दख्खनची दौलत - ५

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

विज्ञानयुगाकडे पाठ फिरवून बसलेल्या आणि अनेक नव्याजुन्या चुकीच्या पण दृढमूल ग्रहांमुळे यंत्रयुगाचे स्वागत करण्याला नाखूष असलेल्या समाजाला त्यांनी विज्ञानसन्मुख केले. शंकरभाऊंनी मासिकाचे संपादकपद सोडले. तेव्हा वि. स. खांडेकर यांनी 'संपादन! छे! नांगरणी! पेरणी!' हा लेख ३००व्या अंकात दिला. या ३०० व्या अंकाला आलेली अभिनंदनाची पत्रे प्रातिनिधिक मते व्यक्‍त करणारी आहेत. विठोबा मांगाजी खोले, झडशी (वर्धा) लिहितात-
'उद्यम, साहस व उत्कर्ष या शब्दांनी मी मासिकाकडे आकर्षित झालो. केवळ करमणुकीसाठी नव्हे तर मला खरा मित्र लाभला तो किर्लोस्कर मासिक. त्याने दिलेली दृष्टी स्वीकारून मी प्रेमविवाह केला.' दिल्लीच्या एक वाचक उषा जुमडे लिहितात- 'किर्लोस्कर मासिक हा माझा मार्गदर्शक बंधू आहे. त्याने घरच्या चार भिंतीत गुंतलेल्या माझ्यापुढे साऱ्या जगाचे कपाट मोकळे केले.' प्रसिद्ध विनोदी लेखक चि. वि. जोशी लिहितात- ''वैचारिक क्रांतोस हातभार लावणे हे नियतकालिकांचे मुख्य कर्तव्य किर्लोस्करने उत्तम प्रकारे केले आहे. मराठी मासिकांचा एकांगीपणा किर्लोस्करने घालवला. बॅ. वि. दा. सावरकर म्हणतात-'किर्लोस्कर हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील अव्वल दर्जाचे मासिक झाले आहे, ते तुम्हा सर्व सहकाऱ्यांच्या दीर्घ परिश्रमाने.' कोल्हापूरचे चित्रकार व जहाल पुढारी माधवराव बागल लिहितात- 'माझे विचार जनतेपुढे मांडण्याचे मोठे साधन मला किर्लोस्करामुळे मिळाले.' सत्यशोधक भास्करराव जाधव लिहितात-''लोकांना अप्रिय, परंतु परिणामी हितकर असे वाडमय पुरविण्याचे व्रत पाव शतक तुम्ही चालविले आहे व चिकाटीने आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे.'' विदर्भाचे लोकनायक मा. श्री. अणे लिहितात- '' अंधश्रद्धेने गारठलेल्या महाराष्ट्रीय बुद्धीत नवीन उष्मा उत्पन्न होत असल्याचा प्रत्यय नवीन पिढीच्या लेखन-भाषणातून येतो. याचे श्रेय किर्लोस्कर मासिकाचेच आहे. समाजवादी पक्षाचे युसुफ मेहेरअली आणि कम्युनिस्ट पक्षाचे पी. सी. जोशी यासारख्या परभाषी मडळींनीही किर्लोस्करच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता पूर्वक धन्यवाद दिले ही विशेष गोष्ट आहे.

वाचक आणि जनतेच्या समाधानाची हो पत्रे पाहात असतानाच शंकरभाऊ कारखान्याचे जनरल मॅनेजर झाल्याची बातमी आली. किर्लोस्कर प्रेस व मासिकाचे काम मुकुंदराव तीन वर्षे सांभाळत होतेच; पण कारखान्याच्या मुख्य अधिकारी म्हणून सर्व सूत्रे हाती आल्यावर इतरांशी निकट संबंध राखता येणे कठीण झाले. कुठलेही काम असले तरी ते चार माणसांना बरोबर घेऊन खेळाडू वृत्तीने पार पाडायची शंकरभाऊंची पद्धत होती.

एक दिवस मोल्डिंग शेडचे कामगार संप करणार आहेत अशी बातमी आली. असा प्रसंग पूर्वी कधीही आला नव्हता. प्रमुखांधी सभा झाली. लक्ष्मणराव, शंतनुराव, शंभो अण्णा, गुर्जर, रेगे या सर्वांनी ती जबाबदारी शंकरभाऊंच्यावर सोप्षली. ती स्वीकारताना शंकरभाऊ म्हणाले, ''मी जी तोड काढीन त्याला कोणी हरकत घेता कामा नवे.''

गणपती गेटाबाहेर दोनशे कामगार ठाण मांडून बसले होते. शंकरभाऊ एकटेच त्यांच्याकडे गेले. त्यांनी विचारले, ''इथे काय करता आहात तुम्ही? कारखान्यात चला आणि काय सांगायचे ते सांगा. सारं म्हणणं ऐकल्यावर आम्ही त्याचा सहानुभूतीने वियार करू. आमचा निकाल तुम्हाला नापसंत पडला, तर तुमचा संप खुशात चालू दे.''

सर्व कामगार गेटातून आत आले. त्यांच्या पुढाऱ्यांची भाषणे झाली. त्यांच्या तक्रारीचा निर्णय तिथेच लावण्यास अडचण पडली नाही. कामगारांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. संप मिटला. आजचा दिवस वाया जाणार असे वाटले, पण कामगारांचा उत्साह और. त्यांनी राक्षसासारखे काम करून रोजच्याइतकीच कास्टिंग्ज काढली व दिवस कारणी लावला.

तथापि एकतंत्री कारखाना चालविण्याये दिवस संपले आहेत, कामगारांच्या सुखरोयी, वेतन, पगारवाढ, प्रॉव्हिडंड फंड या किर्लोस्कर कारखान्यातील व्यवस्था तेव्हा क्वचितच कोठे असतील. तरीही कामगारांत वर्गभावना जागृत झाल्यावर त्यातून होणारा बंडखोरपणा दाबून टाकणे शक्य नव्हते. बदललेला काळ ओळखून बेबनावाचे प्रश्न (वरचेवर निघू नयेत, यासाठी कामगार कौन्सिलची योजना शंकरभाऊंनी पुढे ठेवली. कामगार प्रतिनिधी आणि चालकांचे प्रतिनिधी निवडून कौसिल बनवावे. महिन्यातून एकवेळ एकत्र बसून आलेले प्रश्न बैठकीत सोडवावे असे ठरले, पण कामगार- विषयक कायदा आल्यानंतर हे सलोख्याचे वातावरण राहिले नाही. युनियन निघाली. त्यांच्याकडून आलेल्या पहिल्या पत्रात ते लिहितात, ' औंध संस्थानात ट्रेड युनियन कायदा नव्हता. तरी आपण कृपावंत होऊन कामगारांचे हितसंबंध वाढविण्यासाठी व त्यांचे प्रश्न समजुतीने व सहकार्याने सोडविण्यासाठी जी कमगार कौन्सिल स्थापन केली, त्याबद्दल आम्ही मनापासुन आभारी आहोत. आपल्या उदार व समंजस धोरणामुळे कौन्सिलला बरेच चांगले कार्य करता आले.'' हे उदाहरण अपूर्व म्हणावे लागेल.कारखान्यात कामगार कौन्सिल बरखास्त होताच संघर्षाचे दिवस आले.
युनियनने संपाची नोटीस दिली. आप्पासाहेब पंतांनी मधे पडून लवाद नेमण्यास मान्यता दिली. लवादानी सुचविलेली पगारवाढीची पद्धत मान्य झाली; परंतु असंतोष कमी होईना.

Hits: 122
X

Right Click

No right click