श्री.म.माटे
श्री.म.माटे (१८८६-१९५७)
श्री.म.माटे यांचे संपूर्ण नाव श्रीपाद महादेव माटे असे होते. त्यांचा जन्म इ.स.१८८६मध्ये विदर्भातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे याठिकाणी झाले .श्री म माटे यांनी समाजसेवेच्या क्षेत्रातही कार्य केले होते. ते एक कर्ते समाजसुधारक होते. आकर्षक मांडणी मार्मिक शब्दकळा व आंतरिक जिव्हाळा ही माटे यांच्या लेखनाची खास वैशिष्टय आहेत. श्री.म. माटे यांनी केसरी-प्रबोध, महाराष्ट सांवत्सरिक आणि विज्ञानबोध या ग्रंथांचे संपादन केले होते. इ.स.१९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
ग्रंथसंपदा : अस्पृश्यांचा प्रश्न, रसवंतीची जन्मकथा, संत-पंत-तंत, परशुरामचरित्र, गीतातत्वविमर्श, रामदासाचे प्रपंच विज्ञान, साहित्यधारा, विचारशलाका, विचारमंथन, भावनांचे पाझर, उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर इत्यादी.
Hits: 556