लक्ष्मण माने
लक्ष्मण माने हे आजच्या पिढीतील एक प्रमुख दलित लेखक आहेत. लक्ष्मण माने यांचा जन्म १९४९ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण फ़लटण, कोल्हापुर अशा निरनिराळया ठिकाणी झाले. कैकाडी या भटक्या जमातीत त्यांचा जन्म झाला. लक्ष्मण माने यांनी परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. कोल्हापुरच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करुन त्यांनी बी.ए.पर्यत शिक्षण घेतले. लक्ष्मण माने हे त्यांच्या ‘उपरा’ या पुस्तकाने विशेष प्रसिद्धीस आले. ‘उपरा’हे एका व्यक्तीचे आत्मकथन न राहता त्याला व्यापक सामाजिक संदर्भ प्राप्त झाला आहे.
लेखनसंपदा : उपरा व बंद दरवाजा .काही काळ ‘बंद दरवाजा’ नियतकालिकाचे संपादन.
Hits: 400