अनुक्रमणिका मराठे व इंग्रज -उत्तररंग विवेचन

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
Written by सौ. शुभांगी रानडे

उत्तररंग विवेचन

प्रकरण पहिले--मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कर्षापकर्ष-( १-७ )मराठे व इंग्रज यांच्यासंबंधाच्या कालावधीचे चार विभाग ( १ )-या विभागांची सामान्य रूपरेखा ( १ )-इंग्रजी सत्तेची एकसारखी चढती कमान (२ )-मराठे ब इंग्रज यांच्या सत्तेचे दिवाजीच्या राज्यारोहणापर्यंत अन्योन्यसापेक्ष पर्यालोचन ( ३ )-राजारामाच्या मृत्यूपर्यंत ( ४ )-पानिपत- पर्यंत ( ५ )-पेशवाईअखेर ( ६ ).

प्रकरण दुसरेः:--मराठेशाही कशाने बुडाली? ( ८--४२ )--
ब्राह्मणांची जबाबदारी (८ )-मराठ्यांची जवाबदारी ( ९ )-मराठ्यांचे व्यापारी धोरण चुकले होतें काय ? ( १० )--इंग्रजांची मदत घेण्यांत मराठ्यांनी चूक केली काय १ ( १२ ) -प्राणसंकटाच्या वेळी सर्वजण परक्‍याची मदत घेतात ( १२ )-नानासाहेबाची चूक (१३)-ही चूक मराठ्यांनी सरसकट केली आहे ( १४ )-इंग्रजांची व तत्कालिन राजेरजवाड्यांची परिस्थिति ( १५ )--दुसऱ्याची मदत घेणे केव्हां बाधक होतें आणि केव्हां नाही. ( १९ )-नाशाची खरी कारणें ( १७ )-सवत्या सुभ्याची आवड व राष्ट्राभिमानाचा अभाब ( १७ )-हिंदुस्थानच्या साम्राज्यपटावर बुद्धिबळाचा डाब ( १९ )-इंग्रजांचं धोरण कळत असून देखील मराठ्यांना डवितां आलं नाहीं ( २० )-इंग्रजां-
कडे दोप नसून मराठ्यांचा राग येतो ( २० )-इंग्रजांना फार अडचणी होत्या (२० )-आपसांतल्या भांडणांत मराठ्यांनी इंग्रजांना बोलावून त्यांचा फायदा करून दिला (२१ )-मराठ्यांच्या आपसांतील फुटीमुळे इंग्रजांना राज्य मिळालें ( २९ ) मध्यवर्ती सत्तेचा अभाव (२३)-सरंजामी पद्धतींची उपपत्ति (२३ )-मराठेशाही फेडरेशन नव्हती, कॉनफडरसि होती ( २४ )-मध्यवर्ती सत्ता कमजोर झाल्यामुळें मराठी राज्य बुडाले ( २५ )-इंग्रजांनी राज्य कसें मिळविले ( २९ )-प्रो. सिली यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ (२७ )- इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य तरबारीच्या जोरावर घेतले ( २८ )-इतर साघनांनींहि कांही मुलुख मिळविला ( २९ )-सातारची गादी खालसा करण्यांत झालेला अन्याय ( २९ )-पेशव्यांनीं सातारकर महाराजांना कैदेंत ठेवलं नव्हते. (३० )-महाराज ' स्वतंत्र राजे होते, पदरचे संस्थानिक नव्हते (२३)-राजाचे अधिकार प्रधानानें मर्यादित केलें तरी तो पदभ्रष्ट होत नाहीं ( १४ )-इंग्रज ब सातारकर यांचा तह स्नेहाचा होता ( ३४ ) सातारचे राज्य इंग्रज-सरकारने खालसा केले ही गोष्ट बेसुमारच झाली ( ३५ )-जातिभेद व राज्यनाश ( ३६ ) जातिभेद असला तरी तो पुरातन होता ( ३६ )-पेशव्यांच्यावेळीं राजकारणांत जातिनिष्ठ आवडनिवड दाखविली गेली नाहीं (१६ )--बरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जातीच्या लोकांची भरती साहजिक होते (३७ )--मराठेशाहीतील कलह जातीच्या किंवा पोटजातीच्या अभिमानानें उत्पन्न झाले नव्हते ( ३८ )- हिंदुस्थानांत परकीयांचा प्रवेश . हिंदु लोकांच्या आपसांतील दुहीमुळे झाला आहे (३९ )-शिवाजी धीट, घाडसी व बुद्धीमान्‌ असून महाराष्ट्रभक्त होता म्हणून त्याला यश आलें ( ४० )--महाराष्ट्रांतील लोकांना व्यक्तिनिष्ठ स्वार्थ विसरण्यास लावण्यास अलैकिक विभूति निपजावी लागते ( ४१ )-तात्विक न्यायबुद्धी ब व्यवहार अशा दोन दृष्टींनी जातिभेदाचा विचार केला पाहिजे ( ४२ ),

