वसंत बापट
वसंत बापट
वसंत बापट हे मराठीतील एक लोकप्रिय कवी म्हणून प्रसिद्ध आहेत .त्यांचा जन्म इ.स.१९२२ मध्ये सातारा जिल्यातील कराड या गावी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले .वसंत बापट यांच्यावर राष्ट्र दलाचे संस्कार झाले होते. त्यांच्या राष्ट्रभक्तीपर कविता लोकप्रिय झाल्या आहेत. इ.स.१९६२ च्या चिनी आक्रमणाच्या काळात ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू ’असे मोठया त्वेषाने सांगणारे वसंत बापट,
भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्र दर्शन, भारतदर्शन यांसारखे कार्यक्रम सादर करण्यात त्यांनी महत्तवाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या काही काव्यसंग्रहाना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
लेखनसंपदा : बिजली, अकरावी दिशा, सक्रीना, मानसी, सेतू इत्यादी काव्यसंग्रह. बालगोविंद हे बालनाटय. बारा गावचे पाणी हा प्रवासवर्णनपर ग्रंथ इत्यादी.
Hits: 475