धामधुमीचा काळ आणि ग्रामराज्याची जबाबदारी - २
आळसंदचा दरोडा
१९४१ फेब्रुवारी, अमावस्येचा दिवस. रात्रीचे जेवण करून शंकरभाऊ बसले तो आळसंद गावाचे दोन रामोशी सरपंचाचे पत्र घेऊन आले. '' आमच्या गावावर आज दरोडा पडणार आहे. तुम्ही ताबडतोब निघून यावे.'' ते वाचून पूर्वसूचना देऊन दरोडा कसा येईल याचे क्षणभर शंकरभाऊंना हसू आले, तरी गावचे लोक घाबरले असतील म्हणून शंकरभाऊ मोटार काढून रायफल घेऊन लगेच निघाले.
चावडीपुढे सारे गाव जमले होते. गेल्या आठवड्यात दरोडेखोरांनी गोफणीने दगड मारून गावाला दोन वेळा दहशत घातली होती. हे ऐकल्यावर त्या गर्दीतील पंचवीस जवानांना बाजूला घेऊन बाकी सर्वांना शंकरभाऊंनी घरोघर जायला सांगितले. त्यांच्या काठ्या-भाले घेऊन गाबाभोवती शिस्तीने गस्त घालायला सांगितले. मागे राहिलेल्या जवानांना गावाच्या कुसबावर चार ठिकाणी टेहेळणी करायला पाठविले. रात्रीचे दोन वाजल्यावर कुत्री भुंकायला लागली, त्यामुळे दरोडेखोरांची येण्याची दिशा समजली. बॅटऱयांचा उजेड टाकोत ते आले, तेव्हा सर्वांनी एकदम बसून आडव्या ओळीने पुढे जायचे ठरले. अंतर थोडे उर्ल्यावर शंकरभाऊंनी उभे राहून, बंदुक खांद्याला लावून 'पुढे याल तर मराल' असा दरोडेखोरांना आवाज दिला आणि दुसऱ्या क्षणी तोंड फिरवून दरोडेखोरांनी धूम ठोकली; पण गावच्या जवानांनी दोघांना पकडून झोडपून काढले. हा काहोसा अवघड प्रसंग. त्यातील धैर्य-शोर्याबद्दल शंकरभाऊंना वाढदिवसाच्या दरबारात महाराजांनी सुवर्णपदक देऊन गौरव केला.
एक शेतकरी बंडू बाखटे याची गाय व शेळी पाटलाने जप्त केली व विकायला बाजाराकडे घेऊन चालला. मामलेदारांकडे चौकशी केली, तर त्याने जमिनीचा सारा भरला नाही म्हणाले. बंडूने शंकरभाऊंना साऱ्याच्या पावत्या दाखवल्या होत्या. शंकरभाऊ समक्ष बंडूला घेऊन जाऊन दोघे चौकशी करू लागले तेव्हा समजले, त्याची जमीन तीन भावांच्यात आहे. बंडूच्या दोघा भावांनी सारा भरला नाही. 'किती सारा द्यायचा राहिला विचारला तर, १५ रु. होता. शंकरभाऊंनी मामलेदारांना १५ रु. दिले व गुरे सोडण्याचा हुकूम त्यांच्याकडून घेतला. पाटील बाजारात पोहाचायच्या आधी त्यांना गाठले व हुकूम दाखवला. तेव्हा बंडूची मुले गायीच्या व शेळीच्या गळ्याला मिठी मारून हसू लागलो.
शेजारच्या खेड्यातील तरुण कारखान्यात कामाला लागले होते. त्यामध्ये बरेच हरिजनही होते. एक दिवस कामगारातला पुढारी सांगू लागला, ''हरिजनांना कारखान्यातून काढून टाका. ते देशद्रोही आहेत. आम्ही रोज सकाळी प्रभातफेरी काढतो, तर त्यांना बोलावले तरी ते येत नाहोत. हा देशद्रोह नाही का?'' तेव्हा हरिजनातील एकजण उदून म्हणाला, ''तुम्ही आम्हाला शिवत नाही, दूर ठेवता तर आम्ही फेरीत कसं यायचं?'' शंकरभाऊ म्हणाले, ''तुम्ही आता शिवाशिव सोडून देतो असे सांगता का? स्वत: महात्मा गांधीही अस्पृश्यता मानीत नाहीत. तुम्हाला माहीत नाही का?'' मंडळी न बोलता निघून गेली.
देवाला म्हणून सोडलेली एक गाय पोट फुगून आजारी पडली. त्या गावच्या सरपंचांना शंकरभाऊ तालुका समितीचे अध्यक्ष झाले हे आवडले नव्हते. म्हणूनच त्यांना अडचणीत पकडण्यासाठी रात्री १० वाजता रामोशाबरोबर शंकरभाऊंना चिठ्ठी पाठवली व त्या गाईबद्दल साऱ्या गावाची पूज्य भावना असल्याने तिला वाचविण्याची व्यवस्था करावी अशी तंबीच दिली. शंकरभाऊंनी थोडा विचार केल्यावर तासगांवला एक गुरांचे डॉक्टर फडणीस म्हणून आहेत असे त्यांना आठवले. लगेच मोटार काढून १५ मैलांवरच्या तासगावला फडणीसांना शंकरभाऊंनी शोधून काढलं आणि त्यांना घेऊन परत त्या गावची वाट धरली. ती आजारी गाय ठकिरड्याशेजारी पडली होती. डॉक्टरांनी तिला तपासले. एका बाटलीचे तोंड उघडून गायीच्या तोंडात ती खुपसून औषध पाजले आणि तिच्या पोटाला टर्पेटाईन फासून चोळा असे सांगितले. शंकरभाऊंनो अस्तन्या वर करून जोराने गाईचे पोट चोळणे सुरू केले. तिच्या पोटातील वायू हळूहळू कमी होऊन ती हालचाल करू लागल्यावर, पोटाखाली दोन बांबू घालुन तिला उभी कली. नंतर ती अडखळत चालू लागली. तेव्हा सकाळी पाहायला गाव गोळा झाले व शंकरभाऊंच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला. पण ते म्हणाले, ''खर धन्यवाद डॉ. फडणीसांना द्या.''
Hits: 86