शांता शेळके
शांता शेळके
शांता शेळके या मराठीतील प्रसिद्ध कवियत्री म्हणून परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव शांता जर्नादन शेळके आहे. त्यांचा जन्म इ.स.१९२१ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. शांताबाईनी स्वत:च वर्णन केल्याप्रमाणे ‘विशिष्ट अनुभूतीची स्मारके आणि विशिष्ट आकांक्षांची चित्रे ’असे त्यांच्या कवितांचे स्वरुप आहे. शांता शेळके या कवयित्री म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी अनेक कथा व कांदबर्या लिहिल्या आहेत. शांता शेळके यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. आळंदी येथे १९९६ मध्ये संपन्न झालेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान लाभला आहे.
ग्रंथसंपदा : वर्षा, रुपसी, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा, कळयांचे दिवस,फ़ुलांच्या राती, गोंदण इत्यादी कवितासंग्रह. स्वप्नतरंग, ओढ, विझती ज्योत इत्यादी कांदबर्या. मुक्ता, गुलमोहर इत्यादी कथासंग्रह. पावसाआधीचा पाउस, मदरंगी इत्यादी ललित लेखसंग्रह. वडीलधारी माणसे हा व्यक्तिचित्र संग्रह.