प्रकरण तिसरेः-मराठेशाही ची राजव्यचस्था (४३-९९ )-अलीकडे महाराष्ट्राच्या इतिहासाची बरीच सामग्री प्रकाशित झाली आहे ( ४३ )-न्या, रानड्यांनी केलेली मराठ्यांच्या सत्तेची मीमांसा ( ४४ )- इतर जातींपेक्षां मराठ्यांचा विशेष गुण ( ४४ ) मराठ्यांची लष्करी व्यवस्था ( ४५ )-सरदारांची फौज व जहागीर यांचा तपशील ( ४६ ) मराठी फौजांत पायदळापेक्षां घोडदळाचा भरणा अधिक होता (४७ ) युरोपियनांदीं संबंध आल्याषासून तोफखान्याकडे मराठ्यांना लक्ष द्यावें लागलें ( ४८ )-महाराष्ट्रांत लष्करी शिक्षणाच्या शाळा ब कवायती शिस्त नव्हती ( ४९ )-पायदळांत मराठ्यांपेक्षां इतर जातींचाच भरणा अधिक होण्याची कारणें व परिणाम( ५० )-कवायती पायदळ व तोफखाना यांचा भाऊसाहेब व महादजी यांनी केलेला उपयोग ( ५२ )-मराठे इंग्रजांपासून बंदुका विकत घेत ( ५३ )-मराठ्यांची शस्त्रे ( ५४ )-मराठी लष्कराचा मुक्काम व त्याची हालचाल ( ५४ )-कवायती फोजेमुळें युरोपियम अधिकाऱ्यांचे प्रस्थ वाढलें ( ५५ )-दुसऱ्या बाजीरावाच्या बेळी मराठ्यांच्या एकदर फौजेचा अंदाज ( ५९ )- हिंदुस्थानांत गोऱ्या गारद्यांचा सुळसुळाट ( ५६ )-डिबाइनचा इतिहास ( ५७ )-- पॅरन प्लिगेट गार्डंनर वगैरे गोरे अधिकारी ( ५९ )-गनीमी कावा सोडून कवायती पद्धति स्वीकारण्यांत मराख्यांनीं चूक केली काय १ ( ९० )-मराठ्यांचें आरमार ( ९१ )-कोकणांतीळ अधिकारी देद्यांतील अधिकाऱ्यांपेक्षां अधिक स्वतंत्र असत ( ६१ )-कोकणांतील दर्यावर्दी संस्थानिक ( ६२ )-शिवाजीचें आरमार (६२ )-शिवाजी ब इंग्रनादि युरोबियनांच्या आरमारी लढाया (६३ )--कान्होजी आंग्रघाचें आरमार ( ६४ )-आंग्रे घराण्यांत गृहकलहाचा प्रवेश ( ६७ )-इरॉग्लिश आरमार ब धुळपार्चे आरमार यांमधील लढाई ( ९९ )-- मराठी आरमाराची व्यवस्था ( 3० )-मराठ्यांची मुलकी व्यवस्था ( ७० )-- मराठ्यांचा राज्यविस्तार ( ७२ )-शिबकालीन ( ७२ )-सुभे दक्षण व हिंदुस्थानचा झाडा ( ७२ )-पातशाही दोलतीचा तपशील (७४)-इंग्रजांचे उत्पन्न

अनुक्रमणिका - मराठे व इंग्रज पूर्वार्ध इतिहास

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
Written by सौ. शुभांगी रानडे


मराठे व इंग्रज
पूर्वार्ध इतिहास

प्रकरण पहिले:--
इंग्रजांपूर्वीचे महाराष्ट्र--( १-८ )
मराठे व इंग्रज यांची पहिली भेट झाल्या वेळीं त्यांची परस्परांविषय़ीची वृत्ति-इंग्रज व हिंदुस्थान यांचा संबंध आला हे आश्चर्यातले आश्चर्य -सतराव्या शतकाच्या प्रारंभी उदयोन्मुख झालेल्या दोन सत्ता--तत्कालीन हिंदुस्थानची स्थिति- दिग्विजयानें अंतर्व्यवस्थेत जेत्याचा हात शिरत नसे-मुसलमानी विजयाचे सामान्य स्वरूप-त्याने हिंदु अधिकार भ्रष्ट झाले नाहींत-उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांतील मुसलमानी सत्तेतील भेद - दक्षिणेंतील मुसलमानी अम्मल मराठ्यांना जाचक न वाटण्याची कारणें (५)-मुसलमानांनीं मराठ्यांना पूर्णपणें कधींच जिंकले नव्हते ( ६ )- महाराष्ट्राची भू-रचना स्वातंत्र्यबुद्धीस अनुकूल ( ७ ) इंग्रजांना मराठी सत्तेशी लढावे लागलें; मुसलमानांशी नव्हे ( ८ )--मोंगलांच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे मराठे स्वातंत्र्याची इच्छा करू लागले .

प्रकरण दुसरे --
इंग्रज हिंदुस्थानांत कां व कसे आले? (८-१७)
हिंदुस्थान व यूरोप यांमधील प्राचीन काळचा व्यापारी संवंध (९ )- या व्यापारी दळणवळणाचे मार्ग ( १० )- हिंदुस्थानांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार ( १० )-हिंदुस्थानांतील पोतुंगीज रियासत ( ११ )-डच रियासत ( १२ )-१६०२ पूर्वी हिंदुस्थानांत आलेले इंग्रज ( १३ )-एलिझाबेदचे अकबरास पत्र ( १४ )-हॉकिन्स हिपोन कौलिंग डाउंटन रो कीलिंग व केरीज यांनी केलेल्या उलाढाली ( १५ )-हिंदुस्थानाशी चालणाऱ्या व्यापारापासून युरोपियन व्यापाऱ्यांना मिळणारा जबर फायदा ( १९ )-रोचा रिपोर्ट ( १७ )

