| आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. |
| गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतो. |
| धैर्य ही आनंदाची चावी आहे. |
| अनेक मूल्यवान पदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारण मोह हा अनिवार्य आहे. |
| चालीरीती म्हणजे सद्गुणांच्या पडछाया. |
| त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगती नाही.त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व. |
| परमार्थामध्ये अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. |
| लांब जीभ आयुष्य कमी करते. |
| ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीण असते. |
| कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माता असते. |
| अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे. |
| विचार परिपक्व झाले की शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात. |
| ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे. |
| भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे. |
| प्रतिभा ही अनंत परिश्रमाने सामावलेली असते. |
| सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेने जातो. |
| अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही. |
| ढोंग म्हणजे सद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे. |
| दु:ख अनावर झाले की माणसाला हसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते. |
| लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाश होतो. |
| पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवावा. |
| कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्य आहे. |
| महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआप फिरतात. |
| माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्या धारांनी. |
| खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्ट करतात. |
| समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवर उपाय योजणे हा होय. |
| चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराची लक्ष्मी असते. |
| मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्व नष्ट होते. |
| हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्या आकड्यात निर्माण होणारी नाही. |
| नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघड आहे. |