७. अक्रोडाची फळे - ५
७. अक्रोडाची फळे - ५
१५) म. गांधींनी भाऊरावांच्या या राष्ट्रीय एकात्मत! कार्याचे महत्त्व जाणून कोतुक केल्यानंतरही सातारच्या सनातनी समाजाने भाऊरावांच्या राष्ट्रीय कार्यास नाके मुरडण्याचे सोडले नाही. आणि भाऊरावही त्यांना फारशी किंमत देत नसत. कारण त्यांच्या वसतिगृहास ग्रामीण जनताच मदत करीत होती. याला अपवाद मात्र रावबहादूर रा. रा. काळ्यांचा होता. सन १९२६ सालीच भाऊरावांच्या कार्यावर व चरित्रावर श्री. केशवराव ठाकरे यांनी 'प्रबोधना*त अग्रठेख लिहून या वसतिगृहास प्रथम प्रसिद्धी दिली. त्याच्या प्रती राज्यपाल, मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविल्या. चुनिलाल मेहता हे महसूलमंत्री सातारा जिल्ह्यातील कोरेगावी आले असता भाऊरावांची व त्यांच्या कार्यांची त्यांनी आठवण काढली.
काही नतद्रष्टांनी एकांड्या भाऊरावांचे कार्य काही महत्त्वाचे नाही म्हटल्यावर श्री. रावबहादूर काळे ताडकन उठले व म्हणाले, ' 'अहो, 'भाऊरावांचे कार्य लहान झरा आहे. जनतेच्या व प्रांतीय शासनाच्या मदतीने त्याचे नदीत रूपांतर झ्ञाल्यावर त्याचे राष्ट्रीय महत्त्व कळेल.” मंत्र्यासमोर मुखभंग झाल्याने हे नतद्रष्ट गप्प बसले. भाऊराव हजर नव्हते म्हणून बरे; नाहीतर त्यांनी आपली सांदीत पडलेली 'कुऱ्हाड' त्यांना दाखविली असती. केशवराव ठाकरे यांच्या लेखामुळे व म. गांधींच्या भेटीनंतर नाही म्हटले तरी सातार्यातील भाऊरावांचे काम सातारा जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर लोकांना कळू लागले होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. भाऊरावांना चार ठिकाणी असलेल्या मुलांची देखभाल करण्याचा त्रास होत होता. अशावेळी एक चांगली गोष्ट घडून आली.
१६) सातारच्या शाहू महाराजांची 'धनिनीची बाग? या नावाने प्रसिद्ध असठेली बाग बरीच वर्षे ओस पडून होती. योगायोगाने सातारच्या महाराजांचे कारभारी श्री. दत्तात्रय गोविंद कारखानीस यांनाही या समारंभानंतर भाऊरावांच्या कार्याचे महत्त्व जाणवले. भाऊरावांनी विनंती करताच सदरची बाग रु. ५७५/- खंडाने या वसतिगृहासाठी दिली. ही बाग ताब्यात मिळताच भाऊरावांतील क्षेतकरी जागा झाला. मुलांच्या वाढत्या संख्येमुळे या बागेत कडेने मुलांच्यासाठी झोएड्या बांधण्यात आल्या. मुलांना या बागेत राहण्यासाठी आणण्यात आले. बागेत दोन विहिशी असल्याने त्यातील पाण्याच्या आधारे भाजीपाला पिकविण्याची सोय झाली. शेतकऱ्यांचीच मुळे असल्याने त्यांना बागेत काम करण्यास आवडत असे. 'स्वावलंबी शिक्षण”, “कमवा व शिका? या योजनांचे मूळ या सातारच्या धनिनीच्या बागेत आहे. या बागेत मुले एकत्र राहू लागल्याने भाऊरावांना परगावी जाऊन मदत मिळविणे सोपे झाले. तसेच मराठी सातवीच्या परीक्षेचे केंद्र सातारा असल्याने या वसतिगृहात परगावच्या मुलांची व त्यांच्या शिक्षकांची सातवीच्या परीक्षेच्या काळात जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्याची प्रथा सुस करण्यात आली. एवढेच नव्हे तर वसतिगृहप्रवेशाचे काटेकोर नियमही यानंतरच करण्यात आले. मुलांची संख्या भराभर वाढू लागली.
Hits: 105