उपोद्धात - ४
तोफखान्याचींच गोष्ट घ्या ना ! युरोपियन लोक तोफा मारण्यांत पटाईत आहेत, तोफांच्या बळावर त्यांना फारच आश्वर्यकारक करामत करून दाखवितां येते, हें युरोपियन आरमारें इकडे प्रथम आली तेव्हां आम्हांला कळलें. याला प्रत्यंतर तोफेच्या मरामतीकरिता माणसे लागतात, त्यांना पेशवाईत दयोवर्दी व खलाशी हीच नांवे होती, आणि इंग्रजी फौजेतसुद्धां या कामावरच्या हिंदी लोकांस 'लॅस्कार ' असेंच म्हणत असत; असो. आम्ही गोरे लोकांच्या आरमारापासून तोफा विकत घेतल्या, कांही येथे ओतविल्या, आणि दारूगोळासुद्धां त्यांच्याच सांगण्याप्रमाणे तयार करूं लागलो. पण पुढें त्या बाबतींत उत्तरोत्तर आम्हांस सुधारणा करता यावी ती कांहीएक आली नाही; त्यामुळे या कामांत इंग्रजांची अगर फ्रेंचांची बरोबरी आम्हांला कधी करतां आली नाहीं. ते हरहमेश्या सुधारणा करीत गेले आणि एकदां कधी फिरंग्यांनी सोळाव्या शतकांत कित्ता घालून दिला तोच आम्ही वळवीत बसलो. इंग्रजांनी विजयदुर्ग घेतला, मागून दहा वर्षानी मालवण घेतलें, तरी आम्ही 'इंग्रजाने आगळीक करून मालवण घेतलें. फारच शेफारला ! वाढते मोडतच आहे. ' असें चरफडण्यापलीकडे अगर ' शिवलंका (शिवाजीनें पाण्यांत बसविलेले लं॑केप्रमाणे असाध्य स्थळ ) होती. किल्ला निर्मिल्या तागायत दुसरियास साध्य झाला नव्हता. ' म्हणून दुःखोद्गार काढण्यापलीकडे काय केले पुनः आणखी दहा वर्षांनी साष्टी घेतली; तरी आम्ही सावध झालोच नाहीं, व तोफांच्या बळावर आमच्या किल्ल्यांचे रक्षण कसें करावें हे आम्ही शिकलो नाही ! मग सिंहगड, पुरंदर, रायगड, वासोटा इत्यादि किल्ले इंग्रजांनी आम्हांपासून भराभर हिसकून घेतले यांत दोष कोणाचा ?
असे तोफा ओतणारे कारागीर अगर दारूगोळा तयार करणारे अगर चापाच्या बंदुका तयार करणारे कल्पक लोक आमच्यांत नव्हते असेंहि नाही ! पुण्याच्या तोफखान्यांत पाहिजे तेवढाल्या तोफा व गरनाळा युरोपियन व देशी कारागीर ओतून देत असत हे तर राहोच, पण मिरजेसारख्या किल्ल्यांतसद्धां लागतील तशा तोफा ओतून घेतां येत असत आणि कुलपी व दुसऱ्या कित्येक प्रकारचे गोळे, एकसारख्या तास पाऊण तास जळणाऱ्या चंद्रज्योती, आणि बाण व दारू तयार होत असे. पंचरसी तोफा ओतण्याची मजुरी तिच्या वजनावर दर शेरास शंभर रुपये याप्रमाणें आकारली जात असे असें आम्ही जुनें दप्तर चाळतांना वाचल्याचे स्मरतें. यापेक्षा इंग्रजी तोफा विकत घेतल्या तर त्या स्वस्त पडत त्यामुळें गरजू सरकारे आयल्या वेळी त्याच बिकत घेत. झीज सोसून स्वदेशी माल घ्यावा व देशी कारागीरांस उत्तेजन द्यावे हे तत्व त्यावेळी सुद्धा पसंत नव्हतेंच.
