उपोद्धात - ११

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

कोणल्या गुणांच्या अभावासुळें आम्ही इंग्रजांसारख्या युरोपियन राष्ट्रास कुंठित करूं शकलों नाही, असल्या राष्ट्राने टक्कर दिली असता ती सोसवण्याचें सामर्थ्य आमच्या राज्यांत कां राहिलें नव्हते, य़ाची मीमांसा एवढा वेळ करण्यांत आली. तिच्याच अंगस्वानें कारस्थानांच्या बाबतीत इंग्रजांस आम्हांवर कां यश मिळवितां आलें हे सांगणे ओघासच येते. मुबई व सुरत या बंदरांबाहेर इंग्रजांचा व्याप नव्हता, तेव्हांच दिवाने त्यांत तेथून कां घालवून दिले नाही, हे आपले राज्य घेतील हें ओळखून हिंदी राजेरजवाड्यांनी या परकी लोकांस प्रथमपासून कां जरबेत ठेवलें नाहीं, इत्यादि प्रश्न उपस्थित करणारे लोक त्या वेळची वस्तुस्थिति लक्षांत घेत नाहीत. त्या काळांतल्या लोकांची ज्ञानमर्यादा सामान्यतः किती आकुंचित होती याचा विवार केला म्हणजे व्यापाराकरितां आपल्या देशांत आलेल्या त्या गोऱ्या! लोकांचे खरें स्वरूप घ्यानांत न आल्याबद्दह कोणासहि दोष देतां येत नाही. हे गोरे लोक व्यापारासाठी वखार बांधायला जागा मागतात, रुमालाने हात बांधून नम्रतेने उभे राहतात, पायांवर डोकें ठेवतात, इतकेंच त्या त्या हिंदी स्थानिक अंमलदारांच्या नजरेस पडले ते त्यांनी खरें मानलें.

या व्यापाऱ्यांना वखारीकरितां जागा दिली तर हे स्वतःकरितां आमच्या मुलखाची भली मोठी वखार बनवून टाकतील, ज्या रुमालाने त्यांना स्वतःचे हात बांधले आहेत त्याच रुमालाने ते आमच्या मुसक्या आवळतील, हे आज पायांवर डोकें ठेवतात पण उद्यां आमच्या डोक्यावर पाय ठेवतील, असल्या विचित्र कल्पना ते स्थानिक अंमलदार. किती धूर्त असले तरी त्यांच्या मनांत कशा याव्या. व्यापाराचें निमित्त करून हेच इंग्रज युरोपखंडाच्या कोनाकोपच्यांत कोठेहि पाय ठेवते, तर हे कोण, कशाकरितां आले, ही चौकशी तस्हाल होऊन त्याचें तेथून उच्चाटन झालें असते, पण हिंदुस्थानच्या समुद्रेकिनाऱ्याबर इंग्रज वगैरे युरोपियन लोक किल्ले बांधून राहिले होते तरी शेपन्नास वर्षे त्याजकडे कोणी दुंकून पाहिलें नाही ! याचे कारण हिंदुस्थान हा अफाट देश, त्यांत अठरापगड जाती, शिवाय त्यांतच मुसलमान, पारशी, ख्रिस्ती, ज्यू इत्यादि परथर्मी लोकांची खिचडी झालेली, शिवाय या देशांत शेंकडों राज्ये व हजारो संस्थाने अशा स्थितीत इंग्रज, फ्रेंच वगैरे अनोळखी लोक येथे येऊन राहिले तर ते खरोखर व्यापाराकरितां आले आहेत का. कशाकारिता आले आहेत याची चौकशी कोण करणार कोणाचें झाले तरी चालू व्यवद्वारावर लक्ष असणार, इंग्रज स्वतःस व्यापारी म्हणवतात तर त्यांनी व्यापारच करावा अधिक पंचाईत करण्याचे काय कारण? त्यांनी किल्ले बांधले म्हणून संशय घ्यावा तर कोणीहि लुंगासुंगा पाळेगार गढ्या ठाणी बळकावून घटाइच्या य्रोडी सांगतच असतो; त्यांतलेच हे ! असलेच विचार कोणाच्याही झाले तर मनांत येणार. त्यांतून इकडच्या राजेरजवाड्यांस या परकी लोकांशी स्नेह्भावानें वागणेंच अधिक फायदेशीर वाटत होतें. कारण, या परकी लोकांच्या व्यापारामुळे आपलें जकातीचे उत्पन्न वाढतें, लागेल तो परदेशी जिन्नस हे आणून देतात, आणि सर्वात मुख्य गोष्ट ही का, हे उत्तम गोलंदाज व उत्तम लढवय्ये असून शिवाय स्नेहाखातर तोफा व दारूगोळा सिद्धींत असल्यामुळे संकटाच्या वेळा यांचा मोठाच उपयोग होण्याजोगा होता !

