बहिणाबाई चौधरी

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशी बोलीत अत्यंत अर्थगर्भ, रसाळ व प्रासादिक काव्यरचना केल्या आहेत.‘निसर्गकन्या’म्हणून त्यांना गौरवले जाते.
बहिणाबाईचा जन्म जळगाव जिल्यातील असोदे या गावी इ.स.१८८० मध्ये झाला. त्या एका शेतकरी कुटुंबातून आल्या होत्या. बहिणाबाई चौधरी या शेतात काबाडकष्ट करणार्‍या गृहिणी होत्या. शेतात काम करताना आणि दळण करताना, चूल फ़ुंकताना त्याच्या तोंडातून ओव्या बाहेर पडत.

आपल्या शेतीच्या जीवनातील तसेच घरकामातील अनेक प्रसंग त्यांनी कवितेच्या माध्यमातून पुढे मांडले आहेत. त्यांची रचना अतिश्य साधी असली तरी निरनिराळी सुभाषिते, तात्विक बोल आणि व्यावहारिक दृष्टांत त्यांच्या कवितेत ठायी ठायी आढळून येतात.

"अरे संसार संसार,
जसा तवा चुल्यावर;
आधी हाताला चटके
तेव्हा मिळ्ते भाकर"

अशा अतिशय साध्या शब्दात त्या जणू जीवनविषयक तत्वज्ञान आपणापुढे मांडतात.‘बहिणाबाईची गाणी ’हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

Hits: 407
X

Right Click

No right click