७. अक्रोडाची फळे - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

७. अक्रोडाची फळे - २

४) या प्रास्ताविक जाहिरातीतून वाचकांच्या नजरेस येईल की भाऊरावांना ब्राह्मणब्राह्मणेतर वाद किंवा जातीयवाद मान्य नव्हता. सन १९५८ च्या २३ जुलैस सातारा जिल्हा लोकल बोर्डाने भाऊरावांना मानपत्र दिठे. त्यास उत्तर देताना ते म्हणाळे, “आता ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद मोडून टाकण्याची वेळ आली आहे. त्या काळात ज्या घटना घडल्या त्या त्या काळास अनुरूप होत्या. त्या आता उगाळून उपयोग नाही.” (उक्त ठोकेकृत ग्रंथ, पृ. २७३) या उत्तरातील विचारांचे मूळ 'कु-हाड' साप्ताहिकाच्या या प्रास्ताविक जाहिरातीत आढळते. (सदर 'कुर्‍हाड' पत्र श्री. कूपरशी मतभेदामुळे निघाले नाही.)

५) सातारच्या परंपरावादी सनातनी ब्राह्मणांच्या मनात भाऊरावांविषयी एकदा ब्राह्मणद्वेष्टे म्हणून झालेला ग्रह लवकर निघाला नाही. ते भाऊरावांच्या वसतिगृहातून चाललेल्या या राष्ट्रीय व भावनिक एकात्मतेच्या व अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास 'सब गोलंकारी' म्हणून हिणवत व नाके मुरडतच राहिले. मात्र पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे श्री. रा. रा. काळे, डॉ. धनंजयराव गाडगीळ, डॉ. र. पु. परांजपे, डॉ. डी. जी. कर्दे, डॉ. जी. एस. महाजनी, प्रा. वा. गो-काळे, प्रा. डी. डी. वाडेकर, प्रा. व्ही. के. जोग, प्रा.कृ. ग. लिमये आदी प्रज्ञावंत प्रागतिक विचाराची मंडळी भाऊरावांच्या कामाचे कौतुक करीत. सातारचे रा. ब. आर. आर. काळे व त्यांचे जामात डॉ. धनंजयराव गाडगीळ तर भाऊरावांच्या संस्थेच्या कार्याशी एकरूप होते.

६) सन १९२१ च्या मुंबईतील महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळीवळीपासून भाऊराव त्यांच्या स्वदेशीच्या व रचनात्मक कार्यक्रमाच्या प्रभावाखाली येत होते. सुरवातीस महाराष्टातील प्रागतिक पक्षाचे व सत्यसमाजाचे लोक महात्मा गांधींच्या या असहकाराच्या चळवळीबद्दल नाराज व विरोधी होते. महात्माजींनीही असहकाराची ही चळवळ एकांगी आहे हे समजून चुकल्यावर महात्माजींनीही ती मागे घेतली. मात्र सत्यशोधक समाजावर ते टीका करीत. म. गांधींना कालांतराने कळून आले को, सत्यशोधकांची चळवळ सनातनी पुरोहितांच्या व जुलमी स्वकोयांच्यापासून सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आहे. तेव्हा त्यांचे मत बदलले. बेळगावला डिसेंबर १९२४ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनास समांतर ब्राह्मणेतर काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यावेळी सरोजिनी नायडू या ब्राह्मणेतर अधिवेशनात हजर होत्या. त्यांच्याच सांगण्यावरून म. गांधींनी या ब्राह्मणेतर अधिवेशनास संबोधून आपल्या रचनात्मक कार्याची कल्पना दिली. यावेळी म. गांधींना कळून आले की
सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर पक्ष प्रांतिक स्वरूपाचा असला तरी त्यांची पाळेमुळे सामान्य शेतकरी रयतेत खोलवर रुजलेली आहेत. सत्यशोधक समाज वर्णभेद, जातीभेद मानीत नाही. अस्पृश्यतानिवाण व साक्षरताप्रसार, हिंदु-मुस्लिम एकता, ग्रामोद्वार, स्वदेशी यावर भर देतो, हे कळून आल्यावर त्यांना हा प्रांतिक समाज एकमुखी काँग्रेसमध्ये आला पाहिजे असे वाटले. केंजळचे मानसिंगराव जगताप, भाऊराव पाटील यांचेकडून सत्यशोधक समाजाचे काम, महात्मा फुले व शाहू महाराज यांचे अस्पृश्यतानिवारणाचे काम ऐकल्यावर त्यांनी सत्यशोधकांच्या अधिवेशनास आपले शुभसंदेश दरवर्षी पाठविण्यास सुरुवात केली. सन १९३० साली म. गांधींच्या अपेक्षेनुसार सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.

७) भाऊरावांच्या सातारच्या वसतिगृहास छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे नाव देण्यास सन १९२७ साली महात्मा गांधी सातारला आले. त्यावेळी वरील परिस्थिती होती व भाऊराव खरे सत्यशोधक आहेत हे जाणूनच सातारकर सनातन्यांच्या विरोधास न जुमानता वसतिगृहाचे उद्घाटनास व नामकरणास म. गांधी कबूल झाले.

Hits: 85
X

Right Click

No right click