तोफखान्याची शिस्त अशी म्हणण्याजोगी पेशवाईत फारशी असल्याचे त्या वेळेच्या लेखांत दिसून येत नाही. पानशांनी कधी कुठे तरवार (अथवा खरें बोलायचें तर तोफ) मारली होती त्याच लौकिकावर ते पेशताईंच्या अखेरीपर्यंत तोफखान्याचे दरोगे होते. त्यांच्या तोफांचा चांगुलपणा त्या तोफांनी पूर्वी कधीकाळी दाखविलेल्या करामतीवर मोजला जात असे ! मग हल्लीची करामत कशीही असो ! एकाद्या वेढ्यांत मराठी तोफांचा किल्ल्यावर भयंकर भडिमार होण्याचे भय नव्हृतेंच. कारण, दारूगोळ्याच्या खर्चावर दरोग्याची काकदृष्टि नेइमी फिरत असायची; शिवाय फार वार केले तर तोफा फुटतील अगर बिघडतील हो. मोठीच पंचाईत होती ! असल्या जुन्या तोफा आणि 'कृष्णमृत्तिके ' ची टंचाई असल्यावर मग काय विचारावे १ आमच्या फौजांचे मोर्चे एखाद्या किल्ल्यास बसले म्हणजे मोच्यांत गोलंदाजांनी एकदां तोफेचा बार काढून पुनः बार भरून ठेवावा, मग चिलीम ओढावी, घटका दोन घटका गप्पागोष्टी कराव्या, इकडे थोडे हिंडावे, मग तोफेजवळ जाऊन भरलेला बार सोडावा आणि दुसरा भरून ठेवाचा,-पुनः चिलीम गप्पा वगैरे प्रकार व्हावे, याप्रमाणे सायंकाळपर्यंत दहा-पांच बार काढून तोफ तळावर आणून पोंचती केली म्हणजे संपला रोजगार. या लिहिण्यांत आतिशयोक्ति बिलकुल नाही. इंप्रज प्रेक्षकांनी हे लिहून ठेवले आहे याचाच उद्धार आम्हा येथें केला आहे व जुना पत्रव्यवहार आम्ही जो वाचिला आहे त्यावरून अशीच वहिवाट असल्याचें अनुमान निघतं. सन १७७४ पासून १७८१ पर्यंत पेशवाई फौजांची इंग्रजांशी राहून राहून सहा वर्षे लढाई सुरू होती. तीत पानशांनी दहापांच वेळां तरी इंग्रजी फौजेवर तोफांचा म्हणण्यांजोगा एल्गार केला असल्यास फारच म्हणावयाचे ! हरिपंततात्यांची तोफा मारण्याची शक्कल या युद्धांत कांही निराळीच होती. ते लांब पल्ल्याच्या फारच मोठ्या तोफा नेऊन त्यांचा मारा इंग्रजी फौजेवर दीड दोन कोसांवरून करीत. इतक्या लांबून हें काम करविण्याचा हेतू एवढाच की, सुदैवाने टोपीवाल्याला एकदोन गोळे लागले तर त्याची शेपन्नास माणते मरतील. तसे नाही झाले तरी निदान त्याचा हल्ला आल्यास आगाऊच तोफा काढून पिछाडीस पोचावितां येतील.
कोणी म्हणेल की, तोफखान्याच्या कामातली हेळसांड तुम्ही वर्णन करितां ती निदान दौलतराव शिंद्याला तरी लागू नाही. कारण, त्याचा तोफखाना इंग्रजांच्या बरोबरींचा होता हे खुद इंप्रजांनीच कबूल केले आहे. होय, ' म्हणणं खरं आहे. पण त्यावरून आमचे हिंदी लोक तोफा मारण्यांत इंग्रजांच्या बरोबरीला आले होते असं मात्र सिद्ध होत नाही. कारण, शिंद्याचा तोफखाना फ्रेंच व इंग्रज अंमलदारांनी तयार केलेला असून त्याची वहिवाट सुद्धा तेच लोक करीत होते; आणि असल्या परस्वाधीनपणामुळे अखेर शिंद्याचा फायदा न होतां घातच झाला कारण, परकी लोकांपैकी पुष्कळ असामी शिंद्यास आयते वेळी दगा देऊन इंग्रजांकडे निघून गेले. खुद्द सर्व पलटणांवरचा मुख्य मुसा पिरू यानेंच सर्वांआधी इंग्रजांशी सूत जुळवून विलायतचा रत्ता सुधारल्यावर त्याने घातलेले तोफा व बंदुका तयार करण्याचे कारखाने आयतेच दारूगोळ्यांसह इंग्रजांच्या हाती अल्प श्रमाने लागावे, यांत नवल तें काय ?
