माधव ज्यूलियन
माधव ज्यूलियन हे रविकिरण मंडळातील एक अग्रेसर कवी होते. त्यांचे संपूर्ण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदे येथे झाला. त्यांचे शिक्षिण आवळस, बडोदे, अहमदाबाद व मुंबई येथे झाले. भाषाशुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते ओळख्ले जातात. त्यांच्या काव्यात त्यांचे प्रतिबिंबित झाले असल्याचे दिसून येते. अर्थात त्यांच्या काही कवितांमधून अन्यायाची विलक्षण चीड, मायबोलीचा अभिमान, देशबांधवांविषयीची अपार तळमळ दिसून येते. आपल्या ‘भ्रांत तुम्हा का पडे?’ या कवितेत आपल्या देशबांधवांना उद्देशून ते म्हणतात-
"हिंदुपुत्रांनो, स्वत:ला लेखिता कां बापडे?
भ्रांत तुम्हां का पडे?
वाघिणीचे दूध प्यालां, वाघबच्चे फ़ाकडे."
पुढे त्यांना ते आपल्या वैभवशाली भूतकाळाचे स्मरण करुन देतात आणि उज्जवल भवितव्यासाठी काळाबरोबर पुढे जाण्याचा उपदेश करतात.
"कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला,
थांबला तो संपला!
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे."
काव्यरचना : विहतरंग, सुधाकर, नकुलालंकार, तुटलेले दिवे ही खंडकाव्ये; स्वप्नरंजन, मधुलहरी, इत्यादी काव्यसंग्रह.यांशिवाय ‘द्राक्षकन्या’ हा उमर ख्य्यामच्या रुबायांचा अनुवाद, भाषाशुद्धिविवेक, पद्यप्रकाश हे ग्रंथ आणि फ़ार्सी मराठी शब्दकोश.
Hits: 390