गो. नी. दांडेकर
गो.नी. दांडेकर हे मराठीतील एक लोकप्रिय कांदबरीकार आहेत. त्यांचे संपूर्ण नाव गोपाल नीलकंठ दांडेकर असे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्यातील परतवाडा या गावी इ.स.१९१६ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण परतवाडा व नागपूर या ठिकाणी इंग्रजी चौथ्या इयत्तेपर्यत झाले. गो.नी.दांडेकर यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचाही प्रभाव होता .त्यांनी काही वर्ष संघकार्यात घालवली होती.
दांडेकर यांची कांदबरीकार म्हणून प्रसिध्दी आहेच; पण कांदबरीलेखनाच्या जोडीने त्यांनी धर्म,संस्कृती,पुराण,इतिहास इत्यादी विषयावरदेखील लेखन केले आहे. शिवकालीन इतिहास हा गो.नी.दांडेकरांच्या प्रेमाचा आणि अभिमानाचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला.महाराष्ट्रातील शिवकालीन गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता. वाचन,लेखन व भ्रमण हेच त्यांच्या आवडीचे विषय होते.
ग्रंथसंपदा : शितू, पडघवली, दास डोंगरी राहतो, कुणा एकाची भ्रमणगाथा, मोगरा फ़ुलला, मृण्मयी, आम्ही भागिरथीचे पुत्र, पूर्णामायाची लेकंर, बया दार उघड, हर हर महादेव, माचीवरचा बुधा,पवनाकाठचा धोंडी, बिंदूची कथा इत्यादी कांदबर्या. विविध प्रकारच्या अनुभवावर आधारित ‘स्मरणगाथा’ हे आत्मचरित्र इत्यादी ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत .इ.स.१९८१ मध्ये अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
Hits: 413