सुविचार - ६

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय. तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवड करा.
शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा; एकच सत्कृत्य आपल्या हातून झाले तर त्याचे मूल्य अधिक आहे.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस येत नाहीत.
दिवा अंधार खातो, त्यामुळे काजळीची उत्पत्ती होते. तद्वतच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याच प्रकारचे आपले आचारविचार होतात.
वाढत्या वयामुळे सुरकुत्या पडणारच असतील तर त्या शरीरावर पडोत, मनावर नकोत.
आपत्ती नेहमी हानी करण्यासाठी येते असे नव्हे
आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्रय त्यास ताबडतोब गाठते.
हाताचे भूषण दान करणे हे आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणे हे आहे. शास्त्रवचने ऐकणे हे कानाचे भूषण आहे. इतके असताना बाह्य आभूषणांची गरजच काय?
राईएवढा दोष लपविण्याने तो दोष पर्वताएवढा मोठा होतो; पण तो दोष कबूल केल्याने नाहीसा होतो.
स्वर्ग किंवा नरक स्वत:च्या कृत्यांनी बनविता येतो, म्हणूनच सत्कर्मे करा.
जीवन म्हणजे फसवणूक ! आशेने मूर्खात काढल्यामुळे ह्या फसवणुकीला आपण कौल देतो. उद्या हा कालच्यापेक्षा जास्तच फसवणूक करतो.
घर ही स्वातंत्र्यभूमी आहे. जगामध्ये ह्याच जागेवर मनुष्य वाटेल ते प्रयोग करू शकतो.
संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल, असा एकही शब्द उच्चारता कामा नये.
लहान लहान बोबड्या बाळांच्या ओठातून व अंत:करणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई !
जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंध आहे.
पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे.
जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनाला शांतता अधिक लाभते.
खरा सामर्थ्यवान तोच की, जो दुसर्‍याची चूक झाली तरी त्याला क्षमा करून कायमचा आपला करतो.
निरोगी शरीर व निष्पाप मन ही दोन असली म्हणजे त्यात सर्व काही आले.
आपली जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्या मर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात.
कर्ज काढणे ही एखादी जड वस्तू डोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहे, परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तू खालून डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे.
मूर्ख मनुष्य आपले हृदय जिभेवर ठेवतो. तर शहाणा आपली जीभ हृदयात लपवून ठेवतो.
चांगल्यातला चांगुलपणा जाणायलासुध्दा अंगी चांगुलपणा असावा लागतो.
बुडणार्‍याला सहानुभूती म्हणजे त्याच्याबरोबर बुडणे नव्हे.
स्वत:च्या बुध्दीनं चालून चूक करण्यापेक्षा दुसर्‍यानं दाखविलेल्या मार्गानं चालणं अधिक चांगलं.
जे तलवार चालवतील ते तलवारीनेच मरतील.
अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.
पायदळी चुरगाळली जाणारी फुले चुरगाळणार्‍याच्या पायांना मात्र सुगंध देतात.
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
विद्येचे फळ म्हणजे चारित्र्य आणि सदाचार.
मनाने संत बनायला पाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे योग्य नाही.
कीर्तीची नशा दारूच्या नशेपेक्षा भयंकर असते. एक वेळ दारू सोडणे सोपे आहे; परंतु कीर्तीचा हव्यास सोडणे अत्यंत कठीण आहे.
भुतं जगात नसली तरी ती माणसाच्या मनात असतात.
दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.
Hits: 900
X

Right Click

No right click