उपोद्धात - ३
शिवाजी दिल्लीस गेला तेव्हां मोरोपंत पेशवे व अण्णाजी दत्तो सचिव यांजवर राज्याचा कुलमुखत्यार सोंपवून गेला होता. पण त्या दोघांत मत्सर व द्वेष उत्पन्न झाल्यामुळें राज्यकारभार सुरळीतपणे चालेनासा झाला ! शिवाजी लौकरच परत आल्यामुळें त्या वेळी वाईट परिणाम झाला नाही, तरी पुढें तो संभाजीच्या कारकीर्दीत झालाच ! राजारामानें संताजीस मुख्य व धनाजीस दुय्यम सेनापति नेमून त्यांवर सैन्याचा सर्व कारभार सोंपविला असतां त्या दोघांत चुरस वाढून संताजी मारला गेला! शाहूच्या कारकीर्दींत सेनाकर्ते व सेनापति यांची एका मोहिमेवर रवानगी झाली असतां भांडण होऊन सेनाकर्त्यांवर मोठाच संकटाचा प्रसंग ओढवला होता ! प्रत्येक स्वारीतला पत्रव्यवहार पहा, हाताखालच्या सरदारांनी मुख्य सरदारासी बांकून वागावे, कुचरपणा करावा, फंद्फितुर करावा, असें कधी घडून आलें नाही असा प्रसंग फारच विरळा. बारभाईंच्या कारस्थानाचा कसा बोजवारा झाला ! नाना, बापू, मोरोबा व चिंतो विठ्ठल कसे भांडले, आणि शेंवटच्या दोघांनी आपल्या सोबत्यांवर सूड उगवण्याच्या हट्टास पडून पेशवाई इंग्रजांच्या घशात घालण्याचा कसा घाट घातला होता, हें प्रसिद्धच आहे. इंग्रज लोकांत असे तंटे होत नाहींत असें नाही; नेहमी होतात. परंतु समूहस्वरूपाची कामे करण्याचें त्यांच्या अंगवळणी पडलें असल्यामुळें त्यांचे तंटे विकोपास जाऊन उद्दिष्ट कार्यांचा घात होण्याचें भय नसतें.
समूहस्वरूपानें आम्ही केलेली कार्ये यशस्वी होत नसल्यामुळें आमचें राज्यतंत्र पाश्चात्यांप्रमाणे संस्थाप्रधान असू शकत नाही; तर तें व्यक्तिप्रधानच असावे लागतें- म्हणजे बुद्धिमान उत्साही निग्रही अशा एखाद्या प्रबळ व्यक्तीने पुढें सरून मुख्याधिकारी व्हावें आणि इतरांना त्याच्या प्रेरणेनें कामें करावी असेच आमच्या प्रकृतीला मानवते. पण जेव्हां अशी एखादी प्रबळ व्यक्ति अधिकारारूढ होते तेव्हां आधी प्रथम ती अधिकार आपल्या घराण्यांत कायमचा राहील असाच बंदोबस्त करून टाकते! असे एका कुळांतले अधिकारी एकामागून एक चांगले निपजले तर राज्यतंत्र उत्तमच चालते. पण तसें घडलें नाही, एखादी व्यक्ति वाईट निघाली, तर ते एकदम कोसळते. शिवाजाीने माणसें तयार केली, किल्ले बांधले, सेना व आरमार निर्माण केलें, प्रत्येक खात्याच्या शिस्ती बांधून दिल्या, सर्व कांही केले; पण मागून संभाजी गादीवर येताच मागची पंचवीस-तीस वर्षांची मेहनत मातीमोल झाली. बाळाजीपंत नाना-आसूच माधवरावापर्यंत एकामागून एक चार पेशवे चांगले निर्माण झाले यामुळें पेशवाईचे राज्यतंत्र ठीक चाललें. पण त्यांमागून राघोबाची उत्सवमूर्ति पुढें येतांच तंटा-भांडणांचा सुकाळ होऊन राज्यास कायमची उतरती कळा लागली ! नाना फडणवीस हे मराठ्यांतील अद्वितीय कारस्थानी पुरुष होते, महादजी शिंदे मराठ्यांतले अद्वितीय सेनानायक होते, हें खरे; पण ते मेल्यावर पुढें काय १ पुढे सारा अंधार ! त्यांची अक्कल व खांबी करामत त्यांच्याबरोबर गेली ती गेलीच ईस्ट इंडिया कंपनीसारख्या संस्थेत असा प्रकार कधी होऊ शकत नाही.
