ह.ना.आपटे

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

ह.ना.आपटे हे मराठीतील ज्येष्ट कांदबरीकार होते.‘आधुनिक मराठी कांदबरीचे जनक ’अशा शब्दात त्यांचा रास्त गौरव केला जातो. ह.ना.आपटे यांचे संपूर्ण नाव हरि नारायण आपटे असे होते. त्यांचा जन्म जळगाव जिल्यातील पारोळे या गावी इ.स.१८६४ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे झाले.

हरिभाऊंनी आपल्या सामाजिक कांदबर्‍यातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फ़ोडली होती. विशेषत: येथील समाजातील स्त्रियांचे प्रश्न त्यांनी प्रकर्षाने मांडले होते. ह.ना.आपटे यांनी सामाजिक कांदबर्‍याप्रमाणेच अनेक ऎतिहासिक कांदबर्‍याही लिहिल्या आहेत.कांदबर्‍या वाचताना सामान्य वाचकाला इतिहासकालातच डोकावत असल्याचे समाधान मिळते.

ह.ना.आपटे यांनी मराठी कांदबरीला अद्‌भूत व असामान्य घटना यांच्या पकडीतून सोडविले आणि तिच्यात वास्तवता आणली. त्यांची भूमिका एका अर्थाने समाजसुधारकाची होती असे आपणास म्हणता येईल ह.ना.आपटे यांनी इ.स.१८९० मध्ये ‘करमणूक’हे साप्ताहिक सुरु केले. यांशिवाय काही नाटके ही त्यांनी लिहिली होती. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’चा त्यांनी मराठीत गद्य अनुवाद केला होता.

ग्रंथसंपदा : यशवंतराव खरे, मी ,गणपतराव, आजच, मायेचा बाजार, भंयकर दिव्य, कर्मयोग या सामाजिक कांदबर्‍या. गड आला पण सिंह गेला, उष:काल, केवळ स्वराज्यासाठी, सूर्यादय, म्हैसूरचा वाघ, रुपनगरची राजकन्या, वज्राघात, चंद्रगुप्त, मध्यान्ह, सूर्यग्रहण, कालकूट इत्यादी कादंबर्‍या. संत सखुबाई, सती पिंगला ही नाटके.

Hits: 438
X

Right Click

No right click