सुविचार - ८

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्य चारित्र्य निर्माण करीत असतो.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंत:करणाची संपत्ती ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.
दुसर्‍यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वत: सहन करणे जास्त चांगले असते.
निसर्गावर तुम्हाला प्रभुत्व हवे असल्यास निसर्गाचे नियम नीट पाळलेच पाहिजेत.
हातातून जोराने फेकलेला दगड जसा परत घेता येत नाही, तसे उच्चारलेल्या शब्दांच्या बाबतीत होऊन दुष्परिणाम भोगावे लागतात.
आपले जीवन सार्थ करायचे असल्यास, स्वत:चा विचार दुय्यम प्रतीचे ठरवून इतरांचे हित पाहावे व त्याला जपावे.
नशीब दारापाशी येते व शहाणपण घरात आहे की नाही याची चौकशी करते.
कृतीशिवाय जे बोलतात, त्यांची शेवटी फसगत होते. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे.
दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देर्‍याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते.
यशामुळे मतिभ्रष्टता आली की, अपयशाची गाठ पडलीच !
सावधगिरी हीच मनुष्यास भित्रे बनविते.
ज्या अपेक्षा आपण पुरवू शकत नाही, त्या निर्माण करू नयेत.
ईश्वराने बुध्दीहून उत्तम अथवा अधिक पूर्ण अथवा सुंदर असे दुसरे काही निर्मिले नाही.
बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.
झाडाच्या पानावरील दंवबिंदूप्रमाणे मानवी जीवन हे काळाच्या किनार्‍यावर नाच करीत असते.
त्याग हा जीवन-मंदिराचा कळस आहे.
जीवन ही लढाई आहे. जीवन हा यज्ञ आहे. जीवन हा सागर आहे. प्रीती आणि पराक्रम हेच जीवनाचे डोळे !
जीवन विफल होण्याच्या भीतीसारखा दुसरा शाप नाही.
गरज कायदा ओळखत नाही.
सुधारणा म्हणजेच ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावीत राहतो ते आचरण.
मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाहीत, तर ती सहनशक्तीने होतात.
थोरांच्या दुर्गुणांचीदेखील गुण म्हणून वाखाणणी केली जाते.
मानवाच्या खोलवर अशा अनुभवांना फुटलेली वाचा म्हणजे धर्म.
कोवळे स्मित म्हणजे दु:खावरचे मलम.
जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते; तर त्याग त्याचा शेवट करतो.
कर्माने, प्रज्ञेने वा धनाने नव्हे; त्यागानेच अमृतत्त्वाचा लाभ होईल.
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळणार्‍या पायाला आपला सुगंध अर्पण करतात. खर्‍या क्षमेचे कार्य हेच आहे.
अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेल्यास दु:ख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखी होतो.
नुसत्या गंमतीला किंमत नाही, तर हिंमतीला आहे.
आवड असावी म्हणजे सवड आपोआप होते.
जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच ! उद्याचा रागरंग आपणास आज कधीच समजणार नाही.
खरा धर्म हा बड्या लोकांच्या चैनीची वस्तू नसून, सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे.
जो स्वत:च कुणाचा तरी गुलाम असतो, त्यालाच दुसर्‍यावर हुकमत गाजवाविशी वाटते.
Hits: 814
X

Right Click

No right click