प्रकरण तिसरेः-
मराठे व इंग्रज-पूर्वरंग ( १८-८० )
मराठे मोगल व इंग्रज यांचे संबंध ( १८ )-शिवचरित्राचे आलोचन ( १९ )-शिवाजी व इंग्रज यांचा राजापूर, सुरत, कारवार व हुबळी येथे आलेला संबंध (२०-२२ )-१६७४ चा तह ( २३ )-शिवाजी, इंग्रज व सिद्दी यांचे संबंध ( २४ )-शिवाजी व इंग्रज यांच्या संबंधाविषयी व मराठी रियासती मधील उतारे( २५-२९ )-खांदेरीउंदेरी प्रकरण ( २९-३० )-संभाजी व इंग्रज (३१) सावंतवाडीकर, देसाई व इंग्रज ( ३२२ )-आंग्रे व इंग्रज ( ३३ )-पहिला बाजीराव, हबशी व इंग्रज ( ३३ )-आंग्रे, नानासाहेब व इंग्रज ( ३४ )-पोर्तुगीज, मराठे व इंग्रज ( ३४ )- पिंटोचें मुंबईच्या गव्हर्नरास पत्र ( ३५ )-मराठ्यांनीं वसई घेतल्यामुळे पोर्तुंगीज व इंग्रज यांवर झालेला परिणाम ( ३६ )-शाहूच्या दरबारांत पेशव्यांचे शत्रू कोण याची टेहळणी करण्यासाठी इंग्रज वकील पाठवितात ( ३७ ) गॉर्डन शाहूची भेट घेतो ( ३७ )-१७३९ मध्ये मराठ्यांविषयी इंग्रजांचे अभिप्राय (३८-३९) -चिमाजीकडे इंचवर्डची वकिली ( ३९ ) इंग्रज व पेशवे मिळून आंग्र्याचा पराभव करतात ( ४१ )-मराठे व इंग्रज यांचा तह ( ४१ )-नानासाहेब व मुंबईकर यांमधील पत्रव्यवहार व स्पेन्सरचा रिपोर्ट ( ४२ ) -वुइल्यम प्राइझ यांस १७५९ सालीं मुंबई कौन्सिलने दिलेली समजूत ( ४३ )-प्राइझ व नानासाहेब यांची भेट ( ४४ )-मॉस्टिन
यास माधवरावाकडे पाठविल्या वेळीं दिलेली समजूत ( ४५ )--मॉस्टिन माधवरावास भेटतो ( ४९ )-मॉस्टिनचे मुंबईस पत्र ( ४७ ) मॉस्टिन नाना फडणविसाची गांठ घेतो (४७ )-मॉस्टिन व ओम यांचें माधवराव ब राघोबा यांशी बोलणें ( ४८-४९ )-माधवराव व मॉस्टिन यांच्या दरम्यान ठरलेली कलमे ( ५० )- इंग्रजांचा वकील पुण्यास राहूं दिल्यामुळे झालेले परिणाम (५१ )--दादासाहेब पेशव्यांच्या शत्रूंकडे मदत मागतात ( ५२ )-इंग्रज साष्टी घेतात (५३ )-इंग्रज राघोबाशी तह करतात ( ५४ )--मुंबईकर व कलकत्तेकर इंग्रज यांमधाले मतभेद ( ५४ )-मुंबईकरांचा खलिता ( ५५ ) राघोबाचा पक्ष उचलल्यापासून इंग्रजांचा हाणारा फायदा ( ५६ )-राघोबाच्या नादानीची मीमांसा
( ५७ )-राघोबाची महत्त्वाकांक्षा ( ५७ )--माधवराव व राघोबा (५८ )-राघोबा व नारायणराव ( ५९ )--राघोबा व बारभाई ( ६० )-राघोंबा व महादजी ( ६० )--राघोबाचा पळ ( ६१ )--इंग्रजांशीं तह करतो (६२)-कलकत्तेकर व मुंबईकर इंग्रज यांमधील मतभेद ( ६३ )-राघोबाची बिकट स्थिति ( ६४ )-इंग्रज राघोबाचा पक्ष सोडतात ( ६५ )- इंग्रजी मुलुखातून निघून जाण्याबद्दल राघोबास तगादा ( ६६ )-पुरंदरचा तह. ( ६७ )-राघोबाचे इंग्लंडच्या राजास पत्र ( ६७ )-मराठे व फ्रेंच यांच्यामध्ये तह झाल्याच्या अफवा (६८ )- पुण्याच्या कारभाऱ्यांत दुही माजलेली पाहून इंग्रज पुनः राघोबाचा पक्ष उचलतात ( ६९)-कर्नल एगटर्नची मुंबईहून ससैन्य रवानगी ( ७० )-एगर्टनच्या हालचाली व इंग्रजांचा पराभव ( ७१ )-वडगांवचा तह (७२)-राघोबा शिंद्याच्या स्वाधीन होऊन त्यांची झांशीकडे रवानगी करण्यांत येते ( ७३ )-सयाई माधवरावाचे विलायतच्या बादशहास पत्र ( ७४-८० ).

प्रकरण चवथे:--मराठे च इंग्रज-उत्तररंग-( ८१-११८) गाडर्ड पुण्यावर चालून येतो ब पराभूत होतो (८ १)-राघोबा शिंद्याच्या कैदेतून निसटतो ( ८२ )-हैदरअलीने उचल खाल्यामुळें इंग्रज मराठ्यांशी सालबाईचा तह करतात ( ८३ ) राघोबा कारभाऱ्यांच्या स्वाधीन होतो ( ८४ )-इंग्रजांचा वकील मॅलेट पुण्यास येतो ( ८५ )-मराठ्यांची टिपूवरील मोहीम ( ८५ )---टिपूवरील दुसरी स्वारी ( ८६ )-टिपृवरील तिसरी स्वारी (८७)-महादजींच्या मागे नानाची स्थिती ( ८८ )-नाना बाजीरावास गादीवर येऊं न देण्याची खटपट करतो; पण मग आपणच त्या गोष्टीस कबूल होतो ( ८९ )-चिमाजी आप्पाचे दत्तविधान ( ९० )-शिंद्याच्या गोटांत नानास कैद ( ९१ )-नाना शिंदे बाजीराव व इंग्रज यांचीं कारस्थाने ( ९२ ) नानाचा मृत्यु ( ९२ )---शिंदे ब बाजीराव यामध्ये युद्ध ( ९३२ ) इंग्रजी सैन्य ठेवून घेण्यास बाजीराव फर्मान देतो ( ९४ )-कर्नल क्लोजची मध्यस्थी ( ९४ )-वसईंचा तह ( ९५)-बाजीरावाची पुण्यास स्थापना ( ९६ )-आसई व लासवारी (९६ )-१८०३मधील व्हाइसरायानें केलेलें पेशवाईचे परीक्षण ( ९७ )-शिंदेशाहीचें परीक्षण ( ९८ )-इंग्रजांचे होळकरांशी युद्ध व तह (९९ )- बेकार शिपायांची स्थिती व पेंढाऱ्यांची वाढ ( १०० )--बाजीरावाचा मूर्खपणाचा कारभार (१०१ )--
त्र्यंबकजी डेंगळ्याचा स्वभाव ( १०३ ) गंगाधरशास्त्र्याचा खून ( १०४ )-या खुनाच्या प्रकारणाची दुसरी बाजू ( १०७५ )-बापू मैराळाने लिहिलेली खुनाची हकीकत ( १०९६ ) त्र्यंबकजी इंग्रजांच्या कैदेत पडतो व तेथून निसटतो ( १०७ )--पेशव्याकडे अल्यिष्टनाचा त्र्यंबकजीस धरण्याबद्दल तगादा ( ५०७ )-बाजीराव व इंग्रज यांमध्ये नवा तह (१०८)-बाजीराव छत्रपति व सरदार यांना संमतीत घेण्याची खटपट करतो ( १०९ )-इंग्रजांच्या सैन्यांत फितुर करण्याचा प्रयत्न ( ११० ) बाजीराव व अल्पिष्टन यांत बिघाड होऊन खडकीची लढाई होते ( १११ )-स्मिथ पुण्यास येतो व पुण्यास इंग्रजी निशाण फडकू लागतें (११२)-बाजीरावाच्या मार्ग पुण्याची स्थिति (११३)-स्मिथ बाजीरावाचा पाठलाग करतो ( ५१६५ )- अष्टीची लढाई (११६ )--बाजीराव माल्कमच्या स्वाधीन होतो. ( ११७ ) बाजीरावाचा ब्रह्मवतीतील आयुष्यक्रम ( ११८ ).

