पुरोगामी विचाराकडे - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

ज्या सामाजिक सुधारणांचा, खी-पुरुष समानतेचा, जाती उच्चाटनाचा पुरस्कार 'किर्लोस्कर' मासिकामधून वैचारिक पातळीवर होई, त्या विचारांचे जणू प्रात्यक्षिकच किर्लोस्करवाडीच्या जीवनामधील घटनातून दिसत असे. गणपतीच्यावेळी महिला मंडळाच्या स्रिया ताम्हनकरांनी लिहिलेली नाटके करीत, प्रदर्शने भरवीत हे सारे वाचणाऱ्या १९३० च्या काळातील वाचकांना किर्लोस्करवाडी ही एक स्वपनगरीच आहे की काय असे वाटल्यास नवल ते काय?

विचारजागृतीच्या कामात विनोदाचा, विडंबनाचा फार चांगला उपयोग होऊ शकतो, म्हणून सुरुवातीच्या काळात शंकरभाऊ जी व्यंगचित्रे काढीत त्यामध्ये अंगरखा-पगडी घालणारे म्हातारे सनातनी आणि आधुनिक युवक यांच्यातील दोन वेगळ्या कृती दाखवून ते नवमतवादाचे समर्थन करीत असत.

मध्यमवर्गातील माणसे परंपरेच्या चाकोरीप्रमाणे जीवन जगत असतात. त्यातील काही आचार अधवा रूढी मनाला खटकल्या तरी सुधारायच्या कशा हे मात्र त्यांना सुचत नाही. आचार बदलण्याचे धाडस करणारा एखादा माणूस निघाला..आणि तो विक्षिप्त वाटला तरीसुद्धा लोकांना आवडतो. त्याच्या वर्तनातून हास्यास्पद विनोदाचे दर्शन होते, अशा गप्पा सायंकाळी फिरायला जाताना ताम्हनकर-विजापुरे आणि शंकरभाऊ यांच्यामध्ये चालत. एक दिवस शंकरभाऊ ताम्हनकरांना म्हणाले,
''असे एका विक्षिप्त विचारी माणसाचे व्यक्तिचित्र तुम्ही लिहाल तर मी त्याच्यासाठी छान चित्र काढीन.'' त्यावर थट्टामस्करी झालो; पण दोघेही आपल्या कामाला लागले. त्याचे नाव 'दाजी' ठरले व ठेंगणा, दुसका, ग्रंथप्रेमी, मिस्किल, वेधक नजरेचा, आधुनिक सदरा-कोट-धोतर पण टोपी न वापरणारा दाजी १९३२ च्या सप्टेंबरमध्ये मासिकांत प्रथम प्रगट झाला. त्याच्या सरळ पण प्रामाणिक कल्पनांनी वाचकांना पोटभर हसवले. सवाष्णीसाठी ठेवलेले लुगडे मोलकरणीलादेणारा अभ्यंगस्नानाच्या दिवशी पूर्ण स्वच्छतेसाठी एरंडेल व फिनेल आणणारा दाजी, व्याख्यानमालेच्या समारोपाच्यावेळी शुभेच्छा व्यक्‍त करताना शीघ्रकाव्य रचून म्हणतो-

' असेच चालो ज्ञानसत्र हे सालेंच्या साले ।
अध्यक्षासह श्रोते वक्ते मरून जरी गेले ।॥।

अशा या दाजीचा संचार लग्नमंडपापासून साहित्य संमेलनापर्यंत, भूकंपापासून परदेशाच्या प्रवासापर्यंत होऊ लागला. त्याच्या भेटीची वाचक वाट पाहू लागले. शंकरभाऊंच्या वाचनात अमेरिकेतील एक पुस्तक आले. त्यावरून स्त्रियांसाठी सामाजिक जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे कसे प्रयत्न केले याचा चित्तवेधक व स्फर्तिदायक वृत्तांत दिला होता. त्यावरून त्यांना स्पष्ट जाणवले की स्त्रियांचे जग अगदि स्वतंत्र, वेगळे आहे. त्यांच्या प्रश्‍नांचा उहापोह करणारे, त्यांच्या आवडत्या विषयाविषयी माहिती देणारे आणि त्यांचे मनोरंजन करणारे मासिक महिलांसाठी काढल्यास नक्की यशस्वी होईल. त्याचे नाव 'स्त्री' हेच त्यांना सुटसुटीत वाटले. किर्लोस्करवाडीत लेखक-लेखिकांचे संमेलन ऑगस्ट ३० मध्ये भरविले होते. त्यामध्ये १५ ऑगस्टला 'स्रीचा' पहिला अंक प्रसिद्ध झाला.

Hits: 99
X

Right Click

No right click