२. जन्म, बाळपण, परंपरा व संस्कार - १
प्रकरण दुसरे |
_ जन्म, बाळपण, परंपरा व संस्कार
| धन्य ते कूळ) धन्य ती माता ॥
जिने प्रसविला। ऐसा पुत्रदाता ॥
- अनंतसुत
१) स्वातंत्र्यपूर्व कोल्हापूर संस्थानातील हातकणंगले, तालुक्यात कुंभोज नावाचे गाव आहे. या गावी हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन शुद्ध ललितापंचमी शके १८०९ अथवा इंग्रजी सालगणनेप्रमाणे २२ सप्टेंबर १८८७ या तारखेदिवशी आपले चरित्रनायक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. पाळण्यातठे नाव भाऊ. मोठेपणी लोक त्यांना आदराने भाऊराव असे म्हणत. श्री. पायगोंडा देवगौंडा पाटील (१८५९-१९४२) व सो. गंगाबाई या दागत्याच्या पोटी जन्मास आलेल्या व जगलेल्या मुलांपैकी भाऊराव हे ज्येष्ठ पज. भाऊरावांना तात्या, बाळगोंडा ऊर्फ बळवंत व बंडेंद्र.ऊर्फ बंडू हे तिघे लहान भाऊ आणि ताराबाई व द्वारकाबाई या दोन लहान बहिणी होत्या.
२) 'भाऊराव म्हणजे भांगेतील तुळस नसून धर्मवीर पूर्वजाचे कर्मवीर वंशज' असे रास्तपणे दुधगावचे भाऊ दादा कुदळे आपल्या लेखात म्हणतात. (कर्मवीर भाऊराव पाटील गौरव विशेषांक : ग्रामोद्वा, सन १९४८, पृष्ठ _ ३१-३५) भाऊरावांच्या या पाटील घराण्याच्या मूळ पुरुषाचा संबंध कोल्हापूर संस्थानातील नांदणी येथील जैन मठ, ता. शिगोळशी होता. भाऊरावांच्या घराण्यास दिगंबर जैन मुनींची परंपरा लाभलेली आहे. त्यांचे दोन पूर्वज नेमगोंडा व शांतनगौंडा निर्गरंथ जैन मुनी होते. नांदणी जैन मठाचे ते पीठाचार्य होते. त्या उभयतांना जिनसेन भट्टारक पट्टाचार्य ही बिरुदावली होती. नेमगोंडा आचार्य सन
१८२० साली भिलवडी, ता. तासगाव, जिल्हा सांगली येथे, तर
शांतनगौंडा आचार्य नांदणीसच १८५४ साली समाधिस्त झाले. दरसाल
चैन शुद्ध पंचमीस नेमगौंडा आचार्यांच्या स्मृतीदिनी भिलवडीस यात्रा भरते.
या पाटील घराण्याकडे महाराष्ट्रीय समाज मोठ्या आदराने आजही पाहतो.
त्यास ही मुनी परंपरा व भाऊरावांचे अर्वाचीन काळातील क्रषितुल्य जीवन
व अतुलनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य कारणीभूत आहे.
. ३) भाऊरावांचे आजोबा देवगौंडा ज्योतीगौंडा पाटील सातारा
जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रूक विड्याच्या पानासाठी व केळ्यासाठी प्रसिद्ध
असलेल्या गावी शेती करून राहात होते. त्यांचा या नांदणी मठाशी जवळचा
संबंध होता. हे पाटील घराणे शिक्षणाकडे कसे वळले त्यास एक मर्मभेदी
घटना कारणीभूत आहे. देवगौंडा पाटील अतिशय व्यवहारचतुर होते. पण
ते अक्षरशून्य होते. त्यांच्या मातोश्रीने नांदणीच्या मठासाठी आपल्या
नातवास पायगोंडा पाटलास पीठाचार्य पदासाठी देण्यास नकार दर्शवून
त्यास बालवयात उसाच्या फडात लपवून ठेवले होते. पायगोंडा
पाटलाऐवजी जे पीठाचार्य झाले त्यांनी देवगौंडा पाटलांना कमीत कमी या
मठाचे मानसेवी कारभारी होण्यास भाग पाडले. या मठाच्या पंच मंडळींपैकी देवगोंडा प्रमुख होते. सन १८७३ मध्ये एके समयी या मठात पंचांनी
केलेल्या न्यायनिवाड्यावर सही करण्याची पाळी या देवगौंडा पाटलावर
आली. अक्षरशून्य असल्याने त्यांनी शिष्टाचार सांगितला की, ऐतवड्याची
त्यांच्यापेक्षा वडीलधारी मंडळी हजर असताना लहानांनी सही करू नये.
लघुशंकेस जाण्याचे निमित्त करून त्यांनी आपणास व आपले
अक्षरशतुत्वास झाकून ठेवले. ही मानहानी त्यांना खोलवर काट्याप्रमाणे
बोचत राहिली. आपल्या वाट्यास आलेली मानहानी आपल्या मुलास येऊ
नये म्हणून, दस्तऐवज पुरा होताच ते ऐतवडे बुद्रूकला घोड्यावरून परत
आठे. शेतात काम करीत असलेल्या आपल्या मुलास- -पायगोौंडास
तात्काळ बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी सव्वालाखी अष्टे या वाळवे
तालुक्यातील प्राथमिक शाळेत पायगौंडास वयाच्या चौदाव्या वर्षी