तिचा प्रमुख अधिकार आधी अयोग्य माणसाच्या हाती जातच नाही; आणि गेलाच तरी तो माणूस संस्थेच्या कायद्यांनी चोहोकहून जखडून गेला असल्यामुळें संभाजी अगर बाजीराव यांप्रमाणे स्वच्छंदानें वागू शकत नाही. संस्थेच्या कारभारांत कालभानाप्रमाणे नेहमी नवें जुने दोत असते. त्यांत नवा उत्साह, नव्या कल्पना, नवे मार्गे, यांची भर पडत असते. त्यामुळे तिचा जोम व व्याप कायम राहून क्रियासातत्य अविच्छिन्न राहते. एकसत्ताक राज्य चांगलें की अनेकसत्ताक राज्य चांगलें, या वादाशी येथें कांही कर्तव्य नाही. पेशवाईचे राज्यतंत्र अव्यवस्थित व व्यक्तिप्रधान होते, आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राज्यतंत्र सुव्यवस्थित व संस्थाप्रधान होतें. पहिल्याचा उत्साह मावळत चालला होता, तर दुसऱ्याचा अधिकाधिक वर्धमान होत होता, एवढेंच आम्हांला सांगावयार्चे आहे.
आमच्या लोकांत ज्ञाना्र्जनाची हौस नाही. नवीन कल्पना बसवावी, नवीन शोध लावावे, हा हव्यास आम्हांला नाही. कोणी कल्पक अगर शोधक मनुष्य निघालाच तर पडेल तो पैका खर्च करून त्या मनुष्यास उत्तेजन देऊन त्याची नवी कल्पना अगर शोध व्यवहारांत आणावा याची जरूरीच आम्हांला भासत नाही दुसऱ्याचे नुसते अनुकरण करण्याची बुद्धि मात्र आम्हांस आहे एवढें खरे,
उपोद्धात - १
महाराष्ट्राचा नुसता इतिहास समजावून देणाराी पुस्तके बऱ्याच लोकांनी लिहिली आहेत; परंलु त्याहूनही अधिक महत्त्वाचं काम सदर विषयावर सविस्तर स्वतंत्र टीकाप्रबंध निर्माण करणें हे होय. असलें बिकट काम रा. रा. नरसोपंततात्या केळकर या अधिकारी ग्रहस्थांनी हाती घेऊन पार पाडिले यावद्दल वाचकवर्ग त्यांचा ऋणी आहे. असल्या ग्रंथांतून स्थल काल व व्यक्ति यांसंबंधाचे निर्देश कचित् बिनचुक नसले तरी ती गोष्ट मुद्द्याची नसल्यामुळें त्या त्या ठिकाणच्या ऊहापोहाला वैगुण्य येत नाही. प्रत्येक स्थळी साधकबाधक प्रमाणे दाखवून प्रंथकार आपले म्हणणे कितपत सिद्ध करितो एवढेंच मुख्यत्वे पहावयाचे असतें. आणि तशा दृष्टीनें पाहणाऱ्याला रा. रा. नरसोपंत केळकर यांनी प्रकरणशः केलेली चर्चा मुद्देतूद व समर्पक आहे हेच मान्य करावें लागेल. ग्रंथकाराच्या या चर्चेपासून निष्पन्न होणारा तात्पर्यार्थ, मराठ्यांचे राज्य इंग्रजांनाी कां व कसे घेतलें, हाच होय. आताच्या काळांत या विषयाचें महत्त्व निव्वळ ऐतिहासिक आहे हें उघडच आहे. तरी याच्या चिंतनापासून ' पुढच्यास ठेंच मागचा शाहाणा ' या न्यायाने आजमितीससुद्धा फारच बोध घेतां येण्याजोगा आहे. या विषयावर मी चार शब्द लिहावे अशी ग्रंथकारांची इच्छा दिसल्यानुळें या उपोद्धाताच्या रूपानें तसें करीत आहे.
