सुविचार - ५

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो, त्याला चांगली छाया लाभते.
आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय.
जो सदाचारी असतो, तो देवळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो व जो सर्वांवर मन:पूर्वक प्रेम करतो तो देवळाच्या गाभार्‍यात पोहोचतो.
पैशाने सर्व काही मिळते असे ज्यांना वाटले, ते साहजिकच स्वत: पैशाकरिता काहीही (भलेबुरे) करतील असे गृहीत धरावे.
लीनता व विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.
त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो.
वेदशास्त्रपारंगत असणारा गरीब चांगला; परंतु धनवान मूर्ख फार वाईट.
ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.
मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.
तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.
परमेश्वर खर्‍या भावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो.
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.
इमानीपणामुळे गुलमगिरीतदेखील उदारतेचा अंश चमकतो.
जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.
समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.
दु:ख आणि सुख हे अंध:कार आणि प्रकाश याप्रमाणे पाठलाग करीत असतात.
दारिद्रयाची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे.
काही रोगांवरील उपाय त्या रोगांपेक्षाही भयंकर असतात.
जी उदात्त कृत्त्यें लपलेली असतात, त्याच कृत्त्यांचा जास्त उदोउदो होतो.
सर्व विजयांमध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा सर्वात महान होय.
व्यक्तीप्रमाणे राष्ट्रे जन्माला येतात आणि नाहीशी होतात; परंतु संस्कृती मरू शकत नाही.
संस्कृती ही एक चळवळ आहे आणि परिस्थितीवादी एक जलपर्यटन आहे; परंतु बंदी नव्हे.
प्रार्थनेमुळे देव बदलत नाही; तर ती प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.
आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरून जातो.
हजार सूर्य एकत्रित केलेत, तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणार नाही.
भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे.
आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.
सुखदु:खातील भेद म्हणजे सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढत राहाते आणि दु:खात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.
गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.
तुम्ही स्वत:ला मेंढरू बनविल्यावर लाडंगा तयारच असतो.
चिखलात उगवलेली सर्वच फुले काही कमळाची नसतात.
मोठी मने तत्त्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चा करतात; तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.
नास्तिक बरा पण दांभिक वाईट. पहिला प्रामाणिक असतो, तर दुसरा प्रामाणिकतेचं ढोंग करतो.
पैसा बोलतो, तेव्हा सत्य मुकं असतं.
सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते.
Hits: 860
X

Right Click

No right click