बालकवी ठोंबरे

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म जळगाव जिल्यातील धरणगाव येथे इ.स.१८९० मध्ये झाला. एरंडोल, यावल, जामनेर, धुळे, जळगाव अशा गावी त्यांचे शिक्षण झाले. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. फ़ुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात -

"हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फ़ुलराणी ही खेळ्त होती"

बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो .नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते.

इ.स.१९१८ मध्ये त्यांचा अपघाती व अकाली मृत्यु झाला. ‘समग्र बालकवी’हा त्यांच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

Hits: 422
X

Right Click

No right click