उपोद्धात - ११

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
Written by सौ. शुभांगी रानडे

कोणल्या गुणांच्या अभावासुळें आम्ही इंग्रजांसारख्या युरोपियन राष्ट्रास कुंठित करूं शकलों नाही, असल्या राष्ट्राने टक्कर दिली असता ती सोसवण्याचें सामर्थ्य आमच्या राज्यांत कां राहिलें नव्हते, य़ाची मीमांसा एवढा वेळ करण्यांत आली. तिच्याच अंगस्वानें कारस्थानांच्या बाबतीत इंग्रजांस आम्हांवर कां यश मिळवितां आलें हे सांगणे ओघासच येते. मुबई व सुरत या बंदरांबाहेर इंग्रजांचा व्याप नव्हता, तेव्हांच दिवाने त्यांत तेथून कां घालवून दिले नाही, हे आपले राज्य घेतील हें ओळखून हिंदी राजेरजवाड्यांनी या परकी लोकांस प्रथमपासून कां जरबेत ठेवलें नाहीं, इत्यादि प्रश्न उपस्थित करणारे लोक त्या वेळची वस्तुस्थिति लक्षांत घेत नाहीत. त्या काळांतल्या लोकांची ज्ञानमर्यादा सामान्यतः किती आकुंचित होती याचा विवार केला म्हणजे व्यापाराकरितां आपल्या देशांत आलेल्या त्या गोऱ्या! लोकांचे खरें स्वरूप घ्यानांत न आल्याबद्दह कोणासहि दोष देतां येत नाही. हे गोरे लोक व्यापारासाठी वखार बांधायला जागा मागतात, रुमालाने हात बांधून नम्रतेने उभे राहतात, पायांवर डोकें ठेवतात, इतकेंच त्या त्या हिंदी स्थानिक अंमलदारांच्या नजरेस पडले ते त्यांनी खरें मानलें.

या व्यापाऱ्यांना वखारीकरितां जागा दिली तर हे स्वतःकरितां आमच्या मुलखाची भली मोठी वखार बनवून टाकतील, ज्या रुमालाने त्यांना स्वतःचे हात बांधले आहेत त्याच रुमालाने ते आमच्या मुसक्या आवळतील, हे आज पायांवर डोकें ठेवतात पण उद्यां आमच्या डोक्यावर पाय ठेवतील, असल्या विचित्र कल्पना ते स्थानिक अंमलदार. किती धूर्त असले तरी त्यांच्या मनांत कशा याव्या. व्यापाराचें निमित्त करून हेच इंग्रज युरोपखंडाच्या कोनाकोपच्यांत कोठेहि पाय ठेवते, तर हे कोण, कशाकरितां आले, ही चौकशी तस्हाल होऊन त्याचें तेथून उच्चाटन झालें असते, पण हिंदुस्थानच्या समुद्रेकिनाऱ्याबर इंग्रज वगैरे युरोपियन लोक किल्ले बांधून राहिले होते तरी शेपन्नास वर्षे त्याजकडे कोणी दुंकून पाहिलें नाही ! याचे कारण हिंदुस्थान हा अफाट देश, त्यांत अठरापगड जाती, शिवाय त्यांतच मुसलमान, पारशी, ख्रिस्ती, ज्यू इत्यादि परथर्मी लोकांची खिचडी झालेली, शिवाय या देशांत शेंकडों राज्ये व हजारो संस्थाने अशा स्थितीत इंग्रज, फ्रेंच वगैरे अनोळखी लोक येथे येऊन राहिले तर ते खरोखर व्यापाराकरितां आले आहेत का. कशाकारिता आले आहेत याची चौकशी कोण करणार कोणाचें झाले तरी चालू व्यवद्वारावर लक्ष असणार, इंग्रज स्वतःस व्यापारी म्हणवतात तर त्यांनी व्यापारच करावा अधिक पंचाईत करण्याचे काय कारण? त्यांनी किल्ले बांधले म्हणून संशय घ्यावा तर कोणीहि लुंगासुंगा पाळेगार गढ्या ठाणी बळकावून घटाइच्या य्रोडी सांगतच असतो; त्यांतलेच हे ! असलेच विचार कोणाच्याही झाले तर मनांत येणार. त्यांतून इकडच्या राजेरजवाड्यांस या परकी लोकांशी स्नेह्भावानें वागणेंच अधिक फायदेशीर वाटत होतें. कारण, या परकी लोकांच्या व्यापारामुळे आपलें जकातीचे उत्पन्न वाढतें, लागेल तो परदेशी जिन्नस हे आणून देतात, आणि सर्वात मुख्य गोष्ट ही का, हे उत्तम गोलंदाज व उत्तम लढवय्ये असून शिवाय स्नेहाखातर तोफा व दारूगोळा सिद्धींत असल्यामुळे संकटाच्या वेळा यांचा मोठाच उपयोग होण्याजोगा होता !

सन १७३७ त मराठ्यांनी पोर्तुगीज लोकांपासून साष्टी घेतली त्या दिवसापासून साष्टीबर मुंबईकर इंग्रजांचा डोळा होता. किल्लेदारास लांच देऊन अथवा अन्य कांही युक्तीने निदान बळजबरीनेसुद्धा, साष्टी घ्यावयाचीच असं ठरवून योंग्य संधींची प्रतीक्षा करीत ते बसले द्वोते. मध्यंतरी माधवराव व राघोबा यांच्या कलहापासून आपल्याला या बावतीत कांही फायदा करून घेतां येईल असं त्यांस वाटत होते; परंतु ती त्यांची आशा निष्फळ झाली, शेवटी नारायणराव पेशव्याचा खून होऊन पेशवाईत तारांबळ उडालेली पहातांच मुंबईकर इंग्रजांनी साष्टीस वेडा घालून तो किल्ला काबीज केला.

