बुवा बाजीवर हल्ला -५
त्यासंबंधी शंकरभाऊचा थोडा वेगळा विचार प्रकट झाला.
''असा ऐतिहासिक क्षण आल्यावर स्वातंत्र्याचा विचार केवळ राजकोय क्षेत्रापुरताच मर्यादित राहू शकत नाही. ज्या ज्या प्रकारचे दास्य, जुलूम अथवा अरेरावी समाजात चालू असेल, त्या सर्व प्रकारांना झुगारून देण्याचा विचार समाजाच्या मनांत स्फुरण पावला पाहिजे. ब्रिटिशांचे दिवस संपत आल्यावर शेटजी-भटजी आणि नवरोजी या सर्वांनाच शह लावावा हे योग्यच ठरेल.''
तुर्कस्थानच्या कमाल पाशाचे उदाहरण जगापुढे होते. त्याने नुसते राजकीय दास्य नाहीसे केले नाही तर, मुल्लामौलवींचे उच्चाटन केले, स्त्रियांच्या बुरख्याला बंदी घातली, स्त्रियांना समान हक्क दिले.
स्री-मासिकातही राष्ट्रीय चळवळीतील सत्याग्रही स्त्रियांचे परिचय येऊ लागल. हिंदू कायद्यांत आईला इस्टेटीत हक्क नाही ही स्थिती डोळ्यात भरवणारी बाळूताई
खरे यांची पत्ररूप गोष्ट आली. कृष्णाबाई मोटे यांच्या श्रमिक स्त्रियांच्या प्रश्नांचीओळख करून देणाऱ्या 'दृष्टीआडच्या सृष्टीत' या लेखमालेचा प्रारंभ झाला.
ज्ञानकोशकार डॉ. केतकर यांनी 'सुशिक्षित स्त्रिया आणि विवाह' व 'आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजाथे रूपांतर' या लेखात समाजशास्त्रीय विश्लेषण करून समाज जीवनातल्या ज्या उणोवा दाखविल्या, तो विचार फार महत्त्वाचा होता. अशा साहित्यामुळे स्री मासिक महाराष्ट्रात थोड्याच काळात लोकप्रिय होत गेले. १९३७ मध्ये किर्लोस्कर मासिकाचा २०० वा अंक निघाला. त्याच्या मुखपृष्ठावर सायकलवरून जाणारे तरुण तरुणीचे युगुल २०० व्या मैलाचा दगड ओलांडताना हसतमुखाने हात वर करून साथ देत आहे, असा प्रसंग दाखविणारे सिरूरांचे चित्र फार लोकप्रिय झाले. या अंकात ना. सी. फडके यांनी ''४५ ००० प्रतीच्या तीन मासिकांचा गुप्त सूत्रधार'' असे आपल्या संपादक मित्राचे-शंकरभाऊंचे वर्णण केले आहे. समाजातील अनेक मान्यवरांनी मासिकांच्या कामगिरीबद्दल आपले अभिप्राय पाठवले होते.
१) शंकराचार्य कुर्तकोटी. - देशकालपरिस्थितीप्रमाणे धर्मकल्पना बदलल्या पाहिजेत. किर्लोस्कर मासिकाने चालविलेले काम परिणामी समाजाच्या विकासाला हितकर ठरेल यांत शंका नाही.
२) गुरुवर्य कर्वे - मासिकाने लोकमताला वळण लावले.
३) क्षात्रजगद्गुरू - बहुजनसमाजाला कार्यप्रवृत्त करण्याचे महत् कार्य केले.
४) ज्ञानकोशकार केतकर - जनतेच्या मनोवृत्तीशी सहदयता दाखविली.
५) श्रीमती सरीतावाई गायकवाड - अस्पृश्यता निवारण व लोकशिक्षणाचे कामकेले.
६) बालगंधर्व - महाराष्ट्रात जुन्या वियारावर शस्त्रक्रिया घालविली.
७) वि. स. खांडेकर - मतप्रवाह व मनोरंजन यांचा सुवर्णमध्य साधला.
८) वि. पां. दांडेकर - हे माझे मासिक वाटते.
९) पोतदार - आजची तरुणपिढी किर्लोस्करची आहे.
१०) गंगाधरराव देशपांडे, बेळगाव - उद्योगधंद्याचे महत्त्व पटविण्याथे कार्य मासिकाने केले.
११) मीमांसाभूषण पु. वा. साठे - किर्लोस्कर कार्यालयांतील कौटुंबिक वातावरणाचा अभिमान वाटतो.
१२) रैग्लर परांजपे - विवेकशक्तीला उत्तम चेतना दिली.
१३) भास्करराव जाधव, कोल्हापूर - लोकांची विचारशक्ती जागी केली.
१४) बॅ. सावरकर - अज्ञानयुगातून समाजाला विज्ञानयुगाकडे नेले.
१५) महादेवशास्त्री दिवेकर - शंकरराव, ताम्हनकर, विजापुरे यांच्या एकरूपतेत किर्लोस्करचे वैशिष्ट्य आहे.
१६) बाबुराव पेंटर - व्यावहारिक चित्रकलेचा उपयोग शिकवला.