पुरोगामी विचाराकडे - ८
त्या अंकाच्या संपादकोयात 'ख्ियांची घटकाभर करमणूक करण्यापेक्षा त्यांच्या विचाराला चालना देऊन, स्वत:ची उन्नती घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला हातभार लावणे या गोष्टीकडेच 'स्री' मासिक लक्ष देईल' हे अभिवचन पहिल्या अंकानेच पुरेपूर सिद्ध केले. खी मासिकाला आनंदीबाई शिर्के, सरलाबाई नाईक, चंद्रकला हाटे, गोता साने, बाळूताई खरे, कृष्णाबाई मोटे, कमलाबाई टिळक अशा सक्षम लेखिकांचे सतत सहाय्य लाभत राहिले. प्रत्येक अंकात खितयांच्या आरोग्यप्रश्नावर डॉ. के. बी. साठे यांनी उपयुक्त माहिती दिली. स्रियांच्या कायदेशीर हक््काबद्दल बडोद्याचे राजरत्न वा. वि. जोशी लेख लिहित. ख्रिया व सहशिक्षण, विवाहपटद्धती, सुशिक्षित स्त्रीचा मनोभंग असे विषय येत. स्त्रियांनी लिहिलेली प्रवासवर्णने, कथा, कविता घरगुती व कोटुंबिक व्यवहाराबद्दल सुधारणा यासारख्या विषयांचा समावेश असे.
समाजाच्या उनतीमध्ये एक मोठा प्रश्न अस्पृश्यतेचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान आणि अभ्यासू व्यक्तीच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळ्या राममंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाचा सविस्तर व चित्रदर्शी वृत्तांत 'किर्लोस्कर' मासिकात देवदत्त ना. टिळक यांनी लिहिला. १९३३ मध्ये 'किर्लोस्कर' ने ' अस्पृश्यता उच्चाटण' विशेषांक काढला.
१९३४ पासून आलेले बॅरिस्टर सावरकरांचे लेख ही किर्लोस्करच्या वैचारिकजागृतीच्या मोहिमेतील पुढची पायरी होती. त्यापूर्वीचे लेख नवमतवादाचा तात्विक पुरस्कार किंवा लहान मोठ्या सुधारणा सुचविणारे होते; पण सावरकरांनी सामान्य माणसाच्या जीवनांतील दैनंदिन आचार-विचारांना, रूढी-परंपरांना, समजुती-संस्कारांना बुद्धिनिष्ठ कसोटी लावून दाखवली व त्यामधील तत्वशून्यता, हानिकारकता आणि अडाणीपणा रोखठोक शब्दात वाचकांपुढे ठेवला. सृष्टिनियम आणि वैज्ञानिक सत्य हेच सनातनधर्म आहेत, त्यातही संशोधनानंतर उद्या बदल करावाच लागेल. मनुष्याचा व्यवहार ब आचार हा परिवर्तनीय आहे. कुत्र्या-मांजरांचा स्पर्श चालतो; पण आपणासाठी कष्ट करणाऱ्या अस्पृश्याचा चालत नाही.
गाय हा उपयुक्त पशू आहे; पण तिला देवता समजून तिचे शेण-मूत पवित्र म्हणून पिणे ही निर्बुद्धतेची कमाल झाली असे सावरकरांनी सांगितले. नेमकी भाषा, धारदार शब्दरचना, उपहास करणारी टीका, समाजाला जागे करून नव्या विचारांनी चालण्याचे धैर्य देऊ लागली.
Hits: 87