अडचणीच्या वेळी मुंबईकर इंग्रजांनी पेशव्यास गाठलें व आपला हेतू सिद्धीस नेला यापेक्षां पेशवाई भरभराटीत असतां अगर निदान माधवरावाच्या कारकीर्दीत जरी मराठ्यांचे व इंग्रजांचे युद्ध जुंपले असते, तरी तें मराठ्यांस अधिक श्रेयस्कर झालें असते. पण तसें घडून आले नाही हा इंग्रजांचा दैवयोगच समजला पाहिजे : पानपतचे युद्ध जर झालें नसते, तर पेशव्यांची स्वारी बिहार व बंगाल याच प्रांतावर झाली असती. कारण, हिंदुस्थानांत त्या दोहोंखेरीज दुसरे प्रांत मोकळे राहिलेच नव्हते. तस झालें असतें तर प्लासीच्या लढाईत क्लाइव्हने मिळविलेले यश व्यर्थ झाले असते आणि पुढच्या दहा वर्षात इंग्रजांनी त्या प्रांती जो फैलावा केला तो त्यांस करतां आला नसता. हैदरआली जर उपटसुंभाप्रमागे मध्येच नवीन शत्रू निर्माण झाला नसता, तर माधवरावाच्या स्वाऱ्या पूर्वीप्रमाणे अर्काट त्रिचनापल्ली वगैरे मुलुखावर चालू राहिल्या असत्या अणि अर्थातच मद्रासकर इंग्रजांना गाशा गुंडाळण्याचा प्रसंग झाला असता.

सन १७६५ त मुंबईकरांनी मालवण घेतले व बंगालच्या इंग्रजांनी मल्हारराव होळकरावर छापा घालून त्याची नासाडी केली. त्या वेळी इंग्रज-मराठ्यांचं युद्ध होण्याचा योग होता. परंतु मल्हारराव मृत्यु पावल्यामुळे ते प्रकरण तेवढ्यावरच थांबले, सन १७६६ त मद्रासकर इंग्रजांनी निजामअलीस सामील करून प्रथम हैदरावर व मागून पेशव्यांवर स्वारी करण्याचा बेत केला होता. परंतु माधवरावाच्या हुशारीमुळे तो त्यांचा बेत तडीस गेला नाही. पुढें सन १७३२ त दुआाबांत मराठ्यांच्या अणि इंग्रजांच्या चकमकी झाल्या. परंतु त्याच वेळां माधबराव मृत्यु पावल्यामुळे ते युद्ध पुढें चालू राहण्याचे अर्थातच बंद पडले; आणि अडचणीच्या भलत्याच वेळी म्हणजे राघोबाचा पाठलाग करण्यांत पेशव्यांच्या फौजा गुंतल्या असतां इंग्रजांशी युद्ध सुरू करण्याचा प्रसंग त्यांस प्राप्त झाला. तात्पयं, या पहिल्या युद्धाची सुरुवात इंग्रजांना आपल्या इच्छेप्रमाणे व सोईप्रमाणे केली; त्यांत मराठ्यांची इच्छा अगर सोय कोणतीच नव्हती.

उपोद्धात - १२

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
Written by सौ. शुभांगी रानडे

मराठ्यांशी पहिलें युद्ध सुरू झाल्यानंतरच्या वर्षे सहा महिन्याच्या अवधीत इंग्रनांनी जे लेख लिहिले आहेत, त्यांत मराठ्यांचे राज्य केवढे, त्यांची फौज किती छत्रपति, पेशवे, भोसले, गायकवाड, शिंदे, होळकर यांत तारतम्याने कोणाचे महत्व किती, त्यांचे परस्पर संबंध कोणते, त्यांची घरगुती भांडणे कशाबद्दलची, कोणास काय मिळालें असतां तो आपणास अनुकूल होण्याचा संभव आहे, इत्यादि तपशील- वार माहिती बहुधा बिनचूक लिहिलेली आढळते. पण याचें आश्चर्य मानण्याचे कांही कारण नाही. कारण, यावूर्वी पुष्कळ दिवसांपासून या हिंदुस्थान देशाचें राज्य हप्त्या हप्त्याने आमच्या पदरांत पडणार आहे, अथी सुखस्वप्ने इंग्रजांस पडू लागली होती. त्यातल्या कर्त्या माणसांचे चिंतन यांच विषयावर नेहमी चाललेले होते. एक पुस्तक आम्ही पाहिलेले आहे. ते एका इंग्रजाने अठराव्या शतकांत लिहिलेलें आहे. त्याचा विषय हिंदुस्थानचे राज्य कसे घ्यावें हाच आहे. अर्थात या विषयावर त्या काळांत दुसरी पुष्कळ पुस्तकें व निबन्ध टिपणें वगैरे लिहिलेली असतीलच. त्या वेळी या देशांत मिशनर्‍्यांचा फैलाव नव्हता. परंतु फिरस्ते व व्यापारी इंग्रज शेकडो होते. ते प्रत्येक प्रांतांत फिरत. त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रवासवर्णनांत शहरे, किल्ले, मार्ग, लोकरिवाज स्थानिक राजकारणे सर्व कांहीं बारीकसारीक माहिती आस्थेने लिहून ठेवलेली असे व ती कंपनी सरकारच्या उपयोगी पडे. कांही तरी निमित्त काढून लष्करी अम्मलदार प्रवास करीत तेव्हां मिलिटरी खात्याच्या उपयोगाची माहिती गोळा करीत व मोठमोठया देशी राजांच्य़ा दरबारांतून जे इंग्रज वकील होते, ते राजकारणाची सर्व माहिती मुख्याधिकाऱ्यांकडे लिहून पाठवत. इंग्रज लोक शोधक बुद्धीचे आहेत व विद्यार्जनाचा त्यांचा हव्यास दांडगा आहे. वेद शास्त्रे स्मृती पुराणे वगैरे ग्रंथांची सर माहिती त्यांनी हिंदुस्थानचे अधिराज्य मिळविण्या आ्धींच गोळा केली होती. पेशवाइंच्या अखेरपर्यंत सवे बाजूंचे ज्ञान संपादन करण्याचा त्यांचा उद्योग एकसारखा सुरू होता. सन १८०३ साली नॉक्स या नांवाचा इंग्रज म्हैसुराहून पुण्यास जात असतां मिरजेस थोडा वेळ मुक्काम करून राहिला होता. पण तितक्याही धांदलाीत त्यानें मिरजेच्या जहागीरद!रास पत्र लिहिले की ' तुम्हांस जहागीर कधी कोणीं दिली, तिचे उत्पन किती, तुमच्या घराण्यातल्या लोकांनी पेशवे सरकारच्या कोणकोणत्या कामगिऱ्या केल्या. या सव गोष्टींची मेहेरबानीने तारखेसह लिहून मला द्याल तर यी आभारी होईन.