हे पुस्तक पाहिल्याबरोबर पहिली गोष्ट मनांत येते ती हीच की, हे शतसांवत्सरिक वाडूमयश्राद्ध म्हणून जें केलें आहे ते अंतरिम श्राद्ध होय ! याची खरी तिथी
म्हणजे तारीख - ३१ डिसेंबर सन १९०२ ही होय. कारण, मराठी साम्राज्याच्या स्वातंत्र्याचा लोप होऊन त्या तारखेस बरोबर शंभर वर्षे झाली! सन १८०२ सालच्या शेवटच्या दिवसाने स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा शेवट पाहिला. सर्व स्वतंत्र मराठी राज्यास पूर्वीपासून ' शिवशाद्दी ' हे नांव चालत आलें आहे. या शिवशाहीला हुकमतींत वागवून तिचें स्वस्तिक्षेम सांभाळण्याचा ज्याचा परंपरागत अधिकार, त्या बाजीराव पेशव्यानें सन १८०९ च्या डिसेंबर महिन्याच्या ३१ व्या तारखेस इंग्रजांशी वसईचा तह करून त्यांचा आश्रय व ताबेदारी संपादन केली. शिवशाहीच्या स्वातंत्र्यसौभाग्याचा कुंकुमतिलक तिच्याच त्या नादान पोरानें त्या तहाच्या चिटोर््यानें पुसून टाकला.
सन १८१८ साली मराठी राज्य नष्ट झालें हे म्हणणें खरे नाही. कारण, अजून सुद्धा दोनअडीच कोटी रुपये उत्पन्नाचे मराठी राज्य आहेच. परंतु त्या राज्याला आतां कोणी शिवशाहीचा भाग म्हणत नसून तो ब्रिटिश साम्राज्याचा एक घटकावयव आहे असेंच मानण्यांत येते. पेशवाई बुडाल्यासुळें पुष्कळ श्रीमंत घराणी धुळीस मिळाली, हजारो लोकांचें अन्न गेले, हो गोष्ट वाईट झाली हे खरे; परंतु नागपूरचे राज्य खालसा झालें त्यापेक्षां पेशवाई नष्ट झाली या गोष्टीला अधिक किंमत देतां येत नाही. बाजीराव जर इंग्रजांशी सरळपणानें वागता तर दुसर्या कित्येक मराठी संस्थानांप्रमाणे त्याचेंही संस्थान कदाचित् अद्यापिसुद्धां जिवंत राहिले असतें, परंतु शिवशाहीच्य़ा दृष्टी त्याची किंमत केव्हांहि शुन्यच ठरली असती.
शिवशाहीचें स्मरण १९०२ मध्यें होवो अगर १९१८ मध्ये होवो, ते शतसांवत्सरिक असो, प्रतिवार्षिक असो अगर प्रत्यही होणारे असो; जेव्हां जेव्हा ते स्मरण महाराष्ट्रांत जन्म पावलेल्या कोणाही मनुष्यास होते, तेव्हां तेव्हां तो आपल्या मनास खेदानें व आश्वर्याने असा प्रश्न करितो की, हे गतकालीन राज्यवैभव इतक्या अल्पावकाशांत कसे नष्ट झालें? मोठे मोठे विशाल बुद्धीचे मुत्सदी व महापराक्रमी सरदार शिवशाहीत हयात होते ते सर्वच अदूरदृष्टि होते की काय? इंप्रजी हल्ल्यापासून स्वराज्याचा बचाव करण्याचा उपाय कोणीच कसा आगाऊ योजून ठेविला नाही?
परद्वीपाहून आलेल्या मूठभर इंम्रजांनीं शिवशाही पादाकांत केली हें घडले तरी कसे? या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत अनेकांनी अनेक दिली आहेत ती. सर्वच खरी आहेत असें नाही. कांही तर अगदीच अप्रयोजक आहेत; पण अशाच उत्तरांत सत्याचा थोडाबहुत अंश निर्विवाद आहे. असल्या त्या सर्व उत्तरांवर सविस्तर टीका या ग्रंथांत आलीच आहे. तरी विषयाचं स्वरूप वाचकांच्या लक्ष्यांत अधिक स्पष्टपणें यावे म्हणून त्याची निराळ्या तऱ्हेने मांडणी केल्यास ती रा. केळकर यांच्या टीकेस अधिक पोषकच होईल.
उपोद्धात - २
मराठ्यांच्या कर्तबगारीमुळें महाराष्ट्र जरी एका काळी महत्तर बनलें होते, तरी हे मराठे लोक एका काळी सर्व हिंदुस्थानाला अजिंक्य भासत होते, तरी त्यांनासुद्धा
इंग्रजांनीं जिंकलें, यावरून इंग्रजांच्या अंगी नसणारे कांही विशेष राजकीय दुर्गुण मराठ्यांच्या अंगी जन्मसिद्ध असले पाहिजेत, काही विशेष गैरसोईच्या परिस्थितीने
त्यांचे हातपाय जखडले गेले असले पाहिजेत, आणि अशा दुर्गुणांचा व परिस्थितीचा फायदा इंग्रजांस मिळाला असला पाहिजे हे त्पष्ट आहे. तर असे हे मराठ्यांचे
दुर्गुण कोणते होते ब त्यांच्या परिस्थितींत कोणत्या गैरसोई होत्या याचा आपण विचार करू.
