सामाजिक स्थिती - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

११) लोकमान्य टिळकांनी राजोपाध्यांना चूक सुधारण्यास सल्ला देण्याऐवजी शाहू महाराजांनाच दूषण दिले आणि केसरीत “मराठे आणि वेदोक्त कर्म' हा लेख लिहून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात तेल ओतले. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याविषयी महाराष्ट्रातील मराठे आणि बहुजनसमाजात आदर असल्याने महाराष्ट्रातील ब्राह्षण व ब्राह्मणेतर यामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण झाली.
१२) सन १९०१ पासून पुण्यातील सत्यशोधक समाजाचे अनुयायी व कोल्हापूरस्थित भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, महादेव गणेश डोंगरे, गणपतराव कदव वकील, हरिभाऊ चव्हाण आदींनी मुंबईच्या व कोल्हापूरच्या 'दीनबंधू' पत्रातून कोल्हापूरच्या महाराजांच्या समर्थनार्थ लेख लिहिले. ब्राह्मणांच्या टीकेस तोंड देण्यासाठी या ब्राह्मणेतरांनी वृत्तपत्रे सुरू केली व सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. शाहू महाराजांचे महात्मा फुल्यांच्या विचाराकडे मन वळवून १ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात शाहू सत्यशोधक समाज स्थापण्यात आला. या पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची पहिली परिषद याच साली पुण्यात _ श्री. रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली. त्याबरोबर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचेही पुनरुज्जीवन झाले. अशा पार्श्रभूमीवर कोल्हापुरात भाऊराव शिक्षण घेत होते, कोल्हापुराशी संबंध ठेवून होते.
१३) महाराष्ट्रातील एक प्रागतिक विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादासंबंधाने गं. बा. सरदार यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्र जीवन या ग्रंथात, (१९६० प. ३१३-१४) अतिशय मार्मिक विवेचन केले आहे ते पाहू या. डॉ. सहस्रबुद्धे म्हणतात, “लोकहितवादी, रानडे व आगरकर यांनी समतेचे जे तत्त्वज्ञान साांगितले व समाजसुधारणेची जी इतर तत्त्वे सांगितली त्या अन्वये ब्राह्मणांची मन:क्रांती झाली असती तर हा अनर्थ (ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद) बव्हंशी टळला असता असे वाटते. पण तसे झाले नाही. ब्राह्मण हा राजकीय क्रान्तीला उन्मुख झाला. त्या क्रांतीसाठी त्याग, तपश्‍चर्या, देहदंड व आत्मबलिदान हे मोल देण्यास तो सिद्ध झाला. पण

Hits: 100
X

Right Click

No right click