अशा तरतरीत चौकस स्वभावाच्या इंग्रज लोकांशी लढण्याची मराठ्यांवर पाळी आली; पण त्यांस या इंग्रज लोकांविषयी कांहींच माहिती नव्हती. या लोकांचा मूळ देश कोण, हे येथें कशाकरिता आले, यांची पहिली वसाहत कोठची, मागून कोणकोणत्या बंदरांत त्यांना वसाहती केल्या, यांचा स्वभाव गुणदोष कोणचे, यांची राज्यवस्था ब सैन्य्यवस्था कशी, यांचें सैन्यबळ व द्रव्यबळ किती, इत्यादि मुद्यांची माहिती मराठी मुत्सद्यांनी ब सरदारांनी अवश्य मिळवावयास पाहिजे होती; पंरतु आमच्या आळसामुळें व हलगर्जीपणामुळें आमच्या राजकारणाचे हें अंग नेहमी लुळें पडे. एकट्या नानाने मात्र इंग्रजांविषयी कांही सटरफटर माहिती गोळा केली होती व ती बातमी फार चांगली राखीत होता असे त्याच्या लेखांवरून दिसतें. एरवी पहावे तो चोहोकडे गाढ निद्राच लागलेली होती. इंग्रज लोक किती आहेत व कोठून येतात हें ठाऊक नसल्यामुळें त्यांची दहशत मराठ्यांच्या मनावर उगीचच्या उगीच बसली होती. इंग्रजांशी लढाई सुरू असता बातम्या येऊं लागल्या काी, इंग्रज मुंबईकडून आले, त्यांचा गुजराथेंत धुमाकूळ सुरू आहे, कांही मद्रासेकडून जलमार्गाने येत आहेत, कांही हैदराशी लढत आहेत, काही यमुना उतरून काल्पी- वर चालून येत आहेत. अशा चोहोकडच्या बातम्यांनी भांबावून गेलेला एक सरदार त्रासून लिहितो की, ' हे शिंदळीचे इंग्रज आहेत तरी किती. जेथे तेथे तेच उद्भवतात हें काय आहे न कळे' ? अशा बिकट परिस्थितीत सुद्धां नानाने इंग्रजांच्या कारस्थानांवर ताण करून त्यांस हातटेकीस आणले; तह करण्याविषयी त्यांनी मराठ्यांची आर्जवे करूं लागावे असली स्थिती उत्पन्न केली, याबद्दल त्याची वाहवा होत असते ती योग्यच आहे. सालबाईच्या तहांत इंग्रजांस साष्टींचा टापू मिळाला हा कांही त्यांनी पांचसात वर्षे मोठें नुकसान सोसून चालविलेल्या युद्धाचा योंग्य मोबदला नव्हे.

सालबाईच्या तहानंतर पेशवाईच्या अखेरपर्यंत इंग्रज ब मराठे यांचे राजकारणाचे सामने पुष्कळ वेळां झाले, व लढायाही पुष्कळ झाल्या. ह्यांत जे वैगुण्य मराठ्यांस नेहमी जाचत असे ते हेच काी, त्यांस इंग्रजांची कांह्री एक बातमी कळत नसे. घरभेदे हे केव्हांही कोठेही झाले तरी असायचेच; पण पेशवाईत त्यांचा सुळसुळाट फारच झाला होता. मराठी फौजांचे बेत व हालचाली इंग्रजांस नेमक्या कळाव्या व त्यांची बातमी मात्र यांस कांहीच कळूं नये, असें नेहमी होत असे. इंग्रजांच्या जातीचा एकही घरभेद्या मराठ्यांस कथी भेटू नये हे केवढें आश्चर्य आहे.

इंप्रजांची राहणी व भाषा निराळी. त्यांचे रिवाज व शिस्त निराळी. ते कारणाशिवाय आम्हांशी बोलतसुद्धां नाहीत.. मग आम्हांशी मिळूनमिसळून वागायचे दूरच राहिले. त्यांच्या अंगी जात्याभिमानाचा ताठा असल्यामुळें हिंदी लोकांशी फटकून वागणेंच त्यांना आवडतें. त्यामुळे त्यांचे बेत बातम्या सर्व कांही त्यांचें त्यांच्यांत राहते; बाहेर फुटत नाही. त्यांची कोणतीही बातमी मराठ्यांस न कळण्याचें मुख्य कारण हेंच होय. पण याबरोबरच त्यांच्या संबंधाच्या खोठ्या बातम्या पसरण्यास ह्या इंग्रजांचा एकलकरीपणा कारण होता हेंही ध्यानांत ठेवलें पाहिजे.

