७. अक्रोडाची फळे - १
प्रकरण सातवे
७. अक्रोडाची फळे - १
१) भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातून शिकवून तयार केलेल्या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षणसंस्थेत आजीव सेवक होण्याच्या शपथा सातार्यात
२४-१०-१९३७ रोजी घेतल्या. त्या वेळी अध्यक्ष महर्षी वि. रा. तथा अण्णासाहेब शिंदे म्हणाठे, “भाऊराव, तुम्ही भाग्यवान आहात, समाजसेवा ही अक्रोडाच्या झाडासारखी असते. या अक्रोडाच्या झाडास शंभर वर्षांनी फळे येतात. आजोबाने झाड लावल्यास त्याच्या खापरपणतूस फळे खावयास मिळण्याची शक्यता असते. बारा वर्षांच्या अवधीत तुम्हास एवढ्या मोठ्या संख्येने समाजसेवक 'परिब्राजक' मिळतात यापरते भाग्य ते कोणते?” भाऊरावांचा हा गौरव करताना अण्णासाहेबांच्या मनात खंतही होती. कारण डिप्रेस्ड क्लासेस मिशनबद्दलचा त्यांचा कटू अनुभव होता. त्यांना असे आजीव सेवक मिळाले नाहीत.
२) भाऊरावांनी हे 'परिव्राजक* कसे तयार केले ते पाहू या. मागील प्रकरणात सांगितठे आहेच की, सत्यशोधक समाजातील श्रीमंत व सरंजामदार मंडळी ब्राह्मणेतर पक्ष स्थापून सत्तेसाठी राजकारणात शिरण्याच्या तयारीत होती. अशा बेगडी सत्यशोधकांच्या सत्यशोधक समाजाबद्दलच्या निष्ठा संशयातीत नव्हत्या, हे भाऊरावांना कळून चुकले होते. स्वत: त्यांनी मात्र राजकारणापासून अलिप्त राहून सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्य असलेल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. कालेगावी र.शि. संस्था स्थापून तिचे पहिळे वसतिगृह तेथेच सुरू केळे. भाऊराव म्हणजे
सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला, आर्थिक पाठबळ नसलेला, एक ध्येयवेडा माणूस. शाहू महाराजांप्रमाणे सत्ता आणि संपत्तीचे पाठबळ
नसलेला खरा सत्यशोधक शेतकरी. शाहू महाराजांप्रमाणे अनेक वसतिगृहे सुरु करावयाची म्हणजे आर्थिक पाठबळ तर पाहिजे; पण त्यापेक्षा ती
चालविणारी स्वत:ची निष्ठावंत माणसे पाहिजेत, ही भाऊरावांची भूमिका होती. स्वदेशी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कारखान्यातून
आर्थिक पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. ज्या सामान्य जनतेसाठी, 'रयते'साठी संस्था स्थापन केली, तीच रयत आपल्यास
आर्थिक पाठबळ देईल असे भाऊरावांना वाटत होते. ते खरे हेते. म्हणून त्यांनी किर्लोस्करांची नोकरी सोडली. |
३) दुसरे आपमतलबी उद्योगपती व धूर्त राजकारणी खानबहादूर धनजी शाह कूपर, स्वत:ला सत्यशोधक म्हणवीत होते. त्यांनी स्वत:चा
सातारा इंडरिट्रिअल वर्क्स उभा करण्यासाठी सरळ स्वभावाच्या भाऊरावांची मदत मागितली. भाऊरावांस वसतिगृह सुरू करण्यास मदत करण्याचे
आमिष दाखविले व भाऊराव त्यास बळी पडले. सी. कूपर म्हणजे गोडबोल्या, बेरंगी सत्यशोधकांचा प्रातिनिधिक नमुना होता. सन १९२२ साली शाहू महाराजांच्या मृत्युनंतर सत्यशोधक समाज चेतनाहीन होत चालला होता. भाऊरावांना सन १९१७ ते १९२१ या सालात सत्यशोधक समाज पुढार््यांचा व त्यांच्या तत्त्वहीन अनुयायांचा आलेला अनुभव त्यांनी ता. १-११-१९२३ रोजी श्री. के. सी. ठाकरे यांच्या मदतीने सुरू करावयाच्या आपल्या 'कु-हाड* साप्ताहिकाच्या 'प्रबोधन'मधील टीकात्मक जाहिरातीत प्रगट केला आहे तो असा :-
“जो उठला तो भोळ्या अज्ञानी जनतेला फसवून स्वत:ची तुंबडी भरतो. ब्राह्मणेतर म्हणवितो आणि. जातिभेदाचा धिंगाणा घालतो. सत्यशोधक म्हणवितो आणि नवीन भिक्षुकशाहीचे थेर माजवितो; पण 'रयतेचा' खरा वाली कोण? ..... पुंडागुंडांनी आपल्या झोळ्या भरल्या. उनाड टोळभैरव, स्वयंसेवक बनले. ऐदी श्रीमंत जनतेचे अहंमन्य पुढारी __ बनले. स्वार्थापुढे कोणाला काही दिसत नाही. आता नांगर्या पाटलाची
'कुऱ्हाड' (साप्ताहिक) लवकरच या सर्वांचा समाचार घेण्यासाठी सगळ्या _ महाराष्ट्रात आपल्या स्पष्ट बोलाचा धुमाकूळ घालणार आणि रयतेच्या
वतीने तिच्या हक्कांसाठी बिनमुर्वतपणे झगडणार ! कुऱ्हाडीचा परमेश्वर -महाराष्ट्र, कुर्हाडीचे दैवत - महाराष्ट्र जनता; कुःहाडीचा धर्म - महाराष्ट्र
धर्म; कुर्हाडीचे साहित्य - सत्य.
“बस्स ! यापुढे कुऱ्हाडीला ब्राह्मण मान्य नाही; ब्राह्मणेतर मान्य नाही, सत्यशोधक मान्य नाही, कोणी नाही. जातिभेद व पक्षभेद रसातळाला नेऊन रयतेच्या लोकशाहीला खडबडून जागृत करीन, नाहीतर बोथट होऊन सांदीला पडेन हीच कुर्हाडीची प्रतिज्ञा.” (बा. म. ठोकेकृत क. भा. पाटील, १९९३, पू. ४२-४३)
Hits: 79