मंगेश पाडगावकर
मंगेश पाडगावकर हे मराठीतील एक नवकवी म्हणून ओळखले जातात. मंगेश पाडगावकर यांचा जन्म सिंधूदुर्ग जिल्यातील वेंगुर्ले या गावी इ.स. १९२९ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व वेंगुर्ले येथे झाले. ‘साधना ’ साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी थोडे दिवस काम केले. त्यानंतर त्यांनी ‘युनायटेड स्टेट्स इन्फ़ॉर्मेशन ’मध्ये काम केले. मंगेश पाडगावकर यांचा ‘धारानृत्य’हा पहिला कवितासंग्रह इ.स. १९५० मध्ये प्रसिद्ध झाला.
निसर्ग आणि प्रेमभावना यांनाही त्यांच्या कवितेत प्रधान स्थान लाभले आहे .उपहासात्मक पध्दतीची कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. बालगीते हा काव्यप्रकारही त्यांनी यशस्वीरीत्या हाताळला आहे. मीराबाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्यांच्या ‘सलाम’या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
ग्रंथसंपदा : धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम इत्यादी कवितासंग्रह.‘चांदण्यात ’हा ललित लेखसंग्रह इत्यादी.
Hits: 414