बुवा बाजीवर हल्ला - ४
'किर्लोस्कर' मासिकात राजकीय स्वरूपाचे लेख फारसे येत नसत. यासंबंधी एका वाचकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शंकरभाऊंनी संपादकीयात लिहिले, ''आपल्या आदरणीय पुढाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आपला देश आज ना उद्या स्वतंत्र होणारच आहे. नंतर आपल्या स्वतंत्र देशाची जबाबदारी पेलून त्याची भरभराट करण्यासाठी जी कर्तृत्ववान माणसे उद्या हवीत, त्यांची उमेद आणि प्रयत्नावरील विश्वास वाढविण्याचे काम हे आम्ही देशप्रेमाचे काम समजूनच करीत आहोत.''
१९३०-४० चा काळ मासिकांच्या चढत्या भरभराटीचा होता. मासिकांची मागणी वाढली तशी येणाऱ्या साहित्याचीही संख्या वाढली, म्हणून सहसंपादकांच्या कामात मदतनिसांची गरज वाढली. मुंबईच्या 'खेळगडी' या मुलांच्या मासिकाचे संपादक का. रा. पालवणकर यांचे एक नातलग म. ना. पालवणकर यांची भेट घेतल्यावर, किलोस्करवाडीस जाण्यास थोरल्या पालवणकरांनी संमती दिली. त्याच सुमारास पुण्याहून बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले मो. प्र. फडकेही संपादकीय कामास लागले. त्यामुळे काम सोईचे झाले.
याच सुमारास बुद्धिवान व पुरोगामी विचाराचे लेखक ह. रा. महाजनी यांची 'माणसांचे चार वर्ण समजणे कसे चुकrचे आहे' हे सांगणारी 'चार्वाकाचे आत्मवृत्त' ही लेखमाला किर्लोस्कर मासिकातून प्रसिद्ध झाली व त्यामुळे वाचकांत फार खळबळ उडाली. हिंदीतील प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने लखनौ येथे अधिवेशन घेतले होते. त्याचे निमंत्रण शंकरभाऊंना मिळाले आणि ह. रा. महाजनी यांच्यासमवेत ते लखनौस गेले. तेथे अनंत काणेकर यांची भेट झाली. पुढे काणेकरांची ' धुक्यातून लाल ताऱ्याकडे' ही रशियाच्या प्रवासाची लेखमाला किलॅस्करमधून प्रसिद्ध झाली आणि प्रवासवर्णनाच्या वेगळ्या शैलीने ती विशेष गाजली.
१९३० पासून पुढचा काळ भारतात जागरणाचा होता. यापूर्वीच्या काळात कित्येक शतके मध्ययुगीन अज्ञानाच्या अंधारात राहिल्यामुळे माणसांच्या विचारांचे जग विहिरीतल्या बेडकाप्रमाणे फार संकुचित झाले होते. भारतामध्ये ब्रिटिशांनी आपला अंमल बसविल्यामुळे भारतीयांना परदेश, विलायत म्हणजे फक्त इंग्लंड असे वाटत असे «
१९१४ ते १९१८ या काळात पहिल्या महायुद्धाच्या बातम्यांमुळे व सैनिकांच्या अनुभवामुळे जर्मनी, फ्रान्स, स्पेन, हॉलंड, पोर्तुगाल अशी युरोपातील व इतर देशांची नावे ऐकून त्यांच्याविषयी विशेष कुतूहल उत्पन्न झाले. ब्रिटिश साप्रज्यात बंड करणारे आयल॑डचे टेरेन्स मॅक्स्विनी, लोहाराचा प्रधान झालेला इटलीचा मुसोलिनी, रशियन कामगारांना नेता लेनिन अशा व्यक्तींचे किलॉस्करमध्ये येणारे परिचय वाचकांना आकर्षक वाटत होते. १९१७ मध्ये झालेली रशियन क्रांती म्हणजे कामगारांच्या स्वातंत्र्याचा विजय! तो कसा टिकणार म्हणत असताना तेथील शासन व समाज बळकट व कार्यक्षम होत चालले. त्यामुळे सोव्हिएत युनियन या वेगळ्या प्रकारच्या समाजव्यवस्थेबद्दल कुतूहल वाढले. रशियन क्रांतीच्या १० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात पंडित जवाहरलाल यांनी भाग घेतला. ते भारतात परत आल्यावर तरुणांसाठी समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारी अभ्यासमंडळे सुरू झाली. उदारमतवादी लोक जहाल विचारांकडे लक्ष देऊ लागले.
त्याचा परिणाम किर्लोस्कर मासिकांत येणाऱ्या लेखातून वाचकापर्यंत पोचू लागला. १९३२ ते ४२ हा काळ गांधोजोंची दांडीयात्रा, मिठाचा सत्याग्रह, संपूर्ण स्वराज्याचा ठराव यामुळे असंतोषाच्या ज्वालांनी धगधगत होता. हजारो बंधु-भगिनी तुरुंगात अपेष्टा भागत असल्यामुळे त्यावर्षो लोकांनी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सणही साजरे केल नाहीत.
Hits: 113