मराठ्यांमधला प्रमुख दुर्गुण म्हटला तर देशाभिमानाचा बहुतांशी अभाव हा होय. या सद्गुणाची पैदासच जर मुळी हिंदुस्थानांत अत्यल्प होते, तर महाराष्ट्राच्या वांटणीस त्यांतला कितीसा अंश येणार. आम्ही लोक गरीब भाबडे असल्याचें सर्व जगाला प्राचीन काळापासून माहीत आहें. कोणीही परके लोक आम्हांवर स्वाऱ्या करत आणि आमची राज्यें बळकावीत, आमच्या ग्रामसंस्था भ्रमसमजुती, रीतिरिवाज, वतनहक्क, यांत राज्यकर्ते जेथपर्यत हात घालत नाहीत तेथपर्यंत ते लोक कोण आहेत, काय करतात, याची पंवाईत आम्ही करीत नाही. धार्मिक बाबतींत परमतासहिष्णुता ह्वा दुर्गुण आहे. हे आम्हांस ठाऊक आहे; पण राजकीय बाबतींत परचक्रासहिष्णुता हा अमोलिक सद्गुण आहे हे आम्हांला ठाऊक नाही ! शिवाजीपासून शाहूच्या कारकीर्दीसस सुरुवात होईपर्यंत मराठे लोकांत देशाभिमानाचें वारे खेळत होतें असे पुष्कळांस वाटतें; पण त्या वृत्तीला देशाभिमान हें नांव देण्यापेक्षा राज्याभिमान हेंच नांव देणें अधिक योग्य आहे. कारण की, महाराजांच्या फौजेतले मराठे जर मुसलमानांशी एकनिष्ठेने लढत होते तर त्यांचेच आणखी भाऊबंद मुसलमानी फौजांत होते तेहि तितक्याच एकनिष्ठेनें महाराजांच्या फौजांशी लढत होते ! शाहूच्या कारकीर्दींत राज्याच्या दोन वाटण्या झाल्याबरोबर या राज्याभिमानाचेही दोन तुकडे होऊन पेशवे भोसले गायकवाड आंग्रे प्रतिनिधी सचिव कोल्हापूरकर इत्यादि संस्थानें झाली, आणि त्याही संस्थानांतून शिंदे होळकर पटवर्धन रास्ते इत्यांदी आणखी सरंजाम निर्माण झाले; त्याबरोबर वर सांगितलेल्या राज्याभिमानाचेहि आणखी बारीक तुकडे होत होत. शेवटी तो अस्त झाला ! पेशवाईच्या काळांत राज्याभिमान अस्तित्वात होता म्हणावें तर त्या राज्याचे शत्रू निजामअली व हैदरअली यांच्या पदरी हजारों मराठे शिलेदार व सरदार होते; आणि ते पेशव्यांशी लढतांना त्यांचें नुकसान करण्यास बिलकूल कसूर करीत नव्हते. पेशवाईबद्दल ब्राह्यणांना तरी अभिमान होता
म्हणावें तर तेही पेशव्यांशी वैरभाव धरणाऱ्या जाट रोहिले रजपूत इंग्रज फ्रेंच -इत्यादी लोकांच्या पदरी राहून पेशवाईचे अकल्याण करण्यास प्रवृत्त होतच होते.
ईस्ट इंडिया कंपनीची मुंबईखात्याची पायदळ पलटण पेशवाईची रयत असलेल्या मराठ्यांचीच होती आणि यांपैकी हजारो लोक इंग्रजांच्या वतीने समरांगणांत पेशवाई
फौजांशी लढतांना मृत्यू पावले आहेत.
