नारायण सुर्वे
"ऎसा गा मी ब्रह्म । विश्वासाचा आधार
खोलीस लाचार । हक्काचिया ॥"
कवी नारायण सुर्वे हे मराठीतील एक लोकप्रिय कवी म्हणून ओळखले जातात. नारायण सुर्वे यांचे संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे असे आहे. त्यांचा जन्म इ.स. १९२६ मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य मुंबईच्या कामगार वस्तीत गेले. मुंबईच्या एका कापड गिरणीत साधा कामगार म्हणून त्यांनी काम केले. आपल्या मुंबई या कवितेत ते म्हणतात-
"कळू लागले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो,
घडवतो लोहार हातोडयाला तसाच घडवत गेलो."
कामगार जीवनाची बोली भाषा हीच त्यांच्या काव्याची भाषा आहे आणि म्हणूनच त्यांच्या कवितेला एक आगळे तेज व जोश प्राप्त झाला आहे. माणसावरील अपार श्रध्देतून त्यांची कविता साकारली आहे. ‘माझे विद्यापीठ’ मध्येच ते पुढे म्हणतात-
"तरी का कोण जाणे माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही,
आयुष्य-पोथीची उलटली सदतीस पाने, वाटते अजून काही पाहिलेच नाही."
नारायण सुर्वे यांच्या ‘माझे विद्यापीठ’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट शासनाचे पुरस्कार मिळाला आहे. त्यांना सोव्हिएत लॅंड नेहरु पारितोषिकही प्राप्त झाले आहे. १९९५ मध्ये परभणी येथे भरलेल्या अडुसष्टाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान ही त्याना लाभला .
ग्रंथसंपदा : नारायण सुर्वे यांचे ऎसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, माझे विद्यापीठ, सनद इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
Hits: 495