिगृहाच्या नामफलकावरील पडदा बाजूस करून 'छत्रपती शाहू बोर्डि ग हाऊस' असे नामकरण केल्याचे जाहीर केले. जाता जाता मिस्किलपणे ते भाऊरावांस म्हणाले, “महाराज से कितना पैसा लिया है!” भाऊराव म्हणाले, “मैने उनसे कुछ भी पैसा नही लाया । उनसे सिर्फ बडा दिल लिया है।” यावर म. गांधी हसले. यापुढे त्यांनी भाऊरावांच्या कार्यावर सतत लक्ष ठेवले. सन १९२३ साली जूनमध्ये पुण्यास म. गांधींचा पुल्काम असताना भाऊराव और. ठाकरे यांच्यासह त्यांना भेटून हरिजन फंडातून वसतिगृहास मदत मिळविण्यासाठी त्यांची शिफारस मिळविली. ह. ५००/- प्रमाणे पुढील चार दर्षे ही मदत हरिजन फंडातून मिळत राहिली.
१४) या नामकरणप्रसंगी अहवालात सांगितल्याप्रमाणे भाऊराव 'जिल्हाभर हिंडून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना भेटून, हुशार मुलांच्या पालकांना भेटून त्यांच्या मुलांना वसतिगृहात सातारला पाठविण्यास सुचवीत. देऊ केलेल्या सवलती पालकांना सांगून त्यांची मने वळवीत. सन १९२४ पर्यंत सातारचे वसतिगृह चालविणे भाऊरावांची वैयक्तिक जबाबदारी होती.
Hits: 101