सामाजिक स्थिती - ६
म्हणून महात्मा फुल्यांनी 'गुलामगिरी' या ग्रंथाच्या इंग्रजी प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये म्हटले आहे, "Let there be schools for all shudras in every village but away from all Brahmin school masters." प्राथमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या मराठी सातवीतील ब्राह्मणेतर मुलांचे भवितव्य या ब्राह्मण शिक्षकावर, त्याची शाळा तपासणार्या ब्राह्मण डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर व मराठी ट्रेनिंग कॉलेजच्या ब्राह्मण प्राचार्यावर अवलंबून असे. त्यांच्या एकत्रित शिफारशीवर व निवडीवर तो शिक्षक होऊ शके. या अधिकार्यांच्या ब्राह्मण स्वयंपाक्याची संहजपणे निवड होई, असे डॉ. डी. सी. पावट्यांनी आपल्या 'मेमोआयर्स ऑफ अन एज्युकेशनल अँडमिनिस्ट्रेरट? (१९६४) या आत्मवृत्तात म्हटले आहे. (पृ. १२०-१२२ व १५०-१५३). कोल्हापुरात शाहू महाराजांनी सन १९०२ पासून प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे व खेड्यातून प्राथमिक शाळेत ब्राह्मणेतर शिक्षक नेमण्यास सुरवात केली. अस्पृश्यांसाठी अधिकच्या शाळा सुरू केल्या. नंतर त्या बंद करून सवर्णांच्या शाळेतच त्यांना प्रवेश देण्यास शाहू महाराजांनी आदेश दिले. पाणवठे, धर्मशाळा इत्यादी त्यांना खुल्या केल्या. या सर्व बाबी ब्राह्मणांच्या डोळ्यास रांजणवाडीप्रमाणे खुपत होत्या. अशा सामाजिक परिस्थितीचा भाऊरावांवर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील?
| Hits: 94