राम गणेश गडकरी

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

राम गणेश गडकरी (१८८५-१९१९)

"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फ़ुलांच्या देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फ़ुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा"

प्रत्येक महाराष्ट माणसाला स्फ़ूर्तिदायक वाटावे असे हे महाराष्ट्र गीत लिहिणारे कवि गोविंदाग्रज ऊर्फ़ राम गणेश गडकरी यांचा जन्म इ.स.१८८५मध्ये गुजरातमधील गणदेवी जिल्यात नवसारी येथे झाला. ‘प्रतिभेचा सम्राट’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला जातो. राम गणेश गडकरी यांना अवघे चौतीस वर्षाचे आयुष्य लाभले गडकरी हे नाटककार, कवी व विनोदी लेखक या सर्वच नात्यांनी श्रेष्ट साहित्यिक होते .नाटककार म्हणून तर ते कमालीचे लोकप्रिय ठरले होते. त्यांची ‘एकच प्याला’ ‘भावबंधन’ ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी नाटके रंगभूमीवर अत्यंत यशस्वी झाली आहेत.

‘क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा’ असे लिहिणार्‍या या कवीस यथार्थतेने ‘प्रेमाचा शाहीर’असे म्हटले जाते. गडकर्‍यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष असा की, त्यांच्या लेखनात जागोजागी अप्रतिम सुभाषिते विखुरलेली आहेत.‘जगण्यासारखे जोपर्यत जवळ काही आहे, तोपर्यतच मरण्यात मौज आहे;’ पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे;’ ‘पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे’ यांसारखी मनोवेधक सुभाषिते गडकर्‍यांच्या साहित्यात सर्वत्र आढळून येतात.

ग्रंथसंपदा : एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, राजसंन्यास इत्यादी नाटके. वाग्वैजयंती हा कवितासंग्रह आणि संपूर्ण बाळकरामहा विनोदी लेखसंग्रह.

Hits: 424
X

Right Click

No right click