सामाजिक स्थिती -५
श्रेष्ठतेचा अहंकार नष्ट करून बहुजनसमाजाशी एकरूप होण्यास मात्र तो त्यावेळी सिद्ध झाला नाही. खेड्यापाड्यांतील ब्राह्मण हा वरील श्रेष्ठ गुणांनी
संपन्नही नव्हता. सावकार, कुलकर्णी व भिक्षूक ही त्रयी खेड्यापाड्यांतील ब्राह्मणेतर समाजापुढे नित्य उभी होती. तिच्या अंगी कसलेही श्रेष्ठ गुण
नव्हते. शुचिता, परोपकार, विद्योपासना, भूतदया, त्याग व समाजहितबुद्धी या गुणांचा लवलेशही तिच्या ठायी नव्हता. स्वार्थ, लोभ,
पापवासना, असत्य, अमंगळवाणी, कारस्थानीवृत्ती हे सर्व तामसी गुण तिच्या ठायी ओतप्रोत होते आणि असे असूनही “आम्ही ब्राह्मण सर्व वर्णांचे
गुरू आहोत, ब्राह्मणेतरापेक्षा श्रेष्ठ आहोत' असा अहंकाराचा उग्र दर्प अगदी दुर्गंधी येण्याइतपत त्यांच्या ठायी होता.
हळूहळू जागृत होणार्या
ब्राह्मणेतरांना हा जातीय श्रेष्ठतेचा जुलूम असह्य वाटू लागला. ब्राह्मणांच्या जातीय ज्येष्ठतेच्या भावनेचा त्यांना संताप येऊ लागला. त्यातच वकील,
सावकार, कुलकर्णी हा वर्ग इंग्रजी राज्याच्या भक्कम चौकटीच्या आश्रयाने श्रीमंत झाला आणि शेतकरी असह्य कर्जाच्या ओझ्याने दरिद्री होत चालला.
त्यांच्या जमिनी हळूहळू वरील तिघांच्या घरात गेल्या. हे सर्व कायद्याच्या आशयानेच चालले होते. आणि या कायद्याची अंमलबजावणी करणारे
न्यायाधीश, शिरस्तेदार, मामलेदार, फौजदार, बेलीफ हे सर्व बहुधा ब्राह्मणच होते. त्यामुळे आपली सर्व बाजूंनी नागवणूक करून, आपली
अन्नान्नदशा करून टाकण्यास हा ब्राह्मण कारणीभूत आहे असा दूढसमज बहुजनसमाजाच्या मनात घर करू लागला व इथे (महाराष्ट्रात) ज्ञातीय
कलह निर्माण झाला.”
१४) फक्त प्राथमिक शिक्षण क्षेत्राचा विचार केल्यासही असे दिसून येते की, सन १९२० पूर्वीच्या खाजगी किंवा शासकीय शाळात ब्राह्मण शिक्षक व ब्राह्मण विद्यार्थ्यांचाच भरणा असे. अंपवादात्मक इतर समाजाची मुळे असत. खेड्यांतील प्राथमिक शाळेत सामान्यपणे ब्राह्मण शिक्षकच असत. त्या खेड्याचे बरेवाईटपण या ब्राह्मण शिक्षकांवरच असे.