पुरोगामी विचाराकडे - ६
शंकरभाऊ म्हणत 'राष्ट्रामध्ये अलौकिक स्वार्थत्यागाचे काही पुढारो असल्याने देश पुढे येऊ शकणार नाही. सर्वसाधारण समाजामध्ये सामान्य मनृष्यालासुद्धा आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखता येईल. इतकी त्याची तयारी करून सरासरीच्या न्यायानेच देशाची प्रगती होईल; तरच खरी आणि टिकून राहणारी उन्नती होईल.
'विक्रीची बारा सूत्रे' ही लेखमाला शंकरभाऊंनी २९-३० सालात लिहिली. यशस्वी दुकानदारांच्या मुलाखती छापल्या. गिऱ्हाईकाचे मन वळविण्याचे कौशल्य फार सोप्या व समर्पक शब्दात सांगितले. व्यक्तिवादाच्या उद्याची नांदी म्हणून“तरुण स्त्री पुरुष व त्यांच्यापुढील प्रश्न' ही प्रा. ना. सी. फडके यांची लेखमाला म्हणून विशेष गाजली. सर्वगामी अभिरुची, शालीनता, अशा गुणाबद्दल लिहून स्वत:चे मत बनविण्यासाठी तरुण ख्री-पुरुवांनी ' आपल्या समाजाचा उद्धार व राष्ट्राचा अभ्युद्यय कशाने होईल? अशा प्रश्नावर आपसांत विचार केला पाहिजे' असे सांगितले.
त्याकाळात तरुणांना साहसासाठी स्फूर्ती देणारे एखादे उदाहरण शंकरभाऊ शोधत होते. एक दिवस त्यांचे काम चालू असताना त्यांना भेटायला दोन तरुण आले. त्यांच्या नावाच्या कार्डावरून नाथ गोडबोले व शाम चित्रे अशो त्यांची नावे समजली. त्यांच्या नावाच्या कार्डावर जगप्रवासी असा शब्द पाहून शंकरभाऊंनी अधिक चौकशी केली. त्यावरून त्या दोघांनी हिंदुस्थान ते इंग्लंड हा प्रवास सायकलवरून केला होता हे समजले.
त्यांचा पासपोर्ट शंकरभाऊंनी पाहावयास मागितला त्यावरून खात्री झाली. ही कर्तबगारी फार दांडगी होती. शंकरभाऊंनी त्यांना आपल्या अपूर्व प्रवासाचे वर्णन लिहिण्याची विनंती केली. त्यांची 'चाकावरून जगाची चकक््कर' हो लेखमाला किलस्कर मासिकातून दोन वर्ष येऊ लागताच त्यावर वाचकांच्या उड्या पडू लागल्या. नाथ गोडबोल यांना ठिकठिकाणाहून आमंत्रणे येऊ लागली. जातील तेथे तथ त आपल्या व्यक्तिमत्याने सर्वांना भारून टाकोत. या प्रवासपर लेखमालेचा किती प्रभाव पडला हेही शंकरभाऊंना पाह्मला मिळाले. त्यावर्षी तरुणांच्या वीस-पंचवीस टोळ्यांनी सायकलवरून किर्लोस्करवाडीला भेटी दिल्या. काहीजण तर वऱ्हाडमधून आले होते. आपल्या समाजापुढे एखादे उज्वल उदाहरण ठेवल्यास त्याचे अनुकरण किती उत्साहाने होते हे त्यामुळे लक्षात आले.
२९ साली किलस्किर मासिकाचा 'महिला विशेषांक' निघाला. त्यामध्ये शांताबाई नाशिककर, कृष्णाबाई मोटे, सुलाबनाबाई हुदलोकर अशा त्यावेळच्या प्रसिद्ध लेखिकांचे लेख होते. 'माझा संसार मी कसा केला' या विषयावर लेखांची स्पर्धा झाली आणि 'आदर्श संसार पेला' यवतमाळच्या यशोदाबाई बापट यांनी मिळविला.
१९२९ सालापासून सावरकरांच्या सूचनेवरून मासिकाच्या नावातील 'खबर' हा शब्द वगळण्यात आला. कारखान्याची माहिती वाचकांना देण्यासाठी वास्तविक किर्लोस्कर खबरचा जन्म झाला. पण त्यातील विचारांना जागे करणारे लेख, आकर्षक कथा, कविता, विविध व्यक्ती आणि संस्थांचे परिचय यामुळे ते झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. त्याच्या नावामधील खबर शब्द गळून पडला तरी “कारखान्याचे पान' हे चटकदार सदर प्रत्येक अंकात वाचण्यास वाचक उत्सुकअसत. कारण कारखाना पाहण्यास येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांचे फोटो, कारखान्याची सभा, प्रगतीचा अहवाल, कोणत्या प्रदर्शनात कोणत्या उत्पादनानी बक्षिसे मिळविली याची माहिती त्यामध्ये असे. एकूण किर्लोस्करवाडी या उद्योगनगरीची हकिगत ही मोठी आकर्षक वाटे. तेथे होणारी कौर्तने, सर्कशीचे प्रयोग, आर्यन किंबा प्रभात फिल्म कंपन्यांचे चित्रपट महाराष्ट्र किंवा समर्थ नाटक मंडळीचे नाट्यप्रयोग, यांची रसभरित वर्णने असत. किर्लेस्करवाडीत खेळले जाणारे क्रिकटचे सामने, रामभाऊ भिरंगी किंबा संभू चाबुकस्वार काढलेली धावसंख्या व सामन्यातील चुरशीची वर्णने ही फार नवलाची गोष्ट होती. आज रेडिओ किंवा टीव्हीवर क्रिकेटचा धावत्या वर्णजाचा आनंद घेणारांना या प्रकारच्या क्रीडापरिचयाचा हा जन्मकाळ समजून आजही नवल वाटेल.
Hits: 84