सुविचार - ४

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
तुमचा शेजारी म्हणजे तुमचाच आरसा होय.
झोपडपट्टी ही संस्कृतीचे मोजमाप आहे.
वासना उपभोगल्याने तृप्त होत नाहीत, उलट चेकाळतात.
धनवान असणारा कंजुष मनुष्य, गरीबापेक्षा अधिक दरिद्री असतो.
सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.
मानवी जीवनातील अर्धी दु:खे परस्परातील दया, परोपकार आणि सहानुभूतीने कमी करता येतात.
लाकूड जळते कारण त्यामध्ये जळण्याजोग्या वस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादतो कारण त्यासाठी आवश्यक गुण त्याच्यामध्ये असतात.
प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.
जी हानी आपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येत नाहीत.
ज्या वेळी न्यायाधीशच चोर्‍या करतात, त्या वेळी चोरांना चोरी करण्याचा अधिकारच प्राप्त होतो.
प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते; इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते, हुरूप येतो, उत्साह वाढतो, जीवन जगावेसे वाटते.
बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.
जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.
समजेल अशा तऱ्हेने सत्य सांगत गेले, तर कोणालाही त्याविषयी अविश्वास वाटत नाही.
जगातील निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणामुळे घडत असतात आणि जो असत्य बोलावयास घाबरतो तो या जगात दुसर्‍या कोणत्याही गोष्टीला घाबरत नसतो.
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.
एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, ते आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो.
प्रार्थनेमुळे अहंकार नष्ट होत राहतो.
यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.
जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.
हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे.
एखाद्या हल्ला करणार्‍या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्‍या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय.
जो पाप करतो तो माणूस, ज्याला त्याबद्दल दु:ख वाटते तो संत, जो त्याबद्दल फुशारकी मारतो तो सैतान.
सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाही.
देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो.
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहातो.
दानशूर व्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही.
सर्व कलांमध्ये `जीवन जगण्याची कला' हीच श्रेष्ठ कला आहे.
जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचा मोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.
सत्य, क्षमा, संतोष, ज्ञान, धैर्य, शुध्द मन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थना होय.
दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.
खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्‍यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.
थोर मनुष्यच दुसर्‍या थोर व्यक्तीला आकर्षू शकतो. गुणी माणसाला गुणांची किंमत कळते व दुसर्‍या माणसाबद्दल आपुलकी वाटते.
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.
संकटांची जितकी पत्रास राखावी, तितकी ती अधिकाधिक मिजासखोर बनत जातात.
मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात.
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्यामुळे त्याला चिंता त्रास देऊ शकत नाही; तो सुज्ञ असल्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही आणि तो शूर असल्याने त्याला कधीही भीती ग्रासत नाही.
Hits: 833
X

Right Click

No right click