६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ५
६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ५
१२) यानंतर भाऊरावांनी नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली येथे प्राथमिक शाळेतील मुलांसाठी दुसरे वसतिगृह ता. ८ डिसेंबर १९२१ रोजी सुरू केले. याप्रसंगी सातारा जिल्हाधिकारी एन. एल. मॉयसी यांनी (इंग्रजीत) भाऊरावांस 'सत्यसमाजिस्ट शिरोमणी' असे उल्लेखून गौरव केला. “ते सत्यसमाजाचे सच्चे सत्यशोधक असून शिक्षणाच्या माध्यमातून ते सत्य इतरांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा हेतू आहे,” असे म्हटले आहे. या
भाषणातूनच या प्रकारची अनेक वसतिगृहे सुरू करण्याचा भाऊरावांचा हेतू स्पष्ट केला आहे.
१३) सन १९२२ साली काल्याच्या वसतीगृहाचे अध्यक्ष असलेले श्री. धनजी शाह कपूर यांना किर्लोस्करांप्रमाणे नांगरांचा कारखाना काढावयाचा होता. या बाबतीत भाऊरावांचे सहकार्य त्यांनी मागितले.
भाऊरावांनी किर्लोस्करांना ज्या अटी घातल्या होत्या त्या व कामगारांना भागधारक करणे ही अट मान्य असल्याचे तोंडी कबूल करून कूपरनी
भाऊरावांस सातारा रोड येथे 'दि सातारा इंडस्ट्रिअल वर्क्स' या नावाने कारखाना सुरू करण्यास नेले. श्री. के. सी. ठाकरे यांनाही आपल्या प्रबोधनपत्रिकेसह भाऊरावांनी सातारा रोड येथे कूपरच्या मदतीसाठी आणले. दोन वर्षांत सातारा रोडला हा कारखाना नांगर तयार करू लागला. नफा होऊ लागला. धनजी शाह कूपरनी दिलेली आश्वासने मोडली. भाऊराव चिडले. त्यांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने कूपरला खलास करण्याचे ठरविले. सौ. लक्ष्मीबाई यावेळी सातार रोडलाच असल्याने पळत जाऊन श्री. ठाकऱयांना प्रेसमध्ये अनर्थाची कल्पना दिली.
हातातले काम टकून श्री. ठाकरे भाऊरावांच्या पाठीमागे पळाले व त्यांनी भाऊरावांच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली. त्यातल्या गोळ्या काढून
ती रिकामी केली. भाऊराव श्री. ठाकऱ्यांना दादा? म्हणत. या प्रसंगाचा उल्लेख भाऊरावांनी १९४५ साली श्री. केशवराव ठाकऱ्यांच्या
एकषष्ठीप्रसंगी केला. श्री. केशवराव दादांनी आपल्या “रानवट' धाकट्या बंधूच्या संतापी स्वभावाचे व या प्रसंगाचे वर्णन आपल्या आत्मचरित्रात
' माझी जीवनगाथा? मध्ये केले आहे. (पृ. २९५-२०७)
१४) पुढे सप्टेंबर १९२४ मध्ये दोघांनी या कारखान्याशी व कूपरशी कायमचा संबंध तोडून टाकला व भाऊराव सातारला आले. त्यावेळी कूपरने आपल्या नेहमीच्या मधु तिष्टति जिव्हाग्रे' या पद्धतीने भाऊरावास उपदेश केला, “गावावर उपकार म्हणजे मढ्यावर शृंगार असे तुमचे काम आहे. पुन्हा विचार करा. ' पण कर्मवीरांचा - भाऊरावांचा निर्णय वज्रलेप होता. आता त्यात बदल होणे शक्य नव्हते. पुन्हा माघार नव्हती. लोण्याहून मृद्, वज्राहून कठीण अशा अंतःकरणाचा तो नि:श्वास होता.
१५) भाऊराव व कूपर यातील हा लढा म्हणजे दोन प्रवृत्तींचा लढा होता. भांडवलदार विरुद्ध कामगार, सरंजामदार विरुद्ध समाजसेवक, असत्य विरुद्ध सत्य. सत्याने असत्यापुढे, न्यायाने अन्यायापुढे क्षणभर माघार घेतली होती एवढेच! स्वत:च्या जीवनात भाऊरावांनी 'अपरिग्रहाचे' व्रत स्वीकारलेले असले तरी औद्योगिक संस्थाच्या बाबतीत “परिग्रह प्रमाण* हे तत्त्व अंमलात आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता.
खाजगी व राखीव हितसंबंध असणार्या भांडवलदारी उद्योगधंद्यात हे तत्त्व राबवणे किती कठीण आहे हे त्यांना वरील दोन कारखान्यांत दिसून आले.
या प्रयोगांतही भाऊरावांचा द्रष्टेपणा दिसून येतो. बरोबर ४२ वर्षांनी कोठारी शिक्षण आयोगाच्या अहवालात भाऊरावांच्या विचाराशी समान
विचार व्यक्त केले आहेत.
“देशातील कारखान्यांनी औद्योगिक शिक्षणसंस्था कारखान्यास जोडून चालवाव्यात. तांत्रिक शिक्षणाचा आकृतिबंध औद्योगिक कारखाने व शिक्षणसंस्था यांच्या सहकार्यातूनच तयार होऊ शकतो. तांत्रिक शिक्षणाच्या संस्थातील शिक्षण कारखान्यात तयार होणाऱया मालाशी निगडित असले पाहिजे. इंग्लंडमध्ये सेवकांना देण्यात येणाऱ्या एकूण मजुरीच्या अडीच टक्के रक्कम तांत्रिक शिक्षणावर खर्च करण्याची कायद्याने तरतूद आहे.” (कोठारी अहवाल, १९६४-६५, पृ. २७१-३८३)
Hits: 84