याच्या उलट इंग्रजांचा देशाभिमान कसा प्रखर व शाबूत होता हें सुप्रसिद्धच आहे. एका इंग्रज डॉक्टरानें बादशहाच्या मुलाला औषध देऊन बरे केलें तेव्हां बादशाह खुषीनें त्या डॉक्टराला लाख पन्नास हजार रुपये देता; परंतु डॉक्टराने दुसरें कांही बक्षीस न घेतां बादशाहास अर्ज केला की, माझ्या देशाच्या लोकांस तुमच्या राज्यांत व्यापाराची सवलत द्या म्हणजे मला बक्षीस पोचले. मीर जाफरच्या मृत्युपत्रामुळें क्लाइव्हला मिळालेल्या पैश्याचा विनियोग त्यानें आपल्या देशाच्या लष्करी अंमलदारांच्य़ा उपयोगार्थ केला आणि खर्ड्याच्या लढाईनंतरवा तह ठरवितेवेळी निजामअलीनें नाना फडणवीस यास वीस इजार रुपये उत्पन्नाचे गांव दिलें तें त्याने स्वतःकरितां खुशाल ठेवून घेतले. चारचौघांनीं मिळून एखादी संस्था चालविण्याची अगर एखादा कारभार पार पाडण्याची आम्हांला संवय नाही; यामुळें तसें कार्य आमच्या अंगावर पडलेच तर तें एकचित्तानें चालवणे आमच्या हातून निभत नाही. मतभेद व तट पहून शेवटी तंटे होतात, पुष्कळ वेळां ते तंटे विकोपास जाऊन भलताच अनर्थ ओढवतो, हें आपण नेहमी पहातो. जी गोष्ट हांच्या व्यवहारांत तीच पूर्वीच्या राज्यकारभारांत घडून येत होती.
प्रस्तावना
बरोबर शंभर वर्षांपूर्वी पुण्यांतून मराठेशाही नष्ट झाली ! प्रस्तुत पुस्तक हे तिचें प्रथम-शत-सांवत्सरिक वाडूमयश्राद्ध आहे.
मराठेशाहीचा खरा अंत कोणल्या दिवशी झाला याविषयी मतभेद होण्याचा संभव आहे. कित्येक तो दिवस ता. १२ केव्रुवारी सन १७९४ हा मानतात; कारण
या दिवशी प्रसिद्ध मराठा वीर महादजी शिंदा वारला. महादजी हा लष्करी दृष्टीनें मराठेशाहोचा मुल्य आधारस्तंभ होता याबद्दल मुळीच वाद नाही.
कित्येक तो दिवस ता. १३ मार्च सन १८०० हा मानतात; कारण, त्या दिवशी प्रसिद्ध मराठा मुत्सद्दी नाना फडणवीस द्या वारला. नानाबरोबर मराठेशाहीतील सर्व
शहाणपण गेले, असें इंग्रज इतिहासकारांनींही आपल्या ग्रंथांतून म्हटलें आहे.
कित्येक तो दिवस ३१ डिसेंबर १८०२ हा मानतात; कारण, त्या दिवशी वसईचा तह होऊन बाजीराच हा इंम्रजांचा सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजाची इंग्रजांच्या मध्यस्थीच्या पाचरीनें अनेक शकलं झाली.
कित्येक तो दिवस ता. २३ सप्टेंबर १८०३ हा मानतात; कारण, त्या दिवशी शिंद्यांचा वसई येथील लढाईत प्रत्यक्ष पराभव होऊन मराठा सरदारांचा मित्रसंघ फुटला व मराठेशाहीला आता तरणोपाय नाही हें जगजाहीर झाले.
कित्येक तो दिवस ता, १५७ माहे नवंबर १८१७ ह्वा मानतात, कारण, त्या दिवशी पुण्यांत शनिवारच्या वाड्यावर इंग्रजांचे निशाण लागलें.
कित्येक तो दिवस ता. ३ जून १८१८ हा मानतात; कारण, त्या दिवशी बाजीराव अश्लीरगडाजवळ ढोलकोट येथें जनरल माल्कम याच्या स्वाधीन होऊन त्याने राज्यावर उदक सोडले.
कित्येक तो दिवस ता. १६ मे सन १८४९ ह्या मानतात; कारण, त्या दिवशी मराठेशाहीची जी मूळची-सातारची-गादी ती खालसा झाली.
बरील सहा-सात तारखांपैकी कोणती तारीख मराठेशाहीची खरी श्राद्धतिथी मानावयाची ही ज्याच्या त्याच्या मनोधर्माची गोष्ट आहे. सामान्यतः सन १८१६-१८ हे साल मराठेशाहीच्या अंताचे साल मानतात, व तेंच स्थूलमान आम्हांलाही प्राह्म वाटतें.