शिंदे व भोसले यांचा पराजय झाला तरी यशवंतराव होळकराच्या पराक्रमावर मराठ्यांचा फार विश्वास होता. त्यामुळें होळकराचें व इंग्रजांचे युद्ध जुंपलें तेव्हा होळकरांची जागोजाग फत्ते झाल्याच्या बातम्या पुण्याच्या बाजारांत नेहमी पसरत होत्या. या बातम्यांत अतिशयोक्ति व विसंगतपणा फार असे व उत्तर हिंदुस्थानांतून पत्रे येत त्यांत त्या लिहिलेल्या असत, खुद्द पुण्यांतल्या पुण्यांत ज्या बातम्या उडत त्यांतल्याही कांही कांहीं फारच विचित्र असत. उदाहरणार्थ, पुढील मासला पहाः-
' होळकरानें गोरे लोक धरले, त्यांपेकी तीन लोक नाके कापून सोडून दिले. त्यांतले दोनशे येथे पुण्यास आले. तेव्हां येथल्या इंग्रजांनी त्यांस विलायतेस रवाना करण्याकरितां मुंबईस पाठविलें. हे नकटे विलायतेस जातील तर आपली इज्जत जाईल व आपणास शिक्षा होईल या भयाने मुंबईवाल्यांनीं त्या लोकांस गलबतांत घालून समुद्रांत नेऊन बुडविले !

असल्या बातम्यांवर विचारी माणसांचा विश्वास बसणें दुर्घट होते. पण सामान्य लोकांस मात्र त्या खऱ्या भासत असल्या पाहिजेत असे वाटतें. होळकरांच्या लढाईत इंग्रज फार जेर झाले असून संकटांत पडले आहेत अशी बातमी पटवर्धनांचा वकील पुण्यास होता तो त्यास नेहमी लिहून पाठवी. एका पत्रांत ' डाकेबरोबर सावकारी वर्तमान आलें. अश्वदल ( होळकर ) यांची प्रबलता जलचर (इंग्रज ) पेचांत आहे. ऐसे लिहिले आहे. शिंदे यांची पत्नें छ.- ९ साबानची आली त्यांत वर्तमान लिहिलें आहे त्यांत अतिबलवत्ता अश्वदळांची लिहिली आहे. लील (लॉल लेक) साहेबाची पलटणे बुडविली; दहाबारा पलटणें घेऊन यमुनापार लखनौकडे जात होता. त्यांस भोवती घेरा पडला, असे लिहिलें आहे. 'इतके लिहून सदरहू वकील इंग्रजांच्या घरी शोध घेऊन तेथील बातमी प्रत्यंतरादाखल लिहितो ती अशी:--' छ. १६ रमजानी इंग्रजांकडील डाक आली. जेवावयाला जात होते. इतकियात डांक येऊन दाखल जाहली, सबब तीनचार असामी फरशीबर बसोन डाकेवे तीन फर्द पाहिलेवर डोईची टोपी काढून भूमीवर आपटली. नेत्राश्रु पतन करू लागले. चौकीदार वगैरे होते त्यांस दूर दूर उभें केले. सारेजण जमा होऊन खुरशांवर बसोन कौशल होऊन नंतर एक इंग्रजाने एक अधिकारियास हाती धरून उठविले. ' वकिलानें कोणा बुटलेरास शेपन्नास रुपे देऊन इंम्रजांच्या घरची म्हणून विकत घेतलेली ही बातमी आपल्या धन्यास लिहून कळविली. तिने त्या धन्याचे कितपत समाधान झालें असेल हें जाणणे आम्ही वाचकांवरच सोंपवितो.'

आमचा पुणे-सातारा इंग्रजांनी का घेतला आणि त्यांचा मद्रास--कलकत्ता आम्ही कां घेऊं शकलो नाहीं, याचा संक्षेपाने येथपर्यंत विचार केला. देशाभिमानशून्यता, समूहरूपानें कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची संवय, इत्यादि दुर्गुण आमच्या समाजाच्या अंगी जे खिळले आहेत तेच आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. असल्या दुर्गुणांनी खिळखिळे झालेले कोणतीही पौरस्त्य राष्ट्र सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्राची बिरोध प्राप्त झाला असता टिकाव धरूं शकत नाही. हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते. तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहांत पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असतां त्यांतले कोणतें फुटावयाचें, मातीचे की लोखंडाचें, हे ठरलेलेंच आहे. हल्लीचा काळ असा आला आहे कीं, आम्ही पाश्चात्त्यांची बरोबरी तरी करावी, नाहीं तर त्यांचे मजूर तरी होऊन रहावें. राजकारण, उद्योगधंदे, कलाकौशल्य, भौतिक शास्त्रांचा उपयोग, प्रत्येक गोष्टींत हीच स्थिति आहे. जर आम्हांस पाश्चात्यांची बरोबरी करण्याची हिंमत असेल तर या लेखांत वर्णिलेले आमचे दुर्गण आम्ही टाकले पाहिजेत. पूर्वी स्वराज्य होतें तें याच दुर्गुणांमुळें गेलें हे समजून जर आम्ही सावध झालों नाहीं, तर नवीन स्वराज्य मिळून सुद्धां व्यर्थच आहे, हाच इतिहास डिंडिमाचा घोष प्रत्येकाच्या कानी घुमत राहिला पाहिजे.

वासुदेव वामन खरे, मिरज,ता. ८-३-१९१८. | मराठे आणि इंग्रज - न. चिं. केळकर

उपोद्धात - १०

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
Written by सौ. शुभांगी रानडे