सन १७३७ त मराठ्यांनी पोर्तुगीज लोकांपासून साष्टी घेतली त्या दिवसापासून साष्टीबर मुंबईकर इंग्रजांचा डोळा होता. किल्लेदारास लांच देऊन अथवा अन्य कांही युक्तीने निदान बळजबरीनेसुद्धा, साष्टी घ्यावयाचीच असं ठरवून योंग्य संधींची प्रतीक्षा करीत ते बसले द्वोते. मध्यंतरी माधवराव व राघोबा यांच्या कलहापासून आपल्याला या बावतीत कांही फायदा करून घेतां येईल असं त्यांस वाटत होते; परंतु ती त्यांची आशा निष्फळ झाली, शेवटी नारायणराव पेशव्याचा खून होऊन पेशवाईत तारांबळ उडालेली पहातांच मुंबईकर इंग्रजांनी साष्टीस वेडा घालून तो किल्ला काबीज केला.

अडचणीच्या वेळी मुंबईकर इंग्रजांनी पेशव्यास गाठलें व आपला हेतू सिद्धीस नेला यापेक्षां पेशवाई भरभराटीत असतां अगर निदान माधवरावाच्या कारकीर्दीत जरी मराठ्यांचे व इंग्रजांचे युद्ध जुंपले असते, तरी तें मराठ्यांस अधिक श्रेयस्कर झालें असते. पण तसें घडून आले नाही हा इंग्रजांचा दैवयोगच समजला पाहिजे : पानपतचे युद्ध जर झालें नसते, तर पेशव्यांची स्वारी बिहार व बंगाल याच प्रांतावर झाली असती. कारण, हिंदुस्थानांत त्या दोहोंखेरीज दुसरे प्रांत मोकळे राहिलेच नव्हते. तस झालें असतें तर प्लासीच्या लढाईत क्लाइव्हने मिळविलेले यश व्यर्थ झाले असते आणि पुढच्या दहा वर्षात इंग्रजांनी त्या प्रांती जो फैलावा केला तो त्यांस करतां आला नसता. हैदरआली जर उपटसुंभाप्रमागे मध्येच नवीन शत्रू निर्माण झाला नसता, तर माधवरावाच्या स्वाऱ्या पूर्वीप्रमाणे अर्काट त्रिचनापल्ली वगैरे मुलुखावर चालू राहिल्या असत्या अणि अर्थातच मद्रासकर इंग्रजांना गाशा गुंडाळण्याचा प्रसंग झाला असता.

सन १७६५ त मुंबईकरांनी मालवण घेतले व बंगालच्या इंग्रजांनी मल्हारराव होळकरावर छापा घालून त्याची नासाडी केली. त्या वेळी इंग्रज-मराठ्यांचं युद्ध होण्याचा योग होता. परंतु मल्हारराव मृत्यु पावल्यामुळे ते प्रकरण तेवढ्यावरच थांबले, सन १७६६ त मद्रासकर इंग्रजांनी निजामअलीस सामील करून प्रथम हैदरावर व मागून पेशव्यांवर स्वारी करण्याचा बेत केला होता. परंतु माधवरावाच्या हुशारीमुळे तो त्यांचा बेत तडीस गेला नाही. पुढें सन १७३२ त दुआाबांत मराठ्यांच्या अणि इंग्रजांच्या चकमकी झाल्या. परंतु त्याच वेळां माधबराव मृत्यु पावल्यामुळे ते युद्ध पुढें चालू राहण्याचे अर्थातच बंद पडले; आणि अडचणीच्या भलत्याच वेळी म्हणजे राघोबाचा पाठलाग करण्यांत पेशव्यांच्या फौजा गुंतल्या असतां इंग्रजांशी युद्ध सुरू करण्याचा प्रसंग त्यांस प्राप्त झाला. तात्पयं, या पहिल्या युद्धाची सुरुवात इंग्रजांना आपल्या इच्छेप्रमाणे व सोईप्रमाणे केली; त्यांत मराठ्यांची इच्छा अगर सोय कोणतीच नव्हती.

Hits: 141
X

Right Click

No right click