प्रतिसांवत्सरिक श्राद्ध तिथीला करतात, शतसांवत्सरिक श्राद्ध त्या उभ्या वर्षात केव्हांही केलें तरी चालेल. न ी
__ प्रस्तुत पुस्तक बरोबर ता. ३ जून १९१८ रोजी प्रसिद्ध करावें असें प्रथम मनांत असल्यामुळं ते लिहून पुरे करावयाचें काम चालढकलीवर पडले होते. पण चालू
मे महिन्यांत आम्हांला हिंदुस्थानाबाहेर जावें लागेल ब कदाचित् १९१९ सालापूर्बी परत येतांही येणार नाही असें कांही दिवसांपूर्वी निश्चित झाल्यामुळें पुस्तक प्रसिद्धीचे काम शक्य तितक्या घाईने उरकून घ्यावें लागलें. मराठे व इंग्रज यांचा संबंध मूळ आला तेव्हांपासून तो पेशवाई नष्ट होईपर्यंतचा-पण फक्त या उभयतांच्या संबंधापुरता-त्रोटक इतिहास पूर्वार्धात दिला आहे व उत्तरार्धात कांही मुद्यांचें विवेचन केले आहे. तथापि, मराठे व इंग्रज यांच्यासंबंधाचे सांगोपांग आणि मनाजोगे विवेचन करावयाचें तर आणखी एक एवढेंच पुस्तक लिहावे लागेल, असे माहिती गोळा करतांना आढळून आलें. 'न' जाणो, पुढें केव्हां हवा तितका वेळ मिळाल्यास कदाचित् ही गोष्ट घडून येईलही.
प्रस्तुत पुस्तकांत योजिलेल्या अनेक विषयांच| विस्तार स्थलसंकोचामुळें यथाप्रमाण करितां आला नाही. यामुळें कांद्दी भागांना निव्वळ टिपणांचेंहि स्वरूप आलें आहे. हे आम्ही जाणून आहें.
वास्तविक पाहतां, प्रस्तुत विषयावरील पुस्तक ज्यानें इतिहासाचा व्यासंग जन्मभर केला आहे अशाच एकाद्या गृहत्थाकडून लिहिलें गेलें असतें तर ते हवे होतें. तथापि, आमच्या विनंतीवरून निदान या पुस्तकास उपोदूघात तरी लिहिण्याचे शु. रा. रा. वासुदेव वामनशात्री खरे यांनी कबूल केलें याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहे.
हं पुस्तक छापून हातावेगळे करण्याच्या कामी मुख्य मदत येथील प्रिटिंग एजन्सीचे मालक रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांची झाली. छापखान्यांकडे हेलपाटे घालणें, प्रुफे केवळ शुद्धाशुद्धाच्याच नव्हे तर युक्तायुक्ताच्याही दृष्टीनें वाचणे व दोन ठिकाणी छापण्याचे काम करावें लागल्यामुळें आमची घांदल वाचविण्याकरता स्वतःची धांदल करून घेणें या गोष्टी जर पराडकर यांनीं पत्करल्या नसत्या तर, हे पुस्तक या थोड्या मुदतीत निघणे शक्य नाही अशा समजुताीने कदाचित् ते छापखान्याकडे गेलेंही नसतें. म्हणून रा. पराडकर यांच्या श्रमांबद्दह त्यांचे आभार मानिले पाहिजेत. तसेंच छपाईचे काम लवकर उरकून देण्यास मदत केल्याबद्दल चित्रशाळा ब जगद्धितेच्छु छापखान्यांचे मालक, विषयाची वेळोवेळी चर्चा करून अखेर विषयानुक्रमणिका तयार केल्याबद्दल रा. रा. दत्तोपंत आपटे बी. ए., यांचेही आभार मानणें जरूर आहे.
पुणे तारीख १ माहे मार्च, सन १९१८
नरसिंह चिंतामण केळकर.
दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
प्रस्तुत ग्रंथाची प्रथमावृत्ति एक महिन्यांतच संपली; व ग्रंथांतील मजकुरांत निर्विवाद फरक करावा लागेल इतकी प्रतिकूल टीकेची सामग्री उपलब्ध होण्यापूर्वीच लोकांची वाढती मागणी पुरविण्यांकरितां ही पुनमुद्रितावृत्ती काढावी लागली,
पुणें ता. २५-११-१८
तिसऱ्या! आवृत्तीची मस्तावना
पूर्वीच्या आवृत्तीत विशेष फरक न करितां ही तिसरी आवृत्ति काढलेली आहे.
ता. १-६-२२ प्रकाशक