मराठी राज्यांत वारंवार दंगे व क्रांति होण्याचें आणखी एक कारण असें होतं की, त्य़ा राज्यांत राजकीय संबंधीच्या मिळकतीवर-मग ती मिळकत एखाद्या पाटलाची असो, वा सरदारांची जहागीर असो-कोणाचा वारसा चालावा हें ठरलेले नव्हतें! फार काय सांगावे, पण खुद्द छत्रपतींचे सिंहासनसुद्धां या अशाश्वतांच्या संकटांतून मुक्त नव्हतें. भावाभावांत ज्याच्या मनगटाचा जोर चालेल त्यानें वडिलोर्जित उत्पन्न खावे अगर अधिकार भोगावा अशी त्या वेळची वहिवाट होती. सरकारांतून योग्य माणसाची निवड प्रथम होई; परंतु जर मागून त्या माणसाच्या भावाने ' मी आधिक नजराणा देतों, मलाच तो अधिकार द्या, असें म्हटलें तर कायद्यावर नजर देऊन सरकार त्याचेंहि म्हणणे कबूल करायाला कचरत नसे. शाहू व ताराबाईचा पुत्र शिवाजी यांत राज्याचा योग्य वारस कोण याबद्दल हल्ली आम्ही वाटेल तितका वाद करूं, पण त्या काळची माणसें असली चर्चा कधींच करीत नव्हती. ती म्हणत की, ताराऊचा मुलगा शिवाजी हा जसा थोरल्या शिवाजीचा! नातू, तसाब शाहू देखील थोरल्या शिवाजीचा नातूच आहे. दोघेहि योग्य वारस आहेत. ज्याची सरशी होईल त्याला आम्ही मुजरा करूं. पेशव्यांच्या घरांत नानासाहेब व भाऊसाहेब यांमध्ये वांकडें आलें तेव्हां कोल्हापूरच्या संभाजीने भाऊसाहेबांस पेशवाईचा वस्त्रे दिली. ती वस्त्रे देण्याचा संभाजीला आणि घेण्याचा भाऊसाहेबाला वाजवी हक्क नव्हता असें कोणीच मानले नाही. भाऊसाहेबाच्या वतनाला आम्ही ' पेशवाईविरुद्ध बंड' असें नांव ठेवून तो भयंकर गुन्हा समजू; पण तसें त्या वेळी खुद्द नानासाहेब पेशव्यांनासुद्धा वाटलें नाही. सरदारीबद्दल भांडण लागलें म्हणजे लोक एवढेंच पहात की, बादीप्रतिवादी हे मूळ संपादकाचे योग्य वारस आहेत की नाहीत ते तसे असल्यास मग त्यांच्या भांडणांत कांही फायदा दिसल्याशिवाय आपणास पडण्याचे कारण नाही अशीच लोकांची समजूत होती. गायकवाडांच्या घरांत भांडण लागलें व तें सरकारांत आलें म्हणून फत्तेसिंग व गोविंदराव यांस एकमेकांवर चढ करून नजराणा भरावा लागला. भोसल्यांच्या घरांत भांडणे लागली ती त्यांनी सरकारांत आणली नाहीत म्हणून सरकारनें त्यांत लक्ष्यही घातलें नाहो. सरकारचें म्हणणें की, भांडणारे चौघे भाऊ राणाजीचे पुत्र असल्यामुळें सर्वाचा हक सरदारांवर आहेच. तंट्याच! निकाल होऊन जो शेवटी सर्वमान्य ठरेल त्यालाच आम्ही सरदारावी वस्त्रे देऊं म्हणजे झाले. सवाई माधवराव व राघोबादादा यांत भांडण लागले असतां गायकवाड व भोसले वगैरे पेशवाईंबाहेरचे सरदार त्या भांडणांत पडले नाहींत याचें कारण हेंच होय.

जातिद्वेषामुळें राज्य गेले असे जे म्हणतात ते कोणाच्या जातिद्वेषामुळे कोणाचे राजकारण विघडलें हे कांहीच सांगूं शकत नाहीत. मराठ्यांच्या राज्यकारभारांत भिन्न जातींच्य़ा लोकांचे संबंध नेहेमी एकत्र येत द्वोते. त्या अर्थी खरें पाहिले तर या जात्यभिमानाचा परिणाम राजकारणावर नेहमी होत असला पाहिजे; पण तसा तो झाल्याचें इतिहासांत कोठेंहि नमूद नाही. यावरून राज्यनाशाशी जातिभेदाचा कांहीएक संबंध नाही, व तो केव्हांही राजकारणाच्पा आड येत नाही, असें सिद्ध होते. फार
झालें तर इतिहासांतल्या एकदोन गोष्टींचा जातिभेदाशी संबंध जोडतां येईल, पैकी पहिलीतला पुरावा ऐकीव माहितीचा व संशयग्रस्त आहे. ती गोष्ट नारायणराव पेशव्यांच्या खुनासंबंधाची होय. नारायणरावानें प्रभूंचा छळ केला म्हणून त्यांस प्रभूंनी गारद्याकडून मारविले असें कांही जुन्या प्रभू मित्रांच्या तोंडून मी ऐकले आहे.

पण या गोष्टीला सदरहू मित्रांच्या सांगण्यापलीकडे कांहीं पुरावा नाही. दुसरी गोष्ट मात्र अनुमानाने खरी धरतां येण्याजोगी आहे. शाहूने मरते वेळी पेशव्यास मुख्याधिकाराची सनद दिली ती तुळाजी आंग्रे मानीनासा होऊन त्यानें पेशव्याशी बिघाड केला; तो आरमाराच्या व किल्लेकोटांच्या भरावर पेशव्यास कस्पटाप्रमाणें लेखीत असे; सबब पेशव्याने पांच चार वर्षे उद्योग करून अखेरीस मुंबईकर इंग्रजांच्या मदतीने त्याचें राज्य घेतले व त्यास सहकुटुंब कारागृहांत घातलें. पण यांत बहुतेक लोकांना माहीत नाही. अशी गोष्ट ही आहे की, तुळाजी आंग्रे हा चित्तपावनांचा कट्टर द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करू लागला होता. तुळाजीची हृद्द बागलकोटापासून विजयदुगापर्यंत होती व हा टापू तर चितपावनांचें माहेरघर होय. पेठे, फडके, परचुरे, रास्ते, भावे, देशमुख, घोरपडे, जोशी, बारामतीकर जोशी, सोलापूरकर जोशी, बर्वे पटवथंन, मेहेदळे, भानू, लागू इत्यादि पेशवाईतील दरबारी व सरदारी लोकांची मूळ घराणी याच टापूंमधली आहेत. आपल्या अधिकारास न जुमानणार्‍्या प्रतिनिधीला आणि दमानी गायकवाडाला पेशव्यानें त्यांचे सरेजाम खालसा न करितां सोडून दिले आणि तुळाजीचा मात्र समूळ उच्छेद केला, यावरून पेशव्यांच्या वर्तनाला जात्यभिभानाची कांही तरी प्रेरणा असावी असे अनुमान करणें अन्यायाचें होणार नाही. हा चितपावनांचा द्वेष तुळाजीच्या मृत्यूबरोबरच शांत झाला. पेशवाईत पुढे कोणी तुळाजीचा संप्रदाय चालवणारा सत्पुरुष उत्पन्न झाला नाही. हक्काच्या काळांत मात्र कोणी देशी- विदेशी लोकांच्या अंगात तुळाजीचा समंध संचरत असल्याचा केव्हां केव्हां भास होतो.

X

Right Click

No right click