सुविचार - ३

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो.
प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे ! माणसाला स्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती !
काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं.
मृत्यूच्या छायेत माणसाचा आत्मा जागृत होतो हेच खरं.
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !
भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.
प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.
माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा.
भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.
निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात.
ज्वाळांनी जळू शकत नाही, संकटाने पडू शकत नाही, स्वार्थाच्या विचाराने पोखरलं जात नाही, त्याला घर म्हणतात.
मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.
मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह.
ओठातून उच्चारल्या जाणार्‍या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ
गरूडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकेल का?
उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्ट औषध आहे.
प्रत्येक काळया ढगाला रूपेरी किनार असते हे विसरू नका.
प्रत्येक वस्तूंत आणि व्यक्तीत सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व यापैकी काही ना काही लपलेलं असतं.
भीती म्हणजेच सुरक्षिततेचा पाया.
भिंतींना कान असतात आणि कुंपणांना डोळे असतात.
एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजाला बुडविते.
साधू किंवा संत सद्गुणांचे आचरण अशा रीतीने करतो, की ते कुणासही आकर्षक वाटावे.
रिकामं पोतं सरळ उभं राहू शकणारच नाही.
उघड दिसणारे वैभव साधूलाही मोहात पाडू शकते.
मोठा मासा लहान माशाला गिळतो.
हिरा हिर्‍यालाच कापू शकतो.
साम्राज्यापेक्षाही समाधानाची किंमत जास्त आहे.
Hits: 